जन्मजात भ्याड़पणा
जन्मजात भ्याड़पणा
एका साधारण गांवात एक शिंपी राहत होता. त्याचे कुंटुंब साधारण मोठेच होते. त्याला तीन मुली आणी अंतिम अपत्य मुलगा होता. घरात सर्वचजण त्याच्या आगमनाने आंनदी झाले होते. आजी –आजोबांचा तो लाड़का नातू होता. गांवात तो एकटाच टेलर असल्यामुळे घर-प्रपंच कसा-बसा चालत होता. वडिलांसमोर तीन मुलींच्या विवाहाचा जटिल प्रश्न भेड़सावत होता. त्याला काही मार्ग सुचत नव्हता. तो आणि त्याची पत्नी काट कसरीने, घर चालावून काही बचत करीत होते. मुलगा हळु-हळु मोठा होत होता. तो शिक्षणात फारसा हुशार नव्हता. कसा –बसा पुढच्या वर्गात सरकत होता. आणी त्याने शेवटी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली होती. उच्च शिक्षणात त्याला फारसी रुची नव्हती आणी त्यालायक घरची आर्थिक परिस्थिती पण नव्हती. त्या कारणाने त्याने ड्राफ़्ट्समनचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याचे ठरविले होते. तो त्याचा योग्यच निर्णय होता . त्या घरात प्रत्येकाला भजन-कीर्तन गाने म्हण्याची सवय होती. प्रकृतीने त्यांना तसा प्राकृतिक गोड आवाज आणी गाण्याची कला दिली होती. त्या मुला मधे अजून एक विशेष गोष्ट होती. तो रेखाचित्र छान काढ़त होता. त्याचा फायदा त्याला त्या अभ्याक्रमात झाला होता. त्याच्या बहिणी पण शिकुन एकमागे –एक लग्नच्या ऊंबरठयावर उभ्या होत्या. मूलाचा अभ्याक्रम पूर्ण झाल्यावर, अनायसे त्याच्या सोबत असणा-या ,ड्राफ़्ट्समनचा अभ्यास मधील , वर्गातील मित्राने त्याला एका विज्ञान विभागात ड्राफ्टसमनच्या जागा निघाल्याची सूचना दिली होती. व त्याने त्याला त्यासाठी प्रेरित पण केले होते. व त्याने त्याच्या मार्गदर्शानाखाली तसा रितसर अर्ज केला होते. त्यांचे नशिब इतके चांगले होते की विभागात जितक्या जागा होत्या , त्याच्या पेक्षा कमीच अर्ज आले होते. त्यामुळे नाममात्र मुलाखत घेवून त्यांची स्थाई नियुक्ती करण्यात आली होती. त्याला आपल्या गांवापासून दूर, पण इतरांपेक्षा जवळच तैनाती मिळाली होती. पण ते कुंटुंब फारच भेकाड होते. त्यामुळे घरचे सर्वच सदस्य त्याला बाहेर पाठवण्याच्या विरोधात होते. त्याने आपला पुश्तेनी व्यवसाय समोर चालवावा, असा सर्वांचा ठोस विचार होता.
मुलगा पण तसा भेकाडच होता. पण वडिलांनी आर्थिक परिस्थितिचा आढावा घेतल्या वर, ईच्छा नसतांनाही ठोस कठोर निर्णय घेतला व त्याला नौकरी साठी पाठवण्यात आले होते. त्याच्या आर्थिक मदतीमुळे घरातील जबाबदा-या पार पड़ल्या होत्या. त्याचे पण लग्न झाले होते. त्याची पत्नी परिवाराच्या संस्काराला शोभेल असीच होती. तीला पण आरती,भजन –कीर्तन व पूजा –पाठ यामधे फार रुची होती. तीचा जास्तीत –जास्त वेळ ,देवाच्या पूजा –पाठ व भक्ति मधे जात होता. पण देव तिच्या भक्ति भावाने प्रसन्न होत नव्हता. एक तप लग्नानंतर ओलांडाले होते, तरी तीचे पाय जड़ झाले नव्हते. ही खंत त्या दंपतीला होती. शेवटी विज्ञानाने तीची, टेस्ट ट्यूब बेबीने तीला मातृत्व प्राप्त झाले होते. विवाहित जोड़पे ब-याच काळा नंतर आंनदी झाले होते.
पण दोघेही धार्मिक प्रवृतिचे आणि भित्रे होते. त्याचा ठसा त्या मुलावर काळा सोबत उमटत गेला होता. तीचा पति इतका भित्रा होता की त्याने स्थानांतर होते म्हणून कधीच पदोन्नती घेत नव्हता. ड्राफ़टसमनला पण विभागात, वैज्ञानिक प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्या वर, वैज्ञानीक शाखेत त्या कर्मच्या-यांना पदोन्नतीची संधी होती. त्याचे सर्व वर्गमित्र संधीचा उपयोग घेवून वरच्या पदावर पोहचले होते. तो भित्रा असल्यामुळे, त्याची आपल्या कामा व्यतिरिक्त अन्य कुठेही काम करण्याची, त्यात हिम्मत नव्हती. तो कसा बसा प्रशिक्षण पास झाला होता. विभागाच्या नियमानुसार व त्याची जेष्ठता प्रमाणे, त्याला वैज्ञानिक शाखेत बढ़ती सारखी दरवर्षी मिळत होती.पण ती बढ़ती सारखी तो नाकारत होता. त्याच्या डोक्यात आणी मनात भिती बसली होती की तो तांत्रिक कार्य करण्यास अक्षम आहे. ही घटना सारखी होत होती. शेवटी त्याला त्याच्या तैनातीच्या जागे वरुण, जवळच बढती वर तैनाती मिळाली होती. अशी सुवर्ण संधी, अन्य कर्मच्याराला मिळत नव्हती. याची महत्व, त्याचे सहकर्मी त्याला पटविण्यात यशस्वी झाले होते. तो कसा तरी अधार –कच्या मनाने तीथे कामा वर रुजू झाला होता. एक-दोन दिवस त्याचा काही कार्य शिकाण्यात गेले होते. पण जेव्हा त्याने तेथील तांत्रिक कार्याचा आढावा घेतला होता. तेव्हा त्याला वाटले की हे कार्य करण्यास तो असमर्थ आहे. असा त्याचा दृढ विश्वास बसला आणी तो सुट्टी घेवून आपल्या पूर्वीच्या मुख्य कार्यालयात आला होता. व त्याने साहेबाला आपली कमजोरी सांगितली होती. त्याने पदावनती साठी आवेदन दिले होते. पण पदावनती निरस्त करण्याचे अधिकार फक्त मुख्यालयातील सक्षम अधिका-याला होता. पण त्याच्या जुन्या ट्रैक रेकॉर्ड प्रमाणे , सक्षम अधिकारी त्याचे आवेदन निरस्त करण्याच्या बेतात नव्हता. त्यासाठी त्याला खूपच खेटे घ्यावे लागले होते . त्यात त्याची सहा महिण्याची सुट्टी बर्बाद झाली होती. त्या नंतर तो आपल्या जुन्या जागेवर ,त्याच पदी पदस्थ झाला होता. त्याने सुखदायक श्र्वास सोडला होता. पण तो कार्यालयत थट्टेचा विषय बनाला होता. येता-जाता त्याच्या वर टीका सारख्या होत होत्या. त्यामुळे त्याचा भावना दु:खवल्या जात होत्या. त्याचा मुलगा अत्यंत हुषार होता. पण आई–वाड़िलांचा त्याच्या वर परिणाम झाला होता. तो पण तसाच आतून भीत्रा होता. तो एक सॉफ्ट वेअर इंजीनीयर झाला होता. त्याच काळात जगात महामारीने सर्वत्र तांडव केला होता. तो परिवार अत्यंत भित्रा असल्यामुळे , त्यांनी सरकारी नियमाचे काटेकोर पने पालन केले होते. त्याच्या बाजूलाच, एक महामारीच्या संपर्कात आलेल्या वाहन चालकास ,तो घरा बाहेर कां निघातों ?. याची तकरार सारखी प्रशासन आणी चाळीतील परिचितांना करत होता. महामारीचा प्रकोप कमी झाल्या वर सुध्दा, त्याने आपल्या मुलाला घरा बाहेर जावू दिले नव्हते . शेवटी तो कमी पगारावर एका कंपनी साठी घरूनच कार्य करीत होता. त्याला आपले भविष्य अंधारात दिसत होते.म्हणून तो दुस –या ठिकानी नवीन कंपनीत गेला होता. त्याच्या आई –वडिलांनी सख्त विरोध केला होता. तो हिम्मत करून गेला होता. पण तो त्या नवीन ठिकाणी टिकु शकला नाही नव्हता. शेवटी तो परत आला होता.
इकडे कार्यालयाने त्याला, त्याच ठिकाणी बढ़ती दिली होती. ती त्याला नाकारता आली नाही. जर त्याने ती नाकारली असती, तर त्याची त्याच पदावर दुस-या लांब ठिकाणी स्थानांतर झाले असते. इकडे आड़, तिकडे विहिर असल्यामुळे बढ़ती त्याने भीतने स्वीकारली होती. आणी ज्या पासून त्याला सुटका पाहिजे होती, त्याच भव-यात तो अटकला होता. त्याने उरलेले दिवस फार तनावत काढले होते. त्याचा मुलगा पण, त्याच शहरात छोट्या–मोठ्या कंपनीत सॉफ्ट वेयर अभियंता पदावर कार्यरत होता आणि परिवाराच्या भित्रेपणामुळे, मुलाचे भविष्य घडू शकले नव्हते. आपले मनाला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या रकतात, जो संगीताचा डी.एण.ए होता . आता तो तबला आणि अन्य संगीत वाद्य सोबत खेळत असतो. जरी परिवार एकत्र असला तरी, तीथे एका प्रतिभेची घुसमट झाल्या सारखी वाटते..
