STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

आभास तुझा होतो...

आभास तुझा होतो...

1 min
512

स्वप्नातल्या बागेत अवचित मजला, आभास तुझा होतो

तुझ्या डोळ्यांत विरणाऱ्या भावनांना, माझ्या ओठांपर्यंत नेतो


चादर त्या मखमली अनुभवांची, मी अंगावर घेतो

अन् तुझ्या स्वप्नीच्या रंगमहालाशी, एकरूप होतो


फुले सांडती तुझ्या पाऊली, प्रेमदूत इथले गुंजारव करती

कृमी रात्रीचे, प्रेमगीत कसले हवेत इथल्या आपल्यामधले, अंतर कमी होते

सांज सरता तुझी तनू अनामिक, मिठीत माझ्या येते


चोरपावलांनी रात्र आपली हलकेच चाहूल घेते

मंद वाऱ्यासवे येऊन मग, बाहूत आपणा घेते

सकाळ होते रोज पण मी, रात्रीची वाट बघतो

जिथल्या स्वप्नी अवचित मजला, भास तुझा होतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance