Arun Gode

Romance

4.0  

Arun Gode

Romance

मालदीव यात्रा

मालदीव यात्रा

4 mins
196


 एक सेवानिवृत्त भारतीय पर्यटक आपल्या परिवारासोबत प्रथमच विदेश यात्रा करण्यासाठी मालदीव देशाला जातो. परदेशाची यात्रा करने ही त्याचे फार मोठे लहानपणा पासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले होते. कोरोना महामारीला मात देवून शेवटी, तो माले एयरपोर्टला पोहचला होता. आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यावर हवाई अड्ड्याच्या बाहेर आलो होतो. तिथे त्या सर्वांची , एजेंट प्रतीक्षा करीत होता. तो आम्हाला बूक केलेल्या नांवेकड़े घेवून जाऊ लागला होता.तेव्हा समोर विशालकाय समुद्राचे दर्शन झाले होते. तीथे समुद्राचे अलग –अलग भागात निरनिराळया र्ंगांच्या छटा बघून मन एकदम प्रसन्न झाले होते. ते प्राकृतिक सौंदर्य सारखे बघतच राहवशे वाटत होते. पण आमचा एजेंट सारखा घाई करत होता. त्याच्या घाईमुळे आम्ही मोहत्याग करून, त्याच्या मागे जावु लागलों होतो. तिथे आमची बोट लागली होती. नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी आम्ही मुदामुन खुली बोट केली होती. शेवटी आम्ही त्यात स्थानापन्न झालो होतो. एजेंटने प्रवासाच्या शुभकामना देवून आमचा निरोप घेतला होता. 

        आम्हची बोट वेगाने समुद्राच्या येणा-या लाटा तोड़त –तोड़त समोर जात होती. जेव्हा लाट फार प्रचंड मोठी येते होती. तिचे फुवांरे आमच्या वर पाण्याच्या वर्षाव करीत होता. ते ठंडगार पाण्यामुळे आम्ही हर्षित होत होतो. बोट समोर सरकत असतांना, बोट च्या मागे एक पांढरी फट अशी पगदंडी तयार होत होती. तीला बघुन, जणू असे वाटत होते की बोटे साठी, निसर्गाने एक वाटच तयार केली होती . हा नजारा आमच्या सोबत सुमारे दीड घंटा कुरामाती दीव पर्यंत होता. वाटेत मोठे –मोठे जहाजांचे आवागमन सुरू होते. शेवटी आम्ही कुरामातीला पोहचलों होते. तीथे आमच्या स्वागतासाठी स्वागती उभे होते. ते आम्हाला स्वागत कक्षात घेवून गेला होता. जाता–जातच तीथे एका सेवकाने आम्हाला ठण्ड पाण्याचा रुमल दिला होता. त्या रूमालाने आम्ही आमचा चेहरा –मोहरा व्यवस्थित केला होता. लगेच आमच्या साठी दुसरा सेवक थंड पेय घेवून आला होता. त्याचा आस्वाद घेतल्यावर, त्याने आम्हाला आमच्या राहण्याचा खोल्यांची चाबी सुपुर्द केली होती. नंतर आम्ही विद्युत वाहना द्वारे आमच्या रूम वर पोहचलो होते. तीथे ताजे-तवाने होवून  संध्याकाळी समोरच दिसाणा-या समुद्र किना-याचा आनंद लुटण्यासाठी गेलो होतो. सूर्यास्ताची वेळ झाली होती. डुबता सूर्य आपली लालीमा आकाशाच्या क्षितीजावर पसरवित होता. तो सूर्यास्त बघून मन एकदम प्रसन्न चित्त झाले होते. बराच वेळ समुद्राच्या लाटांचा आनंद घेतल्यावर शेवटी आम्ही रात्रीभोज घेतल्यावर आमच्या रूम कड़े प्रस्थान केले व रात्रीच्या विसाव्या नंतर, दुसा-या दिवशीच्या सूर्योदयासाठी, दुस-या समुद्र चौपाटीवर गेलो होतो. सूर्योदया पूर्वी आकाशात तामड पसरलें होते .अनेक पक्षी आप –आपला मार्ग पकडुन आपले भक्ष्य शोधण्या साठी सारख्या घिरट्या एकडुन-तिकडे मारत होते. शेवटी बहुप्रतीक्षित सूर्योदय झाला होता. असे अनेक मोहक ,मनोहर ,मोहित करणारे चित्र आम्ही आमच्या कामे-यात बंद केली होती. त्या दिवशी आम्ही करामती बेटाचे सर्व समुद्र तट बघीतला होता. भारतीय पर्यटकान पेक्षा पश्चिमी पर्यटक भरपूर मात्रा मधे होते. ते विशेष करून सूर्यस्नान करण्यात जास्त व्यस्त होते. संपूर्ण कुरामाती एकदम प्रदूषणमुक्त, ध्वनी मुक्त होते. सर्वत्र एकदम स्वच्छता दिसत होती.  कुठलेच प्रदूषण करणारी वाहने किंवा कारखाने तीथे नव्हते. संपूर्ण देशाचे आर्थीक चक्र हे पर्यटनावरच अवलंबुन दिसत होते. तिसा-या दिवशी आम्ही स्कूबा डायविंगसाठी गेलो. तेथील समुद्राचा आतला भाग पण खूपच स्वच्छ होता. पाणी इतके स्वच्छ होते कि आतील सर्व सागरी जींस एकदम स्पष्ट दिसत होते. त्यानंतर आम्ही परासेलिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलो होतो. त्यासाठी आम्ही एका नावेत खोल दूर समुद्र वर पोहचलों होतो. त्यानंतर एका खुली छत्रीमधे बसुन एका दोराच्या साहयतेने वर उंच आकाशात उडलों होतो. हवेत पक्षा सारखे उड़ण्याचा हा आमचा प्रथमच प्रयोग होता. सुरुवातीला धास्ती बसली होती. सोबत सुरक्षा जकेट असल्यामुळे हादसा झाल्यावर डुबण्याची शक्यता नव्हती. कारण सुरक्षेतेसाठी आजू-बाजूला दोन नांवा तैनात होत्या. खाली विशालाकाय सागर आणी वर निळे आभाळ व तुराळक विखुरलेले ढग , हा नजारा पाहुन  आमचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. दुसा-या दिवशी आमही आमचे राहण्याचे स्थान बदलविले होते. आम्ही वाटर विला मधे स्थानातरित झालो होतो. वाटर विला मधे समुद्राच्या आत मधे राहण्यासाठी कमरे बनावण्यात आले होते. कमा-याच्या आतुनच समोर-मागे विशाल काय समुद्र चौवी तास दिसतो. समुद्राच्या ला टांचा वेग-वेगळया प्रकारचा ध्वनी सारखा कानी पडत होत्या . कमा-या समोर छान एक दालन, त्याच्या समोर किरायेदारच्या हककाचा जलतरण टाकी होती . त्यातील पाणी सतत खेळ होते . आपल्या कमा-या पर्यंत जाण्यासाठी सीलिंक सुविधा होती . त्यावर पर्यटक खूप फिरु आणि छान फोटोग्राफी करू शकता. 

       दुस-या दिवशी आम्ही, समुद्राच्या दोन मोठ्या जल संस्था, ज्या जमीनीच्या भूभागने विभागल्या गेल्या होत्या, त्या बघण्यासाठी गेलो होतो. त्या रसत्यावर आम्ही जेवटच्या टोकावर पोहचलों होतो. जस जशा समुद्राच्या लाटा दोन्ही बाजूनी येत होत्या, तसे तसे शेवटचा शिरा जलमग्न होता जात होता . तसे तसे आम्ही मागे सरकत होतो. हा प्रकार रोज तिथे निरंतर होत असते. ते प्राकृतिक घटनाचक्र पाहण्यात फार आनंद येतो. त्या रसत्याच्या दोन्ही बाजुला पर्यटकानसाठी समुद्राच्या आत पर्यंत विशिष्ट अंतरावर पुल बनावण्यात आले होते .  तिथे सुंदर छायाचित्रण करता येते. तो ही आनंद आम्ही घेतला होता.  दुस-या दिवशी आम्ही मोठ्या नावेने खोल समुद्रात मोठ्या –मोठ्या डॉल्फ़िन बघण्यासाठी गेलो होतो. आमचा नाविक, जेव्हा त्याला दूरून डॉल्फ़िन दिसत होत्या. तो नाव स्थिर करीत होता. अशा प्रकारे आम्ही अनेक बरेच वेळ पर्यंत अनेक डॉल्फिंस बघितल्या होत्या. मग त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही मालदीव मधील रहीवासी भागात गेलो होतो. तिथे अनेक मालदीववासी, त्या टापुत राहत होते . पर्यटकांसाठी अनेक स्थानीय कलाकृतिचे दुकाने उपलब्ध होती.  आम्ही तीथे आठवण म्हणून कुरामातीच्या समुद्र तटाचे चित्र घेतले होते.  त्याच्या पुढच्या दिवासी, आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. यावेळेस , दोन मजली बंद बोटमधे मालेचा परतीचा प्रवास केला होता. तीथे आम्ही हवाई अड्डा परिसरात, जो एका बेटावर बनला होता. तिथे विसावा घेतला होता . होटेलच्या समोरच समुद्र किनार पट्टी होती. त्याचा नजारा कमा-याच्या खिड़कीतून दिसत होता.  काही वर्षा पूर्वी माले राजधानीला जहाजाने जावे लागत होते. आता हवाई अड्डा ते माले राजधानीसाठी सीलिंक बनावण्यात आला होता . दुस-या दिवशी सीलिंक वरुण , सर्वजन माले राजधानी बघण्यासाठी गेलो होतो. राजधानीचा फेर –फटका व काही दर्शनीय स्थान बघितल्या वर, हवाई अड्ड्याला परत आलो होतो. तो पर्यंत आमच्या विमानाची वेळ झाली होती. हवाई अड्ड्याचे छायाचित्रीकरण करून , आम्ही आमच्या जहाजात बसलों होतो. आणि मालदीवचा निरोप घेतला होता. शेवटी बेंगलरुला परत आलो होतो. 

       मालदीव हा अनेक नैसर्गिक दिव मिळुन बनलेला देश आहे.  हे सर्व बेट समुद्र सपाटी पासून, यांची ऊंची फक्त एक मीटर आहे. ज्या प्रमाणे जलवायु प्रदुषण वाढत आहे. व सरासरी किमान तापमानात वाढ होत आहे. जार ही वाढ कायम राहली, तर पृथ्वीच्या पाठीवरजे मोठे मोठे हिम खंड व हिमनद्या आहेत. त्या वितळुन, हे टापु केव्हाही जलमग्न होतील !. जर असे झाले तर , मानव या दुर्लभ प्राकृतिक स्थानाना नक्कीच मुकणार आहे यात शंका नाही।!.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance