STORYMIRROR

Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

आणीबाणीत मानवीय व्यवहार

आणीबाणीत मानवीय व्यवहार

3 mins
168


 एका मोठ्या शहराच्या नवीन विकसित होणा-या कॉलोनी मधे काही नेमके परिवार राहत होते. वस्ती फार दाट नव्हती. एक्का-दुक्का घरे ब-याच अंतरावर विखुरलेले दिसत होते. प्रत्येकाला मदतीची गरज भासत होती. एका नवीन परिवाराचे घर काम चालू असतांना, त्यांच्याकड़े एक माल वाहक चालक येत होता. हळु-हळु त्या इसमाची घट्ट ओळख त्याच्या परिवाराशी झाली होती. त्या व्यक्तीचा व्यवहार एकदम शालीन आणि सभ्य होता. त्यामुळे त्या परिवाराला, त्याच्या विषयी प्रेम आणि आदर वाटत होता. त्यांची मने एकमेकांशी जुळली  गेली होती. त्यांचे घर काम पूर्ण झाल्यावर, घराचा वास्तुचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामधे त्या चालकाला परिवारा सोबत बोलावण्यात आले होते. तशी पहिलेच दोन्ही परिवाराची कधी –कधी भेट –गाठ होत होती. त्याला तीन मुलें होती. घर खर्च चालवण्यासाठी मुलांची आई घरघुती काम –काज करीत होती. अनायसे घर बांधनीच्या वेळस, जी झोपड़ी बांधली होती. ती तसीच साबुत होती. त्यामुळे त्या परिवाराने, त्यांना राहण्यासाठी देण्यात यावी अशी विनंती केली होती. अनायसे आपल्या संगातीला कोणी असावे असे त्याना वाटतच होते. त्यामुळे त्या परिवाराने त्यांची विनंती मान्य केली होती. त्या चालकाची पत्नी, त्यांच्या कड़े व आजू-बाजूला मोलकरनीचे काम करू लागली होती. दोन्ही परिवार एक –दुस-याच्या मदतीने आनंदात दिवस काढत होते. त्यांची मुले मोठी होवून शाळेत जावू लागली होती.

      अचानक त्या वाहन चालकाचा, एका अपघातात मृत्यु झाला होता. त्यामुळे त्या परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले होते. काळ कोणा साठी कधीच उभा राहत नसतो. त्या परिवाराचे पण जीवन चक्र कसे –बसे सुरू होते. आता आजू –बाजूला चांगली डाट वसती झाली होती. त्याच कॉलोनीत अजून एक नवीन वाहन चालक आपल्या पत्नी सोबत राहत होता. पण तो एका कंपनीत चालक होता. त्याच्या पत्नीची ओळख, त्या मुलांच्या आई सोबत झाली होती. त्यांची घट्ट मैत्री होती. आता तीचा मोठा मुलगा लोकांच्या घरी पोळया करण्याचे काम करू लागला होता. हळु-हळु त्याचा व्यवसाय गती पकड़ू लागला होता. कुठे –कुठे तो संपूर्ण जेवनच बनवीत होता. आता त्या कॉलोनीचा चांगला विस्तार झाला होता. तिथे महिला मंडळ पण स्थापित झाले होते. त्या मंडळाच्या महिला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेत होत्या. त्यांच्या कार्यक्रमासाठी नाश्त्याची गरज राहत होती. ते कार्य त्या मुलाला मिळु लागले होते. आता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरत चालली होती. त्याला छोटे –मोठे कॅटरींगचे काम भेटत होते.

       अचानक त्यांच्या शेजारी राहणा-या, त्याच्या आईच्या मैत्रीणीची प्रकृति खराब झाली होती. ती आई होणार होती. त्या परिवाराने तिचा पति नसत

ाना दवाखाण्यात तिला भरती केले होते. तेव्हा डॉक्टरांनी, बाळाला जन्म घालण्या साठी सिझर करने अत्यंत जरूरी आहे असे सांगितले होते. तेव्हा तीच्या पतीने आवश्यक पैशाचे जुगाड़ करून, त्यांच्या बेबीला हे जग दाखविले होते. सर्व काही ठीक असतांना ,जेव्हा तीचा पती, तीला भेटून कामाला जायला निघाला होता. त्या नंतर तीला आठवले की डॉक्टरांनी काही औषधी आणायला सांगितले होते. तो परचा बघता –बघता, तीचा पति खूप दूर निघून गेला होता. त्याला पकड़ण्यासाठी, ती वेगाने त्याच्या मागे जावू लागली होती. व ती,काही अंतरा नंतर , लगेच खाली कोसळली होती. त्या घटनेत तीचा लगेच मृत्यु झाला होता. आता तो चालक विदूर झाला होता . आणि ते बाळ बिना मातोश्री मुळे अनाथ झाले होते. ती परिस्थिति फारच गंभीर होती. काय तोडगा निघेल हे तर प्रकृतिलाच माहीत होते. बाळाच्या आईचे आणि तीच्या मैत्रीनीचे जरी रक्ताचे नाते नव्हते, तरी काही काळातच त्यांचे संबंध रकता पेक्षा घट्ट व एकजीव झाले होते.दैव देते आणी कर्म नेते, याचा अनुभव शिशुच्या पालकाला झाला होता. मुलांची आई पण, त्याच अवस्थेतून कशी –बशी बाहेर पडली होती. तीला वास्तविक पारिस्थितीची पूर्ण जाणीव होती. म्हणून तीने एक संकल्प केला होता. जो पर्यंत ते बाळ साधारणता मोठी होत नाही. तीची संपूर्ण जवाबदारी ती पार पाड़ेल !. यात तीच्या मुलांचा पण सहयोग होता. वेळ आणी समुद्रात येणारी भरती कोणाची वाट पाहत नसते. ती मुलगी चालायला शिकली होती. तिच्या वड़ीलांनी , त्या परिवाराचे मनपूर्वक आभार मानले होते.बेबीच्या पालन –पोषणाची जवाबदारी आता त्याने घेतली होती. आपली वास्तविक परिस्थितिची संपूर्ण माहिती, त्याच्या नवीन होणा-या पत्निला देवून, मुलीचा सांभाळ करण्यासाठी आई आणली होती. व त्याला एका चांगला कंपनीत चालकाची नौकरी पण मिळाली होती. सुखद व चांगल्या गोष्टीची वाट पाहणा–यांन सोबत घटत असतात . त्या परिवारांची पण भर –भराट होने सुरू झाले होते. 

    त्या परिवाराने कोरोना काळात, पीड़ित परिवारांना, ज्यांची कोणी मदत करू शक्त नव्हते , त्यांच्या घरी नाश्ता आणि दोन्ही वेळेचे भोजन पोहचविले होते. त्या नंतर त्याला बरेच कॅटरिंगचे छोटे –मोठे ठेके मिळत गेले होते आणि त्याच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली होती . चांगल्या कृतिमुळे त्यांचे दिवस पालटले होते. आज तो काटरिंग सोबतच ,सर्व कार्यक्रमाच्या संलग्न व्यवसाय सुध्दा करतो. त्याच्या कड़े आता, नियमित जेवणाचे डब्बें घेणा-याची झुंबड मचली असते. आता त्याची गणना व्यावसायिक मधे होते. त्या मागे त्याच्या परिवाराचे संपूर्ण पाठबळ व परिवाराची मेहनत नक्कीच होते.प्रयत्न केल्याने ,परमेश्र्वर सुध्दा भेटू शकतो, याची प्रचिती झाल्या शिवाय राहत नाही .



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract