Sanjay Raghunath Sonawane

Abstract Others

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Others

वेदना मनाच्या-कथा

वेदना मनाच्या-कथा

3 mins
298


निता आणि अजय यांच्या लग्नाला जवळ जवळ पंचविस वर्षे पूर्ण झाली होती.गरीबीत संसार करताना अनेक अडचणींचा संघर्ष करावा लागला होता. लहानसहान नोकर्या करून घर चालविणे अवघड झाले होते.आर्थिक परीस्थितीला सामोरे जाताना दिवसाची नोकरी करून रात्रीची सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागत होती. त्यामुळे घरभाडे व घरखर्च काटकसर करून केला जात होता.त्याच गरीबीत त्यांना दोन मुले झाली होती. मुले लहान वयात खूप समजदार होती. कोणत्याही खाण्याच्या वस्तूसाठी ते हट्ट करत नव्हते. जणू काही त्यांना आईच्या गर्भात असतानाच आपल्या गरीबीची चाहूल लागली होती की काय ?असा प्रश्न पडला होता.गरीबीत ही मुले वाढत होती.खाजगी शाळेत शिकत होती.त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत नव्हता कारण लहानसहान आजार ती बिनधास्त पणे त्यांच्या प्रतिकार शक्तीच्या जोरावर व गरीबीच्या चटक्या मुळे सहन करायची. फार तर फार एक दोन रुपयाची मेडीकलची गोळी औषध म्हणून आणावी लागायची.किती तरी वर्षे गरीबीत हे असेच चालायचे.

            खाजगी शाळेत शिकत असतांना ते दोघेही हुशार होते.अभ्यासूवृत्ती मुळे ते कधीच नापास होत नव्हते.कधी,कधी शाळेच्या फी साठी दागिने गहाण ठेवावे लागायचे. ते एकदा ठेवले की सोनाराला पैसे परत जात नव्हते त्यामुळे व्याज व मुद्दल एकत्र झाले की दागिने स्वस्तात व मातीमोलभावात सोनार घेत असे.त्यात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किती ग्राम वर किती पैसे येतात तो हिशोब सुद्धा कळत नव्ह्ता.त्यात दागिने संपले.कधी कधी एव्ह्ढी पैस्याची टंचाई भासायची की घरातील टी.वी .गहाण ठेवावा लागायचा. तो सहा महिन्याच्या आत आपण सोडवला नाही तर मातीमोल भावात सोनार घेत होता.काही गुजराथी व मारवाडी सोनार तर ग्राहकाला खूप हैराण करायचे. महाराष्ट्रात राहून मराठी ग्राहकाला धमकी द्यायचे. त्यातच किती तरी मराठी माणसांचे सोने गेले होते.तशीच परिस्थिती ह्या गरीब कुटुंबाची झाली होती.तेव्ह्ढ्यावर ही ते थांबत नव्हते. घराचे पेपर घेऊन जास्त दराने व्याज आकारून घर स्वस्तात घेतले जात होते. 

          अशा परिस्थितीत ही मुले वाढवली होती.स्व:ताच्या जगण्यासाठी बचत म्हणून दोन तीन लाख सरकारी बँकेत fd करून ठेवले होते. ती भविष्याची व वृद्धापकाळातील तरतूद होती. मुले शिकून शहाणी झाली होती. ताकतीने व शिक्षणाने मोठी झाली होती.त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे दोघानाही सरकारी नोकरी मिळाली होती. गरीबी त्यांना माहीत होती. त्यामुळे पैस्याचे नियोजन त्यांच्याकडे होते. स्वताच्या पगारतील हिस्सा स्व:ताच्या नावावर ठेवत होते. आईवडिलांच्या जीवावर मोठी झालेली मुले आई वडिलांना तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही खर्च करताना आम्हाला विचारा? अशी बोलू लागली. त्यात आई वडिलांचे भांडण होत असे. मुलांना आई हवीसी वाटायची बाप नको होता. त्याची मालमत्ता पाहिजे होती; पण घरात तो नकोसा होता.आई वडीलांचे भांडण किरकोळ असायचे. पण मुलांना ते मोठे वाटायचे.ते बापाला जेवण देऊ नको,त्याला पाणी देऊ नको,त्याला अंथरूण टाकून देऊ नको,त्याची कपडे धुऊ नको अशी बोलू लागली. त्यामुळे आईला प्रश्न पडला होता की कुणाचे ऐकायचे? तिला मुले हवी होती. नवरा हवा होता. मुलांच्या भांडणात तिची घुसमट झाली होती. तिला काय करावे? ते कळेना. शेवटी भांडण एव्हढे विकोपाला गेली की आई वडिलांचा घटस्फोट घेण्याची वेळ आली.दिवस व वार ठरल्यामुळे दोन मुले, आई वडील व तिच्या मैत्रिणी आल्या.वकिलासोबत बोलणी सुरु झाली.आई वडिलांच्या पंचवीस वर्षाचा केलेला संसार मोडणार होता.आईवडिलांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा जुण्याआठवणी जाग्या करत होत्या.दोघांच्या मनात ते नकोसे होते:पण शेवटी टोकन म्हणून वकिलास सहा हजार रुपये दिले.मालमत्ता विभागणी बोलणी झाली होती.सहा महिन्याने दोघे कायमचे वेगळे होणार होते.दोघे कायम एकमेकाना सोडणार होते. हे पाहून जीवन संपल्याचे दु:ख झाले होते. जगून उपयोग नाही असे वाटू लागले. मुलांना आईवडिलांच्या दु:खाची व भावनांची काहीही देणे घेणे नव्हते.त्यांना घर पैसा मिळणार होता. पण आईचे रडणे थांबत नव्हते. तिचा जीवनसाथी कायमचा सुटणार म्हणून ती सतत रडत होती.बाप रडत होता. हल्ली पिढ्या संवेदन हीन होत आहेत.त्यामुळे 

    शेवटी नवरा कणखर भूमिकेचा होता. त्वरीत निर्णय बदलला. वकिलाला घटस्फोट घेण्याचा निर्णय थांबवला. आता परत या निर्णयाने जीवनात आनंद निर्माण झाला.एकदाचे वादळ शांत झाले.मोडणारा संसार थांबला. एकाकीपणा काय असतो ते माहीत झाले.एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजेत हे शिकायला मिळाले. शेवटी पती व पत्नी हे म्हातारपणात फार मोठे आधार असतात.ते दोघेही अतूट रहावे.आयुष्यात जीवनसाथी असावा.तरच त्या जगण्यात मजा आहे अन्यथा दु:खाशिवाय दुसरे काहीच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract