Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

मनाची वंचना (गझल)

मनाची वंचना (गझल)

1 min
13.5K


या मनाची वंचना, सांगू कुणाला ?

या तनाची यातना सांगू कुणाला?



मार, छळ सोसायचा आता किती मी ?

जीवघेणी वेदना, सांगू कुणाला ?



वाद मिटवूनी, करावे प्रेम तुजवर

ही जिवाची कामना, सांगू कुणाला?



मी जगावे की मरावे ? पोरकी मी

दाटती या भावना, सांगू कुणाला ?



दुःख की आनंद आहे रे कळेना ?

आज ही संभावना, सांगू कुणाला?



मागतो तो, दान द्यावे याचकाला

भाकरीची याचना, सांगू कुणाला ?



सर्व लोकांना सुखी तू ठेव देवा

ही करीते प्रार्थना, सांगू कुणाला ?



उसळते तूफान देहातून माझ्या

या सुखी संवेदना, सांगू कुणाला ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational