Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

धोकादायक निर्णय.

धोकादायक निर्णय.

3 mins
240


       एका मोठ्या शहराच्या नवीन वस्तीमधे एक कुंटुंब राहत होते. त्या जोड़प्याला दोन अपत्य होती. घरधनी एका सरकारी उपक्रमात कार्यरत होता. त्याच्याकड़े पर्याप्त वाड-वड़ीलांची शेती होती. शेती कार्य स्थळापासुन साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर होती. त्यामुळे शेती पन त्याच्यासाठी दुपती म्हैस होती. त्याने ,त्या नवीन वस्तीत, सेवानिवृतीच्या पूर्वीच परिवारासाठी भले मोठे घर बांधले होते. आर्थीक संपन्नता असल्यामुळे, त्याने आपल्या दोन्ही होतकरु मुलांन वर, शिक्षणासाठी भरपूर खर्च केला होता. मुले पन सुंदर परिणाम परत फेड म्हणून देत होते. मोठ्या मुलाच्या पायावर पाय देत, लहान मुलगा पन इंजीनियरिंगला गेला होता. आई –वडील अत्यंत खुश होते कारण त्यांनी घेतलेले काष्टाचे फळ, त्याना हळु-हळु मिळने सुरू झाले होते. मोठा मुलगा अभियंता म्हणून पदवी घेवून बाहेर पडला होता. त्याने प्रथम जॉबसाठी आपल्याच शहरात प्रयत्न केला होता. पन त्याला , त्या शहरात अपयश मिळाले होते. पदरी अपयश मिळत होते. जेव्हा देव एक दरवाजा बंद करतो॰ त्याच वेळी दूसरा दरवाजा उघड़तों. त्याची एक वर्ग मैत्रीण होती. त्यांच्यात एक –मेका विषयी जीव्हाळा सुरुवाती पासूनच होता. पण प्रेमाची मशाल अजून पेटली नव्हती. तीला एक मोठ्या शहरात, एका नामी कंपनी मधे जॉब मिळाला होता. तीच्या मगो-माग, तीच्या प्रियकराने पण प्रयत्न केला होता . आणी त्यात त्याला यश मळाले होते. जुनी मैत्री आता हळु-हळु रंगात येत होती. त्यांचे विचार एक-मेकांना पटु लागले होते. प्रेमाची मशाल आग पकड़ू लागली होती. त्याच्या धाकटा भाऊपण अभियंता झाला होता. सुदैवाने त्याची निवड त्याच शहरात, एका दुसा-या कंपानी मधे क्मपस द्वारा झाली होती. आई –वडील, दोघेही अत्यंत खुश होते. त्यांनी जसे चितले होते, तसेच घडत गेले होते. आता मुले सतकर्मी लागले होते ,हे बघून आई-वाड़ीलांनी मोठ्या मुलासाठी समाजामधे अनुरूप मुलगी शोधने सुरू केले होते. काही योग स्थळ मुलासाठी आले पण होते. मुलाला त्याची पसंदी करण्याठी प्रेरित करीत होते. तिकडे त्याचे प्रेम प्रकरण वेग पकडु लागले होते. तो आता कचाटयात सापडला होता. काही मार्ग निघेल, असे त्याला सारखे वाटत होते. 

       एक दिवशी, त्याचे काही मित्र –मैत्रीणी पिकणिकसाठी सप्ताहाचया सुट्टी मधे गेले होते, पिकणिक संपल्यानंतर परतीच्या वेळेस आंधळया वळनावर, एका वाहणाला वाचवातांना त्याची बाईक घसली होती व तो एका मोठ्या दगड़ावर जावून आदळला होता. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला इतका भयनंकर मार बसला होता कि तो जाग्यावारच बेहोश झाला होता. रकताचा स्त्राव सारखा सुरू होता. त्याच्या प्रियसीला पण ईज़ा झाली होती. पण त्याची अत्यंत नाजुक हालत पाहून, तीने स्वतःला साभाळले होते. अन्य मित्र –मैत्रीणींच्या मदतीने, त्याला लगेच दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.सर्ववांच्या प्रयत्यांनी त्याचे जीव वाचला होता. पण त्याचा मेंदू सामान्य कार्य करीत नव्हता. त्याचे तीन –चार मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बऱ्याच उपचारानंतर, तो किंचित सामान्य झाला होता. पण मेंदु पूर्वी सारखा संवेदनशील व कार्य नव्हता. त्यामुळे त्याची नौकरी गेली होती. आता त्याची हालत, असेल माझा हरी, तर देईल खाटीवारी असी झाली होती. त्याच्या अपघाताची व विकलांगतेची माहिती वा-या सारखी समाजात आणी नातेवाईकात पसराली होती. त्याच्या ल्ग्नाची कोन्हीच गोष्ट उचलुन धरत नव्हते . आई –वडील आता सापाळयात अड़कले होते. काही मार्ग सुचत नव्हता.  दैव देते आणी कर्म नेते असे झाले होते . त्यांना आत्मविश्वास झाला होता की आता मुलाचे लग्न होने शाक्य नाही. आई-वडीलांचे रक्त आता पांढरे पडु लागले होते. तीघांची अवस्था एकदम बिकट झाली होती. नंतर मुलाने, आपले प्रेम कहाणी आई –वाडिलांना सांगताली होती. ती मुलगी त्याची वाट बघत होती.  जरी ती त्याच्या सोबत नांदयला तयार होती. ती मुलगी त्यांच्या समाजाची नव्हती. ती आदिवासी समाजाची आसल्यामुळे, त्यांना ते पटत नव्हते.  शेकटी मुलाची अत्यंत खराब परिस्थिति पाहून, ते तयार झाले होते. मुलीला जेव्हा मुलाकडून लग्नासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता , तेव्हा मुलीने आपल्या हाल –चाली तेज केल्या होत्या. आई-वडिलांना नेहमी विवाहासाठी  टालोम-टोल करणारी मुलागी एकदम सक्रिय झाली होती. तीच्यातील रक्त प्रवाह अति –वेगाने संचारित होत होता. आई –वडील समाजातील अनुरूप मुलांनसाठी सारखी धरपड करीत होते. पण त्यांना अनुरूप मुलगा गवसात नव्हता. शेवटी मुलीने आपली प्रेम कहाणी आई-वाडिलांना सांगितली होती, आणी बजावले होते कि ती फक्त त्याच्या सोबत लग्न करेल !. अन्यथा ती लग्न करणार नव्हती. या चेतावणीमुळे, परिवारवाले तीच्या भावानांनमधे गुंडाळले गेले होते. त्यांच्यासाठी, एकड़े आड़ व तिकडे विहिर अशी परिस्थिती निर्माण झाली होती . शेवटी नाइलाजास्तव, त्यांनी लग्नासाठी मूक सहमती दिली होती कारण अड़ला नारायण गाढ़वाचे पाय धारी. त्यांनी मुलाच्या कुंटुंबाशी संबंध साधला होता. दोन्ही परिवारामधे लग्नाविषयी सहमती बनाली होती.आपल्या मुलीचे लग्न, आपल्या पेक्षा उंच जातीत होत होते, याचे त्याना कुतुहल होते. पण त्यांची मुलगी किती मोठा धोका पतकरीत होती याची जान त्यांना नव्हती. मुलीने प्रयत्न करून, मुलाच्या गावीच, दुसऱ्या कंपनीत, कमी पगाराची नोकरी पत्करली होती. त्यांचे लग्न झाले होते. ती आपल्या पतीसाठी, सोबतच नोकरी करून , परिवाराची प्रेमासाठी निःस्वार्थ सेवा करीत होती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract