Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

जसी करणी,तसी भरणी

जसी करणी,तसी भरणी

6 mins
204


जसी करणी,तसी भरणी

    एका उच्चवर्गीय कुटुंबात,एक तरुण होता. त्या परिवारात अनेक पीढयानं पासुन कन्यारत्न जन्मली नव्हती. कदाचित तेच, त्या परिवाराच्या दारीद्रयाचे मूळ कारण असावे !. ते कुटुंब मोठे होते. त्या कुटुंबात पाच मोठे भाऊ आणि तो तरुण 

सगळयात लहान होता. परिवाराची आर्थिक परिस्थिति फारच नाजुक होती. खायला कोंडा आणी राहायला धोंडा अशीच होते. सर्व मोठ्या भावांचे लग्न झाले होते. सर्वच भाऊ, हे कोणत्या तरी सिनेमागृहा मधे, गेट किपर म्हणून कार्यरत होते. ते आपला –आपला संसार कसा-बसा ढकलत होते. तरुण शाळेत शिकत होता. पण त्याचे, शिक्षणात इतर वडील भावासारखेच दुर्लक्ष्य होते. पडत-झड़त, तो कसा-तरी दहावीं शालान्त परिक्षेला बसला होता . पण परिणाम तसेच होते, जसे त्याच्या वडील भावांचे होत. परंतु त्याच्या सर्व भावांना वाटत होते कि धाकट्याने चिकाटीने शिक्षण घ्यावे, पण तसे काही घडले नव्हते. त्याला जवळ-पास, सर्वच विषयात गचू भेटला होता . त्यामुळे त्याने शिक्षणाला राम-राम ठोकला होता. त्याचे लक्षण पाहूण, वडील भावाने, एका सिनेमागृहात सिफारीक्ष करून टिकीट विक्रेत्याच्या जागी जमावून दिले होते. जरी तो शिक्षणात हुषार नव्हता ,तरी व्यवहार चतुर असल्याळे, टॉकीजच्या प्रबंधकासोबोत, मधुर संबंध ठेवून , चतुराईने, वांग मार्गाचा उपयोग करून भरपूर कमाई करीत होता. त्याचे सगाळया सोबत मधुर संबंध असल्यामुळे, त्याचे अनेक मित्र बनले होते. सिनेमागृहाच्या परिसरात, एक विख्यात, त्याच शहरात हॉटेल होते. तीथे कार्यरत, अनेक कर्मचारी, त्यांच्या व्यक्तिगत हितामुळे मित्र बनले होते. फाउल्या वेळात, तो त्या मित्रान सोबत वेळ घालवात होता. सुदैवाने थीथे , एक मोठा केंद्र सरकारचा अधिकारी , सेवानिवृत्तिचया अंतिम पड़ावावर, त्या शहरात स्थानातरावर आला होत. त्याचे कुटुंब, त्याच्या जन्मशहरी स्थाई झाले होते. त्यामुळे तो एकटाच त्या हॉटेल मधे राहत होता. तो तरुण उडत्या पक्षाचे पंख मोजाणारा होता. त्याने त्या अधिका-याशी लळा लावला होता. तो नेहमीच, त्या अधिका-याला चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त करीत होता . त्या अधिका-याला, तो अती विशिष्ट व्यक्ति म्हणून त्याला चित्रपट बघतांना विशेष सेवा देत होता. प्रत्येक कुत्राचा एक दिवस असतो. त्या अधिका-याच्या विभागात काही चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागा होत्या. त्याने आवश्यक कारवाई करून, त्याची नियुक्ती चतुर्थ श्रेणी पदावर केली होती. आता त्याच्या जीवणात सर्व काही मंगल होत गेले होते. 


    अचानक काळाचे चक्र उलटे फिरने सुरू झाले होते . त्याच्या मोठ्या भावाला काही अपत्य नव्हते. त्याने आपल्या धाकाट्या भावालाच, त्याची संतती मानत होता. पण, या विचाराशी त्याची पत्नी सहमत नव्हती. तीचे काही वेगळेच मत असल्याने , त्या पती –पत्नी मधे , नेहमीच वाद निर्माण होत होत्या. पण ते भांडण कधीच टोकाला गेले नव्हते. याची सुग-सुगाहट, तीच्या माहेरच्या लोकांना झाली होती. एक दिवस तरुण घरी असतांना , त्या पति -पत्नी मधे नेहमी प्रमाणे वाद -विवाद चालू होता. त्याचे रूपांतर, शेवटी भांडणात झाले होते। तरुणाने त्यात शिरकाव केल्यामुळे , भांडनाने विकराळ रूप धारण केले होते , शेवटी त्याचा अंत तीच्या मरणात झाला होता. परिस्थितिचे गांभीर्य बगुण, त्यांनी तिचा अंतिम संस्कार केला होता. तीचा नैसर्गिक मृत्यु झाला असे सर्वांना सांगण्यात ते यशवी झाले होते. दैव देते आणी कर्म नेते ,कोणी तरी त्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती ,अशी माहिती तीच्या परिवाराला दिली होती. तशी त्याना शंका पहिलेच होती. त्यामुळे, त्याची शिकायत, तपासणीसाठी कोतवालीत करण्यात आली होती. संपूर्ण परिवार आता अड़चणीत आला होता. तरुणाची तपासणी सुरू झाली होती. पुलीसाच्या चौकशीत, तो सापडला होता. परंतु ठोस पुरावा , नसल्याने चौकशी रेंघाळत चालली होती. या घटनेमुळे त्याला आपले अष्टकोणी वाटोळे होवू शकते. या भीतीने, त्याने आपली बदली, एका दुर्गम स्थानी करून घेतली होती. दोन -तीन वर्षाने, जेव्हा मामला शांत झाला होता, तेव्हा त्याने आपले लग्न करण्याचे ठरविले होते. पण नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न. त्याचे लग्न, त्याच्या व परिवाराच्या जुन्या इतिहासामुळे जमात नव्हते. त्याला कोणी मुलगी देण्यास तयार नव्हते. शेवटी एका परिवारने, ज्यांची मुलगी एकदम कुरूप होती. ते तयार झाले होते. तीचे आई -वडील , ती लहान असतांना मरण पावले होते. ती आपल्या वडील भावांवर अवलंबून होती. त्या दोघांचा काहीच मेल नव्हता. तरी, तो लग्न करण्यासाठी तयार झाला होता. कारण प्रत्येक चमकणारी वस्तु सोन नसते. सौंदर्य ही बघना -याच्या डोळयात असते. शेवटी त्याचे लग्न झाले , व तो, तिला घेवून आपल्या कार्यस्थळी गेला होता. कुत्राचे शेपूट कधी सरळ होत नसते. त्या म्हणीप्रमाणे, त्याने आपले कुकर्म तिकडे पन सुरूच ठेवले होते. एक अबला स्त्री म्हणून, ती त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती. त्यांना दोन अपत्य झाली होती. एक मोठा मुलगा आणी एक मुलगी. मुलगा बापाच्या पाउला वर पाऊल टाकत मोठा झाला होता. मुलगी पण, चंद्र कले सारखी वाढत चालली होती. पण ती शिक्षणात रुची घेत होती. शेवटी मुलाने आपले शिक्षण मधेच थांबले होते व तो एका निजी कंपनीत कार्यरत झाला होता. त्याच्या वडिलांना, अनुभवाच्या आधारावार,विभागाच्या नियमानुसार बढ़ती मिळाली होती.  


     परिवाराचे उत्तम दिवस सुरू झाले होते.पण मुलगा त्याच गांवात रमाला होता. तो परिवारासोबत बदलीच्या ठिकाणी येण्यास मनाई करत होता. शेवटी त्याने आपला हट्ट पूर्ण केला होता. वाडिलांना पदोन्नतीची फारच ओढ़ लागली होती.

त्यामुळे परिवारात ताटा-टुट झाली होती. त्यांच्या आनंदात एकदम कलटनी लागली होती. दुर्दैवाने मुलाचा एक ट्रक अपघातात मृत्यु झाला होता. परिवाराला त्याची दुःखद बातमी देण्यात आली होती. मुलाचा अपघात झाला हे ऐकून, पूर्ण परिवार ताड़ –ताडीने तीथे पोहचला होता. कंपनी मालकाने त्याला पांढ़ा-या कपड्यात गुंडाळलेल्या प्रेताजवळ घेवून गेला होता. तेव्हा मूलाचे प्रेत बघून, तो जमीनीवर दनकन कोसळला होता.लगेच त्याचा, त्याच दवाखाण्यात उपचार करून ,नंतर मुलाचा अंतिम संस्कार करण्यात आला होता. या दुःखातून, तो कसा –बसा बाहेर आला होतो. तेवहाच त्याचा डाव्या पायाचा त्रास सुरू झाला होता. वैदिकीय चाचणी नंतर, माहीत पडले की त्याची कमरेची कटोरी तड़कली होती व लक्ष्य न दिल्याने, ती बदलवीने आवश्यक होते. शल्यक्रिये नंतर, त्याचा एक पाय छोटा झाला होता. त्याला काठीच्या मदतीने चालावे लागत होते. त्यामुळे त्याने कार्यालच्या जवळच , एका त्याच्या समुदायाच्या घर मालाकाचे घर किरायाने घेतले होते. 


    नवीन घर मालकाला तीन विवाहित सुंदर मुली होत्या व एक सर्वात लहान मुलगा होता. अति लाड़ामुळे त्याला असंख्य वाईट सवाई लागल्या होत्या. मुलाच्या वाईट संगातीमुळे समाजात त्याची पगड़ी उधळल्या जात होती. तो मुलगा काहीच करत नव्हता. शेवटी आई –वाड़ीलांनी, त्याचे कधी लग्न होईल, याची आशा सोडली होती. देव एक दार जेव्हा बंद करतो ,तेवहाच दूसरे दार उघड़त असतो. मुलगा बघायला एकदम रूपवान होता, तो तसा व्यावहारिक आणि चालाक पण होता त्याने परिस्थितिचे सखोल अवलोकन केल्यावर, हाती आलेली संधीला सोडता कामा नयें , असे ठरविले होते. तो त्या परिवारा समोर सज्जन बनण्याचा प्रयत्न करीत होता. कारण, त्याच्या किरायेदाराची मुलगी शिक्षणात हुषार होती ,ती कॉलेज करीत होती. त्याने विचार केला होता की मागे –पुढे तीला नौकरी मिलेलच ! होणार सासरे, हे कर्मचारी असल्यामुळे त्याला सेवानिवृत्ती वेतन मिळेलच !, आणी नगद पैसे पण. लग्न झालावर ,त्याला काही करण्याची गरज नाही उरनार ! हे सर्व लक्ष्यात येताच, त्याने तीला त्याचा प्रेम जाळयात अड़कविले होते. तो रूपवान असल्याने, तीने आपले सर्वस्व, त्याला अर्पण केले होते व तीने शेवटी गर्भ धारण केला होता. मुलीच्या वडिलांची, च्या नातेवायकात फारसी किंमत नव्हती. त्यामुळे, त्या भागात तीचे लग्न होने थोड़े अवघडच होते. दोन्ही परिवार, आपण मैदान मारले होते , म्हणून खुश होते. तीच्या लग्नाची बातमी समाजात पसरु लागली होती. एका शुभचिंताकाने, तिच्या वाड़ीलांना विश्वासात घेवून संपूर्ण लग्न मुलाची माहिती दिली होती. आता मुलीचे आई –वडील अष्टकोणी सापळयात सापडले होते. शेवटी त्याने लग्न मोड़ण्याचा निर्णय घेतला होता. पण मुलगी मुलाच्या प्रेम जाळयात असी मग्न झाली होती की, ती लग्न मोड़ण्यास तयार नव्हती. तीला, तीच्या गर्भात वाढणा-याला बाळाचे हित साधायचे होते. शेवटी वाडि लांनी , त्याची बदली आपल्या मूळ गांवी करून घेतली होती व जाण्याअधीच, तीचा,ईच्छेविरूध्द गर्भपात करण्यात आला होता. आशाप्रकारे तीचे आयुष्य उधवस्त झाले होते. शेवटी तिच्या वडीलांनी, काही नातेवाईकांच्या मदतीने, एक साधारण मुलगा बघून, तीचे लग्न करून दिले होते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract