Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

व्यावसायिक नाते

व्यावसायिक नाते

4 mins
174


      जगात आल्यानंतर सर्वात जवळचे, दिर्घकाळ पर्यंत चालनारे, आणी सर्व चांगल्या-वाईट परिस्थितितुन जाणारे नाते म्हणजे पति-पत्निचे नाते. भारतात प्रचलित पुरुष-प्रधान सत्ता असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात आनी स्वातंत्रोत्तर काळात प्रचलित विवाह-पध्दति मधे जो घरचा मुखियां राहत होता. त्याच्या आवडी-निवडीनुसार मुला-मुलींचे लग्न होत होते. मुलाला जर चुकुन पत्नि आवडली नाही. तर घरचा मुखियां त्याचे दुसरे लग्न करुन देत होता. हिंदुकोड बिलाच्या अंमबलबजावणी नंतर ती पध्दत बंद झाली किंवा तीला आळा बसला होता. तरी त्या काळात मुलीच्या भावनांची व अपेक्षांची नेहमीच उपेक्षा होत होती. देश स्वातंत्र झाल्या नंतर ब-याच्या सामजिक सामाज सुधारकांच्या प्रयत्नला यश येवुन त्यांनी अनेक शिक्षण-संस्थाने जागो-जागी निर्माण केली होती. आणी सरकारला पण ते कार्य करण्यास बाध्य केले होते. त्यामुळे बहुजन समाजात पण मुल-मुली शिक्षित होत होते. त्यामुळे मुलाच्या ईच्छेनुसार तो मुलगी पसंद करत होता. त्याला मुलीची पण घरच्या दबावामुळे मुक सहमती राहत होती. समाजात मुल-मुलींना संविधानाने सारखे अधिकार दिले, त्यामुळे मुलीपण शिकुन डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक व अन्य प्रकारच्या नौक-या किंवा व्यवसाय करु लागल्या होत्या. मुलींच्या शिक्षणामुळे त्यांची विचार करण्याची पातळी उंचावली होती. त्यामुळे मुली पण अनुरुप मुलाची जीवनसाथी म्हणुन निवड करु लागल्या होत्या.

       एका साधार शहरात एक जोडपे होते. दोघेही सरकारी कर्मचारी होते. त्यांचे वरिष्ठानी जुळवलेले लग्न झाले होते. पतिला त्याची वाडवडिलांची जमिन मिळाली होती. आपली नौकरी करुन तो स्वतःची शेति गांवाजवळच असल्यामुळे बघत होता. त्यामुळे परिवाराची आर्थीकस्थिति दिवसेंदिवस बळकट होत गेली होती. त्यामुळे त्याने गांवाला लागुन अजुन शेति घेतली होती. नौकरी व शेतिमुळे परिवराची सारखी तारेवरची कसरत होत होती. त्यांना दोन आपत्य होती. मोठा मुलगा लहान मुलापेक्षा अधिक देखना होता. पण लहान मुलगा मोठया भावापेक्षा बुध्दिमत्तेने जास्त तल्लख होता. मोठया मुलाने बारावीं जेम-तेम पास केली होती. सहयोगवश त्याला बी.फार्म मधे शेवटी –शेवटी नविन उघडलेल्या कॉलेजला प्रवेश मिळाला होता. त्याने बी. फार्मची पदवी प्राप्त केली होती. लहान मुलाला पण मेडिकलला प्रवेश मिळाला होता. खुदा मेहरबान तो गधा पहेलवान. संयोगवश त्याला एम.फार्मला पण प्रवेश मिळाल होता.लहान भावाच्या मदतीमुळे त्याने कसी-तरी एम.फार्मची पदवी मिळवली होती. बुध्दिने तो जास्त हुशार नसला तर त्याची धड-पड करण्याची सवय प्रबळ होती. त्यामुळे त्याला कोणत्यातरी औषधी कंपनीमधे लगेच नौकरी मिळाली होती. वयात आल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना अनुरुप मुलगी पाहुण लग्न करुन दिले होते. मुलगी मुलापेक्षा बघायला डावी होती. पण शिक्षणात व व्यवहारत मुलापेक्षा सरस होती. तीने पण चांगल्या अंकाने एम.फार्मची पदवी मिळवली होती. मुलगा धडपड करणारा होता. तीला जीथे फार्मसी कॉलेजला प्राध्यापकाची नौकरी मिळत होती.तो तीथे तो आपल्या पोटा-पाण्याची व्यवस्था करित होता. दोघांनमधे काही करण्याची जिद्द असल्यामुळे ते चांगल्या भविष्यासाठी अनेक शहरात जावुन वास्तव्य करित होते.

       लहान मुलगा पण एम.डी झाला होता.त्याच्या लगनाची धाव-पळ त्याच्या आई-वडिलांन सोबत त्याच्या मामने पण सुरु केली होती. अनुरुप मुलगी शोधने सुरु झाले होते. ज्या समाजात त्या मुलाचा जन्म झाला होता. त्या समाजातील मुल तर प्रत्येक क्षेत्रात ता-या सारखे चमकत होते.पण त्या समजातील मुली मात्र मेडिकल क्षेत्रात नगन्य होत्या. त्या समाजातील आई-वडिल मुलींना मेडिकल क्षेत्रापासुन अलिप्तच ठेवत होते. त्याच्या मागे त्यांची दुबळी आर्थीक बाजुपण होती.

        मुलाने लग्नासाठी अट घातली होती कि जर मला अनुरुप मुलगी समाजात येत्या दोन वर्षात नाही मिळली तर, त्याला त्याच्या ईच्छेप्रमाने लग्न करण्याची मुभा असावी असा त्याचा अट्टाहास होता. त्यासाठी मुलाचे आई-वडिलव व इतर नातेवाईक प्रयत्नशिल होते.पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नव्हते. अचानक त्याच्या आईला त्याच्या मामे-बहिणीच्या सास-यांचा फोन आला होता. त्यांनी तीला एका अंतरजातिय लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मुलगी बघायला सुंदर आणी एम.डी झाली होती. तीचे आई-वडिल दोघेही शिक्षक होते. जरि त्यांचा धर्म, भाषा व संस्कृति जवळ-जवळ सारखी होती. पण प्रचलित जाति व्यवस्थेमधे ते एक्दम खालच्या जातीचे होते. कदाचित त्यांना पण त्यांच्या जातीत अनुरुप मुलगा मिळत नसावा !. प्रस्ताव मिळाल्यानंतर मुलाने आपली सहमती दर्शवली होती. तो तीला बघायला तैयार बसला होता. तरी समाजातील लोक काय म्हणंतील म्हणुन त्यांनी प्रस्ताव अस्वीकार न करता स्थगित ठेवला होता. त्यांचे प्रयत्न सुरुच होते. पण त्यांना यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी त्या प्रस्तावाला होकार दिला होता.

    मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे लग्न खुप थाटात केले होते. लग्नात दोन्ही कडिल सर्व गन्य-मान्य नातेवाईक व सगे-संबंधी उपस्थित होते. कोणाचा कोणताही विरोधी स्वर काणी पडला नव्हता. सर्वांनी नविन दापंत्याला भर-भरुन आशीर्वाद दिला होता. आणी छान लग्न केले म्हणुन दोन्हीं पक्षांना धन्यवाद दिला होता. हे अंतरजातिय लग्न फक्त व्यावसायिक कारनामुळे घडुन आले होते. इथे मुलगा व मुलीला अनुरुप जीवन-साथी पाहिजे होता. त्यांना समाजात प्रस्तापित जाती व्यवस्थेशी काही घेने-देने नव्हते. त्याच्या मागे त्यांचा निहित व्यावसायिक दृष्टिकोण आर्थीक बाजु मजबुत करण्याचा होता. दोन्ही परिवारांची आर्थीक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिति मजबूत असल्यामुळे समाजातील समाज समर्थक जातिवादी समुदाय त्याचा विरोध करु शकले नव्हते. जर समजातील सक्षम परिवारने, समजा समोर काही आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विरोध न करता तेच समाजातील लोक समर्थन करतात. त्यांनी हा आदर्श व्यक्तिगत कारणाने जरी ठेवला होता. तरी त्याची प्रेरणा घेवून काही छोटे-मोठे व्यावसायिक व इतर आपल्या योग्यतेप्रमाने इतर समाजातील अनुरुप मुला-मुलींशी किंवा प्रेमी अंतर जातिय विवाह सम्मानाने करु शकतील !.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract