शिवकृपा
शिवकृपा
जवळ-पास पन्द्राव्या शतकाच्या शेवटी–शेवटी एक कुंटुंब आपल्या कळप सोबत भटकत-भटकत वर्धा आणी बेंबळा नदीच्या परिसरात राजस्थानातून आला होता. कदाचित स्थानीय रहिवास्यांन सोबत, काही चकमकी नंतर ते तीथे स्थाई झाले असावेत!. त्या काळात मुबलक बाराही महीने पाण्याची गरज, ज्या ठिकाणी पूर्ण होत होती. तशा स्थानांना प्राधान्य दिले जात होते॰ त्या मानवी कळपासाठी ते एकदम उपयोगी स्थान होते॰ तीथे दोन नदयांचा संगम होत असल्यामुळे , तीथे पाण्याची कमतरता कधीच राहत नव्हती. तसेच वर्धा नदीच्या पात्रात, अनेक खोल डोह पण तीथे होते. त्यामुळे कितीही उन्हाळा तापला, तरी डोह कधीच आटत नव्हते. त्यामुळे तीथे, त्या कुंटुंबांनी आपली स्थाई राहोटी केली होती. काळा सोबत, तीथे अनेक कुंटुंब फल-फुलत होती. त्यांच्या मुखियांचे कुंटुंब पण चांगले श्रीमंत झाले होते.
हळु-हळु त्या कुंटुंबा विस्तार होत गेला होता. त्यांनी आपली शेती आजू-बाजूच्या गांवात पसरविलेली होती. जसा-जसा कुंटुंबाचा विस्तार होत गेला, तसे–तसे , ते अनेक आजु-बाजुच्या गांवात स्थाई होते गेले होते. पण त्या कळपाचे मुख्यालय , तेच संगमावरचे गांव होते. त्या गांवात त्यांचा खूप मोठा वाडा होता. वाडयाचा उंच टिब्बा, आजु –बाजूच्या गांवातून दिसत होता. त्या काळाच्या सांकेतीक यंत्रणेनुसार , जेव्हा कधी महत्वाचे कार्य-प्रसंग किंवा अड़ी-अड़चनीच्या वेळस, वाडयाच्या टिब्यावर संकेतानुसार झेंडा किंवा निशाण लावण्यात येत होते. व त्याला बघुन ,कुंटुंबाचे विखुरलेले सदस्य मुख्यालयात एकत्र येत होते. ते कुंटुंब आणी त्यांचे नातेवाई फार आनंदात नांदत होते. त्यामुळे, त्या गांवाला नांदेसावंगी या नावांने पण ओळखले जात होते.आजही तेच नांव प्रचलित आहे. त्या नदिकाठील,गावांचे नांव पण आवंगी आहे. त्या गावांना तेथील प्रभावशाली कुंटुंबांच्या उपनामा द्वारा प्रथेनुसार संबोधले जातात. तीथे अतिथी देव भवची कल्पना, त्या कुंटुंबाच्या रकतात भिन्नली होती. त्यामुळे तीथे येणारे, साधु –संत, प्रवसी,व्यापारी हे त्यांचे अतिथि राहत होते. ते सर्व बहुतेक मिष्ठान्न भोजन सेवन करुणच जात असल्यामुळे, त्या कुंटुंबाचे आड़नांव कदाचित नंतर गोड़े असे भाटाने ठेवले होते. मराठी भाषेत गोड म्हणजे मिष्ठान्न असे होते. तसे पूर्वाजांनी माहितीनुसार ,प्रथम त्या ठिकाणी आलेल्या कुंटुंब कळपाच्या प्रमुखाचे नांव मानसिंग असे होते. नंतर कालांतराने तो समुदाय स्थानीय समुदाया सोबत एकरूप,एकजीव झाला होता।
परिवार दिवसेंदिवस संपन्न होत गेला होता. शेती-वाडीच्या व्यवसाया सोबत, ते सावकारी पण करू लागले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच भरभराट आणी प्रसिध्दी त्या भागात झाली होती. ही श्रीमंती पीढ्याने-पीढ़्या सतत कायम होती.
त्या गांवी, दोन नदींच्या संगमावर, जो उंच असा भूभाग होता. तीथे शिवजीचे एक मोठे हेमाडपंथी मंदीर होते. त्या मंदिरातील महादेवाची पिंड ईतकी मोठी आहे की त्यात जवळ- जवळ एक किंवटल ज्वारी माउ शकते. इतकी मोठी भव्य-दिव्य शिवपींड ती आहे.त्या मंदिराला सगमेश्र्वर या नावाने प्रसिध्द आहे. दोन नदीच्या संगमावर असल्यामुळे नांव सगमेश्र्व. हेमाड़पंथी मंदिरांचे अस्तित्व महाराष्ट्रात जवळ-पास बाराव्यां शतका पासून आढळते. त्या ठिकाणी बरेच साधु –संतांच्या समध्या आहे. त्याचा इतिहास सांगणार मातीत विलान झाले.समाध्या वर काही लिहालेले किंवा कोरलेले दिसत नाही. त्यांची पुण्याई व आशीर्वाद तेथील लो कांन दिसतो.
ते कुंटुंब शिवभक्त होते. तीथे ,त्या मंदिरात दरवर्षी शिव जयंती मोठ्या उत्साहाने आणी आनंदाने मनवली जात होती. पण, त्या वंशातील आणी कळपातील ,बरेच परिवार संपन्न होते. त्यामुळे ते एक पूर्ण सप्ताह शिव जयंती साजरी करीत होते. तेथील परिवारासाठी, शिव-जयंती साजरी करण्यासाठी ,प्रत्येक कुंटुंबला एक दिवस निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे शिवजयंतीच्या आधी पासूनच , प्रत्येक कुंटुंब, आपल्या दिवसावर शिव-जयंती साजरी करीत होते. त्या दिवसावर, ते कुंटुंब आजू –बाजूच्या गांवातील गांवक-यांना गांव-जेवण देत होते. ही परंपरा अनेक वर्षा पासून, पीढी-दर -पीढी तीथे चालू होती. काळाच्या ओघाने बरेच परिवर्तन होत असतात. देशात स्वातंत्र्याची चळवळीने ज़ोर पकड़ला होता. अनेक सतत दुष्काळामुळे, सामान्य शेतका-याची व मोठ –मोठ्या खटल्यांची आर्थीक हालत खस्ता होत गेली होती. त्यामुळे बरेच परिवार रस्त्यावर आले होते. त्यांची परिस्थ्ति राहायला धोंडा आणी खायाला कोंडा अशी झाली होती. येणा-या काळाचा कानोसा घेवून, काही परिवार गांव सोडून जावू लागले होते. त्यामुळे काही परिवार, त्यांची परंपरा चालू राहावी म्हणून, त्यांचा शिवजयंतीचा दिनी उत्सव थोडक्यात करायला लागले होते. पन वंशातील मुख्य कुंटुंब, त्यांचा शिव-जयंतीचा कार्यक्रम,त्याच उत्साहने दर वर्षि नियमित साजरा करीत होते.
वंशातील मुख्य प्रवाहातील , एका परिवारात , त्या परिवाराच्या मुखीयाला काही संतान झाली नव्हती. त्या विरहात ते जोड़प, आपले अंतिम दिवस मोजत होते. त्यांचे नांव चिनाजी पाटील असे होते. त्यांच्या इच्छेनुसार , त्यांच्या मरना नंतर, त्यांची उरलेली जमीन सुमारे पन्नास एकर, शिव-जयंतीच्या दिवसासाठी, मंदिराला दान करण्यात आली होती. त्या वंशाच्या रक्ताचे, काही नातेवाई नदीच्या दुसा-या काठा पलिकड़े राहत होते. चिनाजी पाटलाची उरलेली जमीन त्याच भागात होती. त्यामुळे ती जमीन त्यांना मंदिराच्या शुभ कार्यासाठी सुपुर्द करण्यात आली होती. दरवर्षि त्यातुन होणा-या उत्पन्नातून, शिव –जयंती चिनाजीच्या नांवाने साजरी केल्या जात होती . पण स्वातंत्र्या नंतर, देशात कृषि कमाल मर्याद कानून लागू झाला होता. त्या परिवाराच्या संततीने देवस्थानाची काही जमीन,त्यांची जमीन वाचवण्यासाठी सरकारला दिली होते. शेवटी त्याचा, जेव्हा भंडाफोड़ झाला होता. तेव्हा मंदिरासाठी एक ट्रस्ट बनवण्यात आला होता. तो ट्रस्ट आता द
रवर्षि शिव-जयंती साजरी करतो.
वंशातील मुख्य कुंटुंबात पण अनेक परिवर्तन काळा प्रमाणे घडले होते. त्या कुंटुंबात तीन भाऊ आणी दोन बहिनी होत्या.त्यांच्या वडीलांचे नांव दादा पाटील ,जे ताता पाटलाचे एकमात्र सुपुत्र होते. घरातील मोठा भाऊ, अन्य भावांन पेक्षा हुशार व व्यवहार कुशल होता. त्याचे नाव रोड़बा पाटील असे होते. त्याला दोन मूल आणी एक मोठी मुलगी होती. तो सावकारी सोबतच शेतीचा व्यवसाय, आपल्या भावांच्या सहकार्याने कुशलतेने करीत होता. तो अत्यंत व्यवहार कुशल व दूर-दृष्टि ठेवणारा होता. त्यामुळे कुटुंबाची, कळपातील अन्य कुंटुंबांन पेक्षा चांगलीच भरभराट होत होती. पण नियतीला ते वावगे वाटले असावे !॰ त्याच काळात , एकोणीसव्या शतकाच्या दुसा-या दशकात, स्पेनिश फ्लू नांवाची महामारी जगात सर्वत्र पाय पसरवीत होती. त्याच महामारीचा फटका , त्या कुंटुंबाच्या कर्तबगार व्यक्तिला बसला होता. त्या महामारीने त्याचा असमय मृत्यु झाला होता॰ त्या परिवारा वर अक्षरशा: संकटाचे आभाळ कोसळले होते. त्याचे धाकटे भाऊ होतकरु नव्हते, घरचा कारभार ते नीट सांभाळु शकले नव्हते. त्या कर्तबगार व्यक्तीला दोन मुले आणी एक मुलगी असे अपत्य होती. ती मुले लहान असल्यामुळे खटला सांभाळण्याची जवाबदारी, त्यांच्या काकांन वर आली होती. चुकीचे धोरण व अकार्यक्षमतेमुळे कुंटुंबाची वाट लागली होती. लोकांना कर्ज देणारे, कर्ज बाजारी झाले होते. त्यांच्या शेती-वाडीवर अन्य सावकारांचे कर्ज चढले होते. जेव्हा त्यांच्या मोठ्या भावाची मुले मोठी झाली होती. तेव्हा संपतीची वाटणी झाली होती. पण प्राप्त झालेल्या संपत्तीवर कर्जाचा डोंगर चढला होता. याची जान त्या मुलांना नव्हती. जेव्हा कर्ज वसूल करणारे सावकार वाडयावर घिरट्या घालू लागले होते. तेव्हा तो परिवार संकटात सापडला होता. त्यांनी आपल्या सगे-संबंधीनां मदत मागीतली होती. पण संकटात कोणीच कामी आले नव्हते. शेवटी ते कुटुंब शब्दश: रस्त्यावर आले होते. दैव देते आणी कर्म नेते असे त्यांच्या सोबत घडले होते. काकांनी कुंटुंबाचे अष्टकोणी वाटोळे केले होते.
ज्यांचा जन्म मुखात चाँदीच्या चमच्याने झाला होता. ते तेव्हा भिकारी झाले होते. तरी परिस्थितिला तोंड देत, ते लढा देत होते. पुन्हा काळाने हलकीशी कलाटनी मारली होती. त्यांच्या रकताचे एका काकाला , कोणतीच अपत्य नव्हती. कोणीच त्यांचा वारीस नसल्यामुळे , तो वाईट व्यसनाच्या नादी पडला होता. व त्याचा व पत्निचा अचानक असमय मृत्यु झाला होता. त्याची संपत्ती वारसा हककाने त्या कूंटुंबाला मिळाली होती. तेव्हा संसाराची गाड़ी हळु –हळु पटरी वर येवु लागली होती. नंतर दोन्ही भाऊ आणी बहिणीचे लग्न झाले होते. मध्यंतरी त्याच कुंटुंबातील धाकटया मुलाचे शालांत पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. दोघेही भाऊ शेतीचाच व्यवसाय करीत होते. पण धाकटा भाऊ काही शेतीचा व्यवसाय उत्तम रितीने करू शकला नव्हता. त्याने आपला मार्ग बदलवीला होता. त्याला चार मुले आणी दोन मुली होत्या. चांगल्या जीवन शेलीसाठी, तो आपल्या पूर्वजांच्या जन्मभूमिला सोडून जवळच्या शहरात शिक्षित असल्याने नौकरी करू लागला होता. त्याची शेती, त्याचे वडील भाऊ बघत होते. ते आवश्यक ती मदत अड़ी –अडचणीच्या वेळस करीत होते. त्यामुळे त्याची मुले शिक्षण घेवुन, आप –आपल्या पायावर उभी राहू लागली होती. त्यांच्या वडिलांनी शेती कड़े संपूर्ण दूर्लक्ष्य केले होते॰ धाकटया भावाचे, अल्प अनुकरण त्याच्या जेष्ठ भावांने पण केले होते. त्याने शेती सोबतच, त्याच्या अपत्याची शिक्षणाची व्यवस्था दुस-या ठिकाणी केली होती. त्याचे पण अपत्य शिकले होते.
जारी त्या परिवाराची आर्थीक परिस्थ्ति आतून मोठे वाडे आणी पोकळ बाशे अशी होती. तरी, या सर्व भांगडीत, अनेक वर्षा पासून शिव जयंतीचा कार्यक्रमला कधीच, त्या घराण्याने खन्ड पडू दिला नव्हता. ब-याच कुंटुंबांनी त्यांचा दिवस साजरा करने सोडले होते किंवा ते सिमित घरघुती शिवजयंती साजरी करीत होते. पण तो परिवार आजही , त्यांचा दिवसी , त्याच उत्साहाने दरवर्षी शिवजयंतीचाचा पर्व मनवतात. आजु-बाजुच्या गावक-यां गांव-जेवण देत आहेत. अनेक पिढ्यान पासून पूर्वजांनी सुरू केलेली प्रथा आजही जीवित ते ठेवत आहे . याचा अभिमान त्यांच्या कुंटुंबाच्या सर्व सदस्यांना आहे. यात सिंहाचा वाटा, सघन असलेल्या वंशातील गांवातील सदस्याला व अन्य रकताच्या आणी गांवक-यांना जातो. ही त्या परिवारावर शिव कृपाच समजावीं !॰
ज्या कुळातील सदस्यांने शिव जयंती साजरी करण्यासाठी दान करण्यात आलेली जमिनीचा, स्वत:च्या फायद्यासाठी दूरू-उपयोग केला होता. त्याच्या कुंटुंबातील सदस्यांचा कर्क रोगाने, शिव जयंतीच्या आस-पास हमखास मृत्यु होत होता. आणी त्या व्यथेने तो परिवार अजून पर्यंत मुक्त झाला नव्हता . या उलट, मुख्य वंशातील संतती शिक्षणात चांगला पराक्रम करीत आहे. ते डॉकटर , इंजीनियर, होवून मोठ मोठ्या कंपान्यामधे तगड़ी कमाई करीत आहेत.काही त्यांच्या पैकी अनेक देशात व विदेशात कार्यरत आहे. काही छोट्या –मोठ्या सरकारी नौका-या किंवा त्यांचा पैतृक शेतीचा व्यवसाय करून सुखी जीवन जगत आहे, तरी संधीनुसार, ते किंवा त्यांचे आई-वडील, त्यांच्या पूर्वजांच्या कार्यक्रमता सहभागी होवून हात –भार लावतात. ही प्रथा ते किती पिढ्या समोर चालवतील हे तर काळाला माहीत असणार !.
पण ट्रस्टच्या ताब्यात जी जमीन आहे. तिला दरवर्षी हरास करण्यात येत ,अर्थात जमीनीला मकत्याने देण्यात येते. त्या तुन होणा-या उत्पनातून प्रत्येक वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते. नदीचा संगम असल्यामुळे त्या स्थानाला फार महत्व आहे. तिथे त्या दिवशी यात्रा भरते आणी भक्तांना प्रसाद रूपी फराळ ट्रस्ट द्वारा वितरित केला जातो.आजू –बाजूचे शिव भक्त शिव जयंतीला मोठ्या श्रध्देने तीथे जातात.