वर्गमित्रांचा ठराव
वर्गमित्रांचा ठराव
एका लहान शहरात दोघे मित्र एकाच उप-नगारत थोड्याच अंतरावर राहत होते. ते दोघेही आपाल्या-आपाल्या कुंटुंबात सर्वात लहान होते. दोन्ही मित्र नेहमी एकत्र शाळेत जात होते. ते नेहमीच एकत्र दिसत होते. त्यांची एक–मेकाशी घट्ट मने जुळली होती. त्यांची मित्रात काळा सोबत एकदम घट्ट होत गेली होती. त्यांना एका-मेकांच्या मनातील भावना समजत होत्या.प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या वर ते माध्यमिक शिक्षणासाठी दुस-या शाळेत गेले होते. एका बाकावर तीन विद्यार्थी बसण्याची तरतुद होती. तीथे त्यांना एक नविन मित्र मिळाला होता. आता, अरुण, गुणवंता आणी श्रीकांत यांचा त्रिगुट बनला होता. ते बारावीं पर्यंत सोबतच होते. त्यांचे वर्गातील अजुन काही जिवलग मित्र होते. त्यांचे शालेय जीवन फार आनंदात गेले होते. बारावीं नंतर त्यांच्यात फाटाफुट झाली होती. गुणवंता गणिता कच्चा होता त्यामुळे त्याने दुस-या गांवच्या महाविद्यालयात जीवशास्त्र घेवुन स्नातक झाला होता. श्रीकांतची आर्थीक परिस्थिति नाजुक व बुध्दीने फार तीक्ष्ण नसल्यामुळे त्याची बारावीं नंतरचे शिक्षण रखडले होते. अरुण ने गणित घेउन विज्ञान शाखेत स्नातक व नंतर स्नातोकत्तरची पदवी घेतली होती. शिक्षणामुळे त्याच्यांत पहिले सारखी घनिष्ठता कायम राहली नव्हती. प्रत्येक जन आपले भविष्य बनवण्यात गुंतला होता. तरी वेळात-वेळ काढुन ते मिळत होते. त्यांनी मित्रतेचा ओलावा कायम ठेवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला होता.
अरुणला केंद्र सरकारची नौकरी मिळाली होती. पण त्याची तैनाती पर प्रातांत खुपच दूर झाली होती. गुणवंता नौकरीच्या शोधात इकडे- तिकडे हात-पाय मारित होता. श्रीकांत आपल्या परिने प्रयत्न करित होता. शेवटी अरुणचे लग्न झाले होते. व तो आपल्या संसारात व्यस्त झाला होता. ते दोघेही आपल्या स्थाई भाजी-भाकरीसाठी प्रयत्नशील होते. प्रत्येकाचे मार्ग वेग-वेगळे झाले होते. प्रत्येकाची नाळ आपल्या जन्मगांवा पासुन टुटली होती. त्यांचे भेट होण्याचे मार्ग जवळ-जवळ बंद झाले होते. फक्त जुण्या आठवणी त्यांच्या जीवणात सोबत उरल्या होत्या. संसा-याचे झकोले घेत-घेत त्यांनी पन्नासवीं जवळ-पास ग़ाठली होती. श्रीकातं व गुणवंताला पण राज्य सरकारच्या कार्यालयात मध्ये नौकरी मिळाली होती.दोघांच्या अर्धांगीनी शिक्षिका होत्या. अरुणची पत्नि गृहिणी होती. श्रीकांत, गुणवंता आणी अरुण हे तीघेही एक-मेकांना माहित नसतांना नागपुरला फिर-फार होवुन सेवानिवृत्ति पूर्वीच स्थाई झाले होते.
एके दिवशी अचानक श्रीकांत व गुणवंताची भेट एका मॉल मधे झाली होती. दोघेही एक-मेकाला बघुन चकाकले होते. क्षणातच त्यांची ओळख पटली आणी दोघांनी एक-मेकांना गळाभेट केली होती. गळा-भेट झालानंतर लगेच दोघांनी एकच प्रश्न केला कि तुला अरुण कधी भेटला होता कां ?. पण दोघांनपैकी एकाही जवळ प्रश्नाचे उत्तर नव्हते. पण त्यांना आता आत्मविश्वास झाला होता कि जसे ते दोघे मिळाले तसेच त्यांच मित्र पण लगेच त्यांना भेटेल !. मित्र वनवासाचे हे काळे क्षण कधी तरी संपणार ,मित्र उदासिचे दिवस लगेच संपनार आणी मित्र मिलनाचे फुल नक्कीच उद्या उगवनार असा त्यांना आत्मविश्वास झाला होता. ते एकाच परिसरात काही अंतरावर राहत असल्यामुळे नेहमीच त्यांची भेट होत होते.आता जुनी घनिष्ठ मित्रता पुनर्जिवित झाली होती. फक्त त्यांना आपल्या त्या जीवलग मित्राची आतुरता सारखी लागली होती.
गुणवंता एके दिवशी आपल्या वडिल भावाकडे जन्मगांवी काही कामासाठी गेला होता. तो घराच्या अंगणात बसला होता. तेव्हा अचानक त्याच्या वडिल भावाचा मित्र त्याच्या भावाला भेटण्यासाठी आला होता. त्यांच्या मधे संवाद सुरु झाला होता. गोष्टि करतांना त्याने अरुण विषयी विचारले होते. तेव्हा गुणवंता म्हणाला होता की त्याची आणी अरुणची बरेच वर्षा पासुन कधीच भेट झाली नाही. तेव्हा त्याने गुणवंताला सांगितले की अरुण पण नागपुरला आला आहे. त्याने पण तीथे त्याचा बंगला बांधला आहे. बंगल्याच्या वास्तुची पत्रिका त्याने आपल्या गांवातील नातेवाईकांनी दिली होती. त्याच्या भाउजीने मला त्याचा नंबर दिला होता. तो नंबर त्याने गुणवंताला दिला. त्याला फार हर्ष झाला होता. त्याला खात्री पटली होती कि देवाच्या घरी विलंब आहे, पण काळोख नक्कीच नाही. त्याचा हारवलेला जुना मित्र आता भेटणारचं !. तो जेव्हा नागपुरला आला होता. तेव्हा त्याने ही गोड बातमी श्रीकांतला दिली होती. त्याने अरुणला फोन लावला होता. अरुणने नविन नंबर बघुन त्याच्या कडे दूरलक्ष्य केले होते. पण ती रिंग मनला भेदुन गेली होती.
गुणवंताने पुन्हा फोन लावला होता. तोच नंबर बघुन अरुणने क्षणिक विचार नकरता फोन उचलला होता. कानाला परिचित असलेला, पण खुपच अतंराळानंतर दिलासा देनारा, ज्यात ओलावा होता अशी आवाज ऐकाला आली होती. अरे अरुण मी गुणवंता बोलत आहो. सुरुवातीला तो थोडा हादरुण गेलो होतो. एकदम
विश्वास बसत नव्हाता. आवाज तोच होता.त्यामुळे लगेच खात्री पटली होती. विश्वास बसत नव्हता. तरी ती एक वास्तविकता होती. अनेक वर्षा नंतर तो प्रसंग जुळवुन योगा-योगाने आला होता. जस्या खगोलीय घटना अंतराळ्यात घडुन येत असतात. त्यांचे मन एकदम प्रसन्न झाले होते. शरिरातील रक्तसंचाराचा वेग़ वाढला होता. फोन वर ब-याच गोष्टि झाल्या होत्या. तिकडे श्रीकांत प्रतिक्षा करुण राहिला होता कि त्याला केव्हा अरुणशी बोलता येईल. योग्य संधी मिळताच गुनवंता ने श्रीकांतला फोन दिला होता. त्याच्या सोबत गप्पा-गोष्टि झाल्यावर अरुणने दोघांनाही वेळ काढुन घरी येणाचा नैवता दिला होता. ते दोघे म्हणाले कि जरी आम्हाला घरी बोलावले नसते, तरी आम्ही दोघे येणारचं होतो. त्यावर अरुण म्हणाला ते मला माहितच होते. तरी काळासोबत बरेच परिवर्तन होत असतात. म्हणुन आग्रह केला होता. तुम्हा दोघांचे स्वागत आहे असा तो म्हणला आणी फोन बंद केला होता. ते दोघे अरुणला भेटायला त्याच्या घरी गेले होते. ब-याच काळानंतर बालमित्रांचा मिळण्याचा सुनहरा योग आल्यामुळे त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. त्यानंतर ते नेहमीच भेटत होते. तीघेही सेवानिवृत्त झाले होते. आर्थीक दृष्ट्या तीघेही सघन झाले होते. त्यांना जगापेक्षा काही तरी वेगळे करावशे वाटत होते. त्यांच्या डोक्यात एकदा सर्व वर्ग-मित्रांना एकत्र करण्याचा विचार सतत खेळत राहत होता. म्हणुन त्यांनी त्या दिशेने प्रथम पाउल टाकले होते. ते तिघे मिळुन आपल्या जन्मगांवी गेले होते. तीथे त्यांचे काही वर्गमित्रांनी जन्मभूमिलाच आपली कर्मभूमि बनवली होती. तीथे त्यांनी त्यांना भेट दिली होती. त्यांना बघुन त्यांचे मित्र अत्यंत खुश झाले होते. त्यांच्या खुशिचा बार तेव्हा उडाला होता. जेव्हा त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांचा त्यांच्याच शाळेत एक स्नेह मिलन मेळावा घेण्याचा विचार ठेवला होता. त्यांनी लगेच तो विचार उचलुन धरला होता. मेळावा संपान्न करण्यासाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन पण दिले होते. त्यांनी सगळ्यांच्या मदतीने एक वाट्स-अप ग्रुप बनवला होता. हळु-हळु ग्रुप वाढत गेला होता. आणी जवळ-जवळ सर्वच वर्गमित्र ग्रुप वर होते. त्यांच्या मधे चांगले संवाद चालु झाले होते. तो जुणा सुकलेला प्रेमाचा ओलावा पुन्हा पुनर्जिवित झाला होता. ते झरे पुन्हा सक्रिय झाले होते.फ्क्त ते सर्व एका हाकेची कान लावुन वाट बघत होते. जसा स्नेह मिलन मेळाव्याचा प्रस्ताव ग्रुप वर टाकला.तोच सर्वांनी आपली सहमती दिली होती.
शाळेच्या प्राचार्यांना भेटुन हा प्रस्ताव त्यांनी त्यांचा समक्ष ठेवला होता. प्राचार्यांच्या लक्ष्यात आले होते कि असा अनोखा कार्यक्रम शाळेत अजुन झाला नव्हता. आणी सर्व वर्गमित्र तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र येवुन आपल्या जीवित गुरुजनांचा सम्मान करणार होते. ते या विचाराने खुपच प्रभावित झाले होते. आणी सुट्टीच्या दिवशी शाळेत कार्यक्रम करण्याची परवांगी त्यांनी दिली होती. ठरल्याप्रमाने त्यांनी सर्व जीवित शिक्षकांना व प्राचार्यांना स्नेह मिलन मेळाव्या साठी बोलावले होते. सर्व मित्र एका ठिकाणी तब्बल चाळीस वर्षानंतर मिळाले होते. त्यामुळे त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.पारंपारिक पध्द्तीने, प्राच्यार्य व त्यांच्या काळातील सर्व जीवित शिक्षकांचा सम्मान करण्यात आला होता. माजी कलाकार विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले होते. प्रत्येकाने आपला हुणर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कार्यक्रम एकदम भन्नाट संपान्न झाला होता. प्राचार्य व सर्व शिक्षकांनी असा अनोखा भन्नाट कार्यक्रम आयोजित केल्या मुळे त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते. इतके जुने त्यांचे विद्यार्थी, त्यांचा कधी इतका मोठा सोहळा आयोजित करुण, त्यांचा कधी सम्मान करतील असा स्वप्नातही त्यांनी कधी विचार केला नव्हता.कार्यक्रमाची सर्वच मित्र-मैत्रिनींनी खुपच प्रशंसा केली होती. आणी आपल्या सर्व वर्गमित्रांना पुन्हा भेटण्याची सुवर्ण अस्मरणीय संधी दिल्या बद्द्ल आयोजकांना मनापासुन त्यांचे आभार मानले होते. सर्वमित्र कार्यक्रमाचा आनंद लुटुन गोड अशा आठवणीचे भांडवल आपल्या सोबत घेउन गेले होते.
अरुण, गुणवंता, श्रीकांत आणी गांवातील अन्य मित्र कार्यक्रम सफल झाला हे बघुन प्रसन्नचित्त झाले होते. त्याचे चिन्ह त्यांच्या चेह-या वर उमटलेले स्पष्ट दिसत होते. जीवनात आपन काही मोठे कार्य केले असे त्यांना सारखे जाणवत होते. त्या मित्रांनी एक ठराव मांडला होता कि आपण सर्व जो पर्यंत आपाल्या जीवात श्र्वास आहे. तो पर्यंत दरवर्षि या कार्यक्रमाचा वर्धापण दिवस साजरा करत जावु !. त्यांच्या पैकी बरेच मित्र दरवर्षि नियमित पणे कार्यक्रमाचा वर्धापण दिवस साजरा करत होते. एक- मेकांशी मिळुन आपले सुख-दुःख वाटुन घेत होते. व नविन उर्जेने आपले जीवन जगत होते. व आतुरतेने दर वर्षि कार्यक्रमाची वाट बघत होते. हा त्यांचा खेळ, छंद प्रकृति किती काळा सुचारुपने चालु ठेवेल याचे गुपित तर प्रकृतिलाच ठाउक असनार !.