तुझी माझी प्रीत
तुझी माझी प्रीत
तुझी माझी प्रीत
बहरत गेली क्षणोक्षणी
आधार हवा तुझा सखे
चालताना पावलापावलागणी
तुझी माझी मैत्री
खुलत गेली क्षणोक्षणी
उन्मळली अंतरंगात
प्रीतीचे फुल होऊनि
तुझी माझी प्रीत दरवळली
फुलता रातराणी
उमलणाऱ्या केवड्याने
साद घातली मनोमनी