Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

घोड चूक .

घोड चूक .

3 mins
160



 दक्षिण भारतातील एका अत्यंत गरिब कुंटुंबात दोघे पति-पत्नी आणी त्यांचा एकूलता एक पुत्र राहत होता. परिवारातील आई-वडील मोल –मजूरी करुन आपला संसार रेटत होते. आजू –बाजूच्या परिस्थितिचा आढावा घेत–घेत त्यांच्या लक्षात आले की जर,त्याला या दारिद्रयातून बाहेर पड़ण्याचा एक मात्र रामबाण उपाय म्हणजे मुलाला शिकवाने. त्यांची परिस्थिति म्हणजे खायाला कोंडा आणी राहायला धोंडा अशीच होती. तरी काट-कसर करुन त्यांनी मुलाला शिकवाले होते. मुलाला आपल्या आर्थीक परिस्थितिची जान होती.  बरेच वेळा तो शाळेची फी भरण्यास असमर्थ राहत होता. त्याचा लहानपना पासून हात तंग होता. अन्य मुला सारखा तो शालेय जीवन जागु शकला नव्हता। तरी परिस्थिति वर मात देत –देत त्याने विज्ञान शाखेत स्नातकची पदवी त्याच्या पदरी पाडली होती। आता आपले वाईट दिवस  संपेल आणी घरी टुपाचे दिवे लागतील असे परिवारला वाटत होते। तसे योग ही आले होते। युवाकाला एका वैज्ञानिक विभागात साहायक वैज्ञानिकची नौकरी लागली होती। चांगला पगार मिळत होता। आई-वडील फार आनंदी होते। वय झालायामुळे मुलाचे लग्न करण्याचा त्यांचा बेत होता। पण मुलाच्या डोक्यात काही आपले विचारांचे चक्र सारखे भ्रमण करीत होते। त्याला लहान पणा पासुने जे उघडया डोळयांनी बाघितलेले स्वप्न पूर्ण करावयाचे होते। बाल पणा पासून त्याने बाघितले होते। की त्याच्या आजू-बाजूच्या परिवातील काही मुले परदेशात गेली होती। त्यांनी तिथे जावून त्यांचे स्थानीय खाद्य पदार्थ जसे वडा सांभार इटली –डोसा वैगरे विकुन अतोनात संपत्ती जमावली होती। त्या साठी तो तसा विचार करून प्रयत्न करू राहिला होता। विभागाचे बरेच कर्मचारी प्रक्षीशाणासाठी  विभागा तर्फे विदेशात जात होते। तो पण त्या प्रयण्यात होता। त्याला विदेशात जावुन त्याला करावयाच्या व्यवसायाचा आढावा घ्यावायाचा होता। पण त्याला सफलता मि ळाली नव्हती। इकडे लग्न करण्यासाठी आई –वाडिलांचा खूब दबाव होता। पण तो येणार सर्व निरोप परतवून लावत होता। बरेच प्रयत्न केल्या वर त्याला आपले स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग सापडत नव्हता।

 प्रयत्नाती परमेश्र्वर। शेवटी एक आशेचे किरण त्याला गावसले होते। एका परिवारचा लग्ना साठी निरोप आला होता। त्या परिवारात दोन मुलीच होत्या। परिवार साधारणच होता। पण जमेची बाजु म्हणजे मुलगी तीच्या ताई सोबत अमेरिकेत राहत होती। तीच्या नवा-याच तीथे व्यवसाय होता। मुलगी तीथे नौकरीच्या शोधात होती। त्यामुळे त्याची लग्न करण्याची रुची वाढली होती। त्याने तीच्याशी लग्न करण्याच आपला कल आई –वाडिलांना दाखवाला होता। त्यांना तो संबंध आवडला नव्हता । तरी ते त्या साठी तयार झाले होते । त्यांना भिती होती की नंतर तो दुस-या मुलीशी कदाचित लग्न करणार नाही !। आपला मुलगा शिकला आहे त्याला आपल्या पेक्षा जास्त ज्ञान आहे । तो हे सर्व विचार करुणच करत असावा.शेवटी त्याचे त्याच मुली सोबत लग्न लावून देण्यात आले होते।

 इकडे राज्य राणीचा संसार आनंदात सुरू होता। पण काळाने पलटी मारली होती । चार –सहा महिण्या नंतर तीच्या ताईचा फोन अमेरिकेवरून आला होता। तीला एका कंपानी मधे जॉब मिळाला होता। त्यासाठी तीला बोलवण्यात आले होते। एकड़े युवाकाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता। त्याला आपली श्रीमंत मानुस होण्याची स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती सुवर्ण संधी वाटली होती। त्याने ताड़-ताडीने पत्नीला अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्याला पूर्ण विश्वास होता की भविष्यात त्याला पण अमेरिकेत जाण्यासाठी पत्नीच्या आधारवार वीजा मिळेल . व तो त्याचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल !। शेवटी ती अमेरिकेला गेली होती। बराच काळ लोटला गेला होता। तरी त्याचा साड भाऊ त्याच्या वीजा मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत नव्हता। शेवटी त्याच्या हाती निराशा लागली होती। अचानक त्याचा पत्नीच्या आई-वाडिलांची एका अपघात असमयी मृत्यु झाली होती। ही बातमी त्याने त्याच्या पत्नीला दिली होती। त्याला ठाम विश्वास होता की त्याची पत्नी नक्कीच परत येईल !। त्याचा साड़ भाउचा फोन आला होता की ते सर्वजन अंतिम संसकारा साठी कदाचित वेळेत येवु शकणार नाही !। त्यामुळे सर्व धार्मिक विधि वेळेतच पूर्ण करुण टाकावयात असा अनुरोध त्याने केला होता। लहान जवायाने मुलगा समजून सर्व विधी आटपल्या होत्या । तो त्यां ची सारखी वाट बघत होती। शेवटी त्याने तेरवीचा पन कार्यक्रम पार पाडला होता। आता त्याला आपली फसवाणुक झाली असे वाटत होते। कारण त्याण्ची येण्याचे काहीच चिन्ह त्याला दिसत नव्हते। त्याने खोटी स्वप्न बघून आपली पत्नीनी पण गमवाली होती याची खात्री त्याला पाटली होती। त्याने तीला घटस्फोट देण्याचे ठरविले होते॰ तसा त्याने वकीला मार्फत कानुन नोटिस पाठवाला होता।

 तिकडे परिस्थिति वेगळीच होती। तीच्या ताईला वैद्यकीय त्रुटी मुळे भविष्यात कधीच मूल –बाळ होण्याची शक्यता नव्हती। तिच्या जळ सिमित पर्याय होते। एक तर त्यांना दुसा-याचे बा ळ दत्तक घेणे बाग होते। दूसरा पर्याय तीच्या नवा-याचे दूसरे लग्न करून देने । पण या दोन्ही गोष्टी अमेरिकेत अवघड होत्या। त्यामु तिने मधला मार्ग शोधला होता। तिने आपला धाकट्या बहिणीला तीच्या पति कडून गर्भ धारण करण्यासाठी प्रेरित केले होते। तीने गर्भ धारण केला होता। पण तीचा डाव तीच्या आई –वाडीलांच्या आकाळी मृत्यु मुळे फासला होता। त्या करणामुळे ते सर्वजन अंतिम संस्काराला येवु शकले नव्हते. पण वे ळे चक्र उलटे फिरने सुरू झाले होते। पतीच्या घटस्फोटच्या नोटीस मुळे तिची अवस्था इकडे आड़ तिकडे विहिर अशी झाली होती। तीने पण प्रतीऊतरात पोटगी आणी संपातीत अर्धा हिस्सा मागीतला होता। आता तीचा पती सापळयात अड़कला होता। श्रीमंत होण्याच्या नादात त्याचे अष्टकोणी वाटोळे झाले होते। त्याला काही मार्ग सुचट नव्हता । आता त्याच्या हातून तेल गेले , तूप गेले आणी धूपटने हाती लागले होते। त्याच्या पदरी फक्त निराशा आली होती। 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract