STORYMIRROR

Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

जनसेवक

जनसेवक

3 mins
226


 एका साधारण मोठ्या शहरात एक कुंटुंब राहत होते. कुंटुंबाची आर्थीक परिस्थिति फारच नाजुक होती. खायला कोंडा आणी राहयला धोंडा अशीच होती. ज्या काळात, मोहल्यात सर्वत्र विजेचा वापर होत होता. तेव्हा पण त्यांचा घरी रॉकेलचे दिवे वापरत होते. त्या दिव्याच्या प्रकाशातच घर मालक रात्री सोसायटीच्या दुकानाचा हिशोब करित होता. त्याला दोन आपत्य होती. सोबतच त्यांचा मामा पण शिकायला होता. त्याचे भाचे, त्याला मामा म्हणतं होते. भाचाचे सर्व मित्रपण त्याला मामा म्हणतं होते. मामा फार मिलनसार व्यक्ति होता. अडि-अडचणीच्या वेळस तो प्रत्येकाची मदत करित होता. त्यामुळे त्याला मोहल्यातील सर्वचजन, मानाने मामा म्हणुन ओळख्त होते. हळु-हळु तो पुर्ण गावाचा जगत मामा झाला होता. तो पण खाजगी दुकाणात काम करत होता.

       शहरातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहिर झाला होत्या. जुना नगरसेवक फारसा सक्रिय कार्यकर्ता नव्हता. त्याच्या कारकिरदीत त्याने केलेल्या अल्प कार्यामुळे नगरातील नागरीक संतुष्ट नव्हते. तेव्हा, त्याच नगरातील वरिष्ठ नागरिकंनी एक बैठक बोलवली होती. त्या बैठकी मधे, यावेळेस कोणत्या उमेदवाराचे समर्थन करावयाचे यावर चर्चा सुरु झाली होती. बरेच लोकांच्या नावांवर चर्चा झाली होती. पन सहमती होऊ शकली नव्हती. शेवटी एक्मताने, मामाचे नांव, त्याची इच्छा नसतांनाही शिकामोर्तब करण्यात आले होते. आनी असे मामा नगरसेवक बनले होते. मामांनी दोन नगरसेवकाच्या कारकिर्द पूर्ण केल्या होत्या. तो दोन्ही कारकिर्दी मधे बांधकाम समितीचा प्रमुख होता. मामांनी नगरामध्ये गरिब नागरिकांनसाठी सर्व सोईयुक्त शौचालय बनवले होते. नगरात पक्या नाल्या, रस्ते व मुलांनसाठी क्रिडांगण आणी बगीचा पन बनवला होता. सफाई कर्मचारी नियमित येवुन नगरात स्वच्छता ठेवत होते. असे भरिव कार्य, मामाने अन्य नगरात पण केले होते. उत्तम नगरसेवक म्हणुन मामाचा शहरात डंका वाजत होता.

       पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या. ब-याच राजनैतिक दलाने मामाला त्यांच्या पक्षाचे टिकिट देवु केले होते. पण मामा सिध्दांत -वादी होता. मला राजनीति करायची नाही. मला फक्त जनतेची सेवा करावयाची आहे. असे तो नेहमीच म्हणतं होता. मी स्वतंत्र्य उमेदवार होतो, आनी समोर पण राहणार !. मी मोडीन पन वाकनार नाही. शेवटी नेहमी प्रमाने मामा अपक्ष उमेदवार म्हणुन निवडुन आले होते. कोणत्याही पक्षाला पुर्ण बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे अध्यक्षाची निवड करण्याचा पेच निर्मान झाला होता. कोणताच पक्ष दुस-या पक्षाच्या उमेदवाराच्या नावांवर सहमती देत नव्हता. शेवटी एक मताने ठराव पास करण्यात आला होता. मामाला नगरपालीकेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. असे मा

मा , त्याच शहराचे सम्मानित नगरपालीका अध्यक्ष बनले होते.

       अध्यक्ष बनल्यामुळे मामांचे जंगी स्वागत, सत्कार करण्यासाठी एका मोठ्या सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात चांगलीच भीड जमा झाली होती. त्या कार्यक्रमात, शहरातील गण्य-माण्य नागरिक पण उपस्थित होते. तो लोकप्रिय जगत मामा असल्यामुळे, बोलना-या व्यकत्यांचा तांता लागला होता. प्रत्येक जण, आप-आपल्या योग्यतेप्रमाने, मामांच्या कार्याची स्तुति करत होते. कोणी त्यांना कर्मठ सेवक, सच्चा जनसेवक, जनकल्याणकारी,गरिंबाचा कैवारी ,दुरदृष्टा असे संबोधित करत होते. कोणी त्यांची कामची गती व धाडसी नेतृत्व पाहुन, त्याची तुलना वाघा सोबत,तर कोनी शिवाजीच्या छावा संभाजी सोबत करित होते. आयोजीत सभा ही मामाच्या जीवणातील असमरणीय सभा बनली होती. ऐवढी मोठी सभा नगरापालेकिकेच्या अध्यक्षासाठी भूतकाळात कदाचितच संपन्न झाली असावी !.  

       लोकांचा विश्वास व प्रतिसाद बघुन, जनता आपल्या सोबत असल्यामुळे मामांनी शहर विकासाचे कार्य धडल्याने सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी सर्व नगरसेवेकांचे सहकार्य घेतले होते. ते सर्व सहकार्य करित पण होते.पण मामा फार ईमानदार असल्यामुळे, त्यांची कुठेही दाळ गळत नव्हती. त्यांना कसल्याही प्रकारचा गोरखधंदा करण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. शेवटी सर्व दलाचे नगर सेवक मामांनकडे, आपला प्रस्ताव घेवुन गेले होते. त्यांनी मामांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला कि राजनितिक पक्ष सांभाळण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यासाठी काही प्रमाणत, पैशाची नगरपालिकेच्या कामा मधे उला-ढाल करावी लागते. पक्षवाल्यांना काही अंशदान, पक्षाच्या कोषागार मधे पण द्यावा लागतो. त्यामुळे मामांनी छोट्या-मोठ्या गैरव्यवहारत विनाकारण आपले नाक खुपसु नये, असा अप्रत्यक्ष इषारा दिला होता. अन्यथा ते सर्व पक्षवाले , आपले समर्थन वापस घेतील आणि मामाला अध्यक्ष पद गमवावे लागेल !. या चेतावणीमुळे, मामाचे कान उभे झाले होते. ते आता धर्मसंकटात सापडले होते. आता मामासमोर ईमानदारी कि अध्यक्ष पद याच्या शिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. मामांनी बराच वेळ त्यावर मंथन केले होते. मी मोडिन पण, वाकणार नाही असा त्यांनी ठाम,ठोस निर्णय घेतला. मामांनी विचार केला की कोळशांच्या दलालीत आपले हात काळे करण्यापेक्षा, अध्यक्ष पद गेलेले चांगले .व मामांनी शेव्टी अध्यक्ष पदा सोबतच नगरसेवकाचा राजीनामा दिला होता. असा मामाचा जनसेवेचा अंत झाला होता.जर शहरातील, राज्यातील आणि देशातील नागरिकांनी, मामासारखे ईमानदर, आपले जन-सेवक निवडुन दिले, तर देशाला विश्र्वगुरु बनण्यास वेळ लागणार नाही.!.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract