STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Romance Fantasy

3  

Mita Nanwatkar

Abstract Romance Fantasy

आतुरता

आतुरता

1 min
1.6K

भेटीस साजणाचा, हृदयात ध्यास आहे

डोळ्यात आठवांचा ,पाऊस खास आहे

ओढ अनामिक आता, देहात गुंतलेली

दरवळतो भोवताली, तुझा सुवास आहे

कंठात प्राण आला, वेळ ही थांबलेली

आतुरता मिलनाची, छेडतो भास आहे

नि:शब्द बोल माझे, वाट ही हरवलेली

प्रतिक्षेत अजून बाकी,किती तास आहे

साक्षीस आज आहे, ही रात्र जागलेली

स्वप्नील भावनांची, जीवास आस आहे

असह्य विरह झाला,ही नजर आसुसलेली 

विलंब नकोच आता, व्याकूळ श्वास आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract