स्त्री - एक परिपूर्ण शिल्पकार
स्त्री - एक परिपूर्ण शिल्पकार
स्त्री चे असे विविध रूप
प्रत्येक कामात ती तत्पर
आई, बहीण, पत्नी ह्या रुपात
स्त्री जणू एक उत्कृष्ट शिल्पकार !!धृ!!
संसार 'ती'चा हा सर्वकाही
सुखी चेहरे पाहण्यास 'ती' तत्पर राही
एक नव्हे प्रत्येकांचे 'ती'सुख पाही
अशी एक 'स्त्री' कर्तृत्वाने जगत राही !!१!!
प्रत्येक क्षेत्रात 'ती' चे शौर्य
अभिमानाने वाढते तिचे मनोधैर्य
भूत , भविष्य, वर्तमानकाल
जागोजागी उंचावे 'ती' चे अस्तित्व !!२!!
घरकामात 'ती' निपुण
फेडीते आपले ऋण
आधी मी, अंती मी विचारात
सांभाळते तिचे घरसंसार !!३!!
अभिमान वाटे, मान ही उंचावे
'स्त्री' चे कर्तव्य पाहुनी मन भारावे
एक नव्हे तर कित्येकांचे देणे ह्या
प्रत्येक रुपात जगास समजावे
लढावे नि लढत रहावे
आपले हक्क मिळवावे
एक सुंदर कर्तव्य करुनि तुम्ही आम्हास पटवूनी द्यावे
एक सुंदर कर्तव्य करुनि तुम्ही आम्हास पटवूनी द्यावे !!४!!
