आपले हक्क...
आपले हक्क...
अधिकार आहे मला माझ्या हक्कांचा
मी नाही बांधील कुणाच्याही मतांचा
आतापर्यंत हरलो बांधील होतो कित्येकांचा
पण आता मात्र जिंकणार प्रश्न अस्तित्वाचा
कित्येकांचे हक्क कुणापुढे सीमित नाही
प्रत्येकाला असतें आपल मत मांडण्याची ग्वाही
हिच आहे बांधीलकी अन अस्तित्वाची लढाई
म्हणून आपल संविधान मूलभूत हक्क आपल्याला वाही
प्रत्येकांची सुरुवात अन शेवट होतोय सारखा
पण मध्यंतरात बदलतात कित्येकांच्या अनेक तारखा
हे सूत्र त्याचप्रमाणे जणू मरणाच्या वेळी वृद्ध मागतोय खारखा
पण जगताना प्रत्येकाला हक्क मात्र हवाय सारखा
मूलभूत हक्क खरंतर असतात सगळ्यांचेच वारी
मिळायला हवे सगळ्यांना कारण आपण त्याचे कैवारी
पण कित्येक देशांनी ते द्यायला केली टाळाटाळ सारी
म्हणून त्याची साखळी तोंडावी लागेल आपल्याच भारी
आपले मूलभूत हक्क जणू करतात तत्वाना दंग
त्यांच्याशिवाय नाही चढणार जगण्याला रंग
तेच आहे आता आपले ग्रंथ आणि अभंग
हक्क मिळताच मनुष्याच आयुष्य होईल मलंग.
