प्रेम शोकांतिका.
प्रेम शोकांतिका.
एका मोठ्या शहरातील, विज्ञान शाखेत स्नातक झालेली व मागासवर्गीय मुलीला, केंद्र सरकारच्या एका विज्ञान विभागात नौकरी मीळाली होती॰ पण तीची प्रथम तैनाती, मुंबई सारख्या मोठ्या शहरात झाली होती॰ तीचे वास्तविक दिसणारे व्यकितमत्व एकदम काही डोळयात भरणारे नव्हते॰ साधारणता तीची ऊंची पाच फुटापेक्षा कमीच , सड़पाताळ आणी रंगा कृष्णधवल होता॰ पण मनाने ती फार धाड़सी होती॰ नेतृत्व करण्याची क्षमता तीच्यात होती॰ तीने तो जॉब स्वीकारला होता॰ तीने हळु-हळु तीची पैठ, त्या कार्यालयात जमवाने सुरू केले होते॰ मनाने ती मोकळी आणी मिलनसार असल्या मुळे ,तीची अनेक अधिकारी आणी सहकर्मिन सोबत घनिष्ठ संबंध जमले होते॰ कार्यालय मोठे असल्यामुळे, तीथे अनेक कर्मचारी कार्यरत होते॰ तीची मित्रता एका रूपवान अविवाहित गायका सोबत झाली होती॰ तीची,त्या युवकामधे रुची असल्यामुळे, तीने त्याच्या सोबत संबंध हळु-हळु घट्ट केले होते॰ जरी ती आकर्षक दिसणारी मुलगी नव्हती , तरी तीच्यात चाँगुलपणाचे जन्मजात, कदाचित आनुवंशिक गुण असावेत॰ प्रत्येकाच्या सौंद-याकड़े बघण्याचा दृष्टिकोण, वेग-वेग ळा असतो॰ युवकाची आणी मुलीची घट्ट मैत्री, हळु-हळु प्रेमात केव्हा बदली ,ते दोघांनाही माहीत पडले नव्हते॰ पण त्या दोघात, काही तरी असला प्रकार सर्वांना जानवत होता॰ मुलाकड़े बघून, सर्वांना वाटत होते की तो तीच्यासोबत नुसता वे ळ घालवत होता असे त्यांना वाटत होते. कारण मुलाच्या आकर्षक व्यक्तिमत्वा समोर ,ती कुठेच, त्याच्या पासणात बसत नव्हती ॰ दोघांन मधे जातीय वर्णभेद होता ॰ ती एकदम जाती व्यवस्थेच्या निम्म श्रेणीत, तर मुलगा उच्च श्रेणीचा होता॰ तरी त्यांचे प्रेम संबंध फार गाढ़ होते॰ सर्व सहकर्मियांन मधे, तो एक, आम चर्चे विषय होता ॰ त्यांच्या प्रेमाचे कोड़े न सुटणारे होते॰ त्या महामायाने, अशी कोणची जादू त्याच्यावर केली होती की तो, कार्यालयातील , सुंदर मुलींना सोडून, तीच्यात त्याने जीव ओतला होता॰ ती म्हण प्रत्येकशात सर्वांना पटली होती॰ जब दिल लगा गाधीसे , तो परी क्या चीज हैं ?॰ प्रेम हे आंधळे असते, त्याची प्रचिती सर्वांना झाली होती॰ तरी कोणालाच, त्यावर विश्वास बसत नव्हता॰
त्याच्या काही मित्रांना आतली बातमी मिळाली होती की, ते लवकरच विवाहबध्द होणार होते॰ तेव्हा याची माहिती, एका त्याच्या परिवाराच्या शुभचिंताकाने, त्याच्या परिवाराला दिली होती॰ त्यामुळे कुंटुंबामधे तनाव निर्माण झाला होता॰ मुलाची समजूत घालण्याचा, अनेक हितचिंतकांनी भरपूर प्रयत्न केले होते॰ पण ते अपयशी ठरले होते॰ शेवटी मुलांच्या आई-वाडीलांनी, कार्यालय प्रमुखाची भेट घेतली होती॰ त्यांनी प्रमुखासमोर आपली पगड़ी, त्याच्या समोर उतरवाली होती॰ संपूर्ण प्रसंग आणी समोर येणा-या अडचणी, त्याच्या समोर ठेवल्या होत्या॰ शेवटी त्यांच्या विनंती वर मुलाची बदली एका दूर्गम स्थानी करण्यात आली होती॰ परिवाराच्या इच्छेविरूध्द्द, तो बंड जाहीर करू शकला नव्हता॰ शेवटी त्या प्रेमाचा तीथेच अंत झाला होता॰ त्याने आई-वडीलांच्या इच्छे प्रमाणे लग्न केले होते॰ या घटनेने ती मुलगी दुखावली होती॰ शेवटी तीने पण आपली बदली मूळ गांवी करूँन घेतली होती॰ नवीन उत्सवाने , तीने तीथे आपले कार्य करने सुरू केले होते॰ त्या नवीन कार्यालयात, तीने तेथील यूनियनमधे, आपला सहभाग देने सुरू केले होता॰ ती तीथे, महिला शाखाची नेता बनाली होती॰ व आपल्या नेतृत्व क्षमतेचा उपयोग करूँन , कार्यालीयन महिलांच्या समस्या सोडवत होती ॰ तीथे ती एकदम रमली होती॰ काळा सोबत , ती सगळ विसरली होती॰जनु तीच्या भूतकाळात काही घडलेच नाही असे तीला बघून वाटत होते॰
अचानक तिच्या जीवनात, एक परिवर्तनाचा योग आला होता॰ तीच्या समाजाचा, एक नवयुवक अधिकारी म्हणून त्या कार्यालयात आला होता॰ संयोगाने ती ज्या अनुभागात कार्यरत होती॰ तीथेच त्याची तैनाती झाली होती॰ हळु-हळु त्यांचा संपर्क वाढतच गेला होता॰ या प्रकारत, आग फकत एकाच बाजूला लागली होती॰ तीचे स्वप्न होते की तीने कोणाशी तरी प्रेम करावे ! ,आणी तीचा प्रेमी तीच्या पेक्षा मोठ्या पदावर् आणी रूपवान असावा, उंच जातीतला असला तरी फारच उत्तम॰ तीच्या हाला-चाली पाहून, सगळयाना ते दिसत होते॰ जुन्या प्रेम संबंधातुन ती सावध झाली होती॰ त्यामुळे त्या अधिका-याची दाळ तीच्या सोबत काही गळली नव्हती॰ तो भयंकर धूर्त व्यक्ति होता॰ त्याचे, त्याच्या घरी काम करणा-या मुलीसोबत अनैतिक संबंध होते॰ ती कामवाली मुलगी, त्याच कार्यालयातील , एका चतुर्थश्रेणी कर्मच्या-याची कन्या होती॰ त्याच्या खोट्या आश्र्वासनाला ती बळी पडली होती॰ तीने गर्भ धारण केला होता॰ शेवटी त्याचे पीतळ उघड़े पडले होते॰ पण, तो,त्या मुलीशी विवाह करण्यास मनाई करत होता॰ वसाहतीतील वातावरण तापाले होते॰ शेवटी अजून काही गैर प्रकार घडू नए म्हणून कार्यालय प्रमुखाने, त्याची बदली एका दूर्गम स्थानी केली होती॰ हा सर्व प्रकार घड़ल्या मुळे तीच्या मनाला ठेस पुन्हा लागली होती॰ तीच्या कड़े बघण्याचा सर्वाँचा हेतु वाईट होता॰ ते सर्व तीच्या कड़े चेष्टेने पाहत होते। असे करण्या मधे त्यांना फार मानसिक समाधान व आनंद होत होता॰ शेवटी तीने निर्णय घेतली की परिवाराचे , लोक जीथे , तीचे लग्न करूँन देतील! ते तीला मान्य राहील कारण तीचे विवाहाचे वय घसरत चालले होते॰ ब-याच सहकर्मीनी तीला समाजवाले होते की तीच्या पेक्षा वर्चढ मुलगा तीला आता मिळने
कठीन होते॰ हे तीला कटु प्रसंगा नंतर उमजले होते॰ व शेवटी तीने आपल्या पेक्षा कमी, एका राज़्य सरकारच्या नौकरीत असणा-या मुलाशी लग्न केले होते॰ व आपले जीवन सामान्य जगाने सुरू केले होते. तीने बघितलेले स्वप्न नेहमीच अपयशी ठरलेले होते॰ तीच्या भावनांना ठेच लागली होती॰ तरी भावनेच्या प्रवाहात वाहुन न जाता॰ तीने जीवनाचे महत्व समजले आणी त्यावर तोडगा काढला होता॰
