Arun Gode

Action

3  

Arun Gode

Action

उतावीळ

उतावीळ

4 mins
141



        जेव्हा देशात काही भागात मराठा सामराज्य प्रस्थापित झाले होते. तिथे-तिथे जे सरदार गेले होते, तेच मग त्या भूभाचे राजे झाले होते. असे अनेक मराठा सेनेचे स्ररदारांचे राज्य मध्यप्रदेशत पण होते. त्यांच्या सोबत गेलेले बरेचसे सैनिक व अन्य त्याच भागात आपल्या वसाहती बनवुन तिथले रहिवाशी झाले होते. तरी त्या मराठमोळ्या लोकांनी आपली संस्कृति आणि भाषा पीढ्यानु-पीढ्या पासुन जपत आले होते. कित्येक राव आले आणी पंत गेले. पण त्यांनी आपल्या संस्कृतिची जोपासना जीवापार करत होते आणी आहे.अशाच एक जिल्हा मध्ये एक केंद्र सरकारचे कार्यालय होते. कार्यालयाच्या परिसरात कर्मच्या-यासाठी क्वार्टर पण होते. परिसराला लागुनच गृहनिर्मान संस्थेचे पण काही क्वार्टर होते. त्या संस्थेच्या एका क्वार्टर मध्ये संस्थेचा एक मराठी वाहन चालक राहत होता. त्याला दोन मुली आणी एक मुलगा होता. जिल्हापासुन काही मोजक्या अंतरावर त्याचे मूळ्गांव होते. तिथे त्याचे अन्य जेष्ठ आणी कनिष्ठ भाउबंद आणी नातेवाईक राहत होते. त्याची मुले शिक्षनात कमकुवत होती. आडात नाही तर पो-ह्यात कुठुन येणार म्हणुन ते ही मुलांन कडे दुर्लक्षच करत होते.पण व्यवहारत सगळेच चंट होते. त्यांच्या शिक्षणाकडे विशेष कल नव्हता.

      एक अधिकारी आपल्या परिवारा सोबत बढती वर आपल्या प्रांतातुन मध्यप्रदेश मधे त्याच केंद्र सरकारच्या कार्यालत कामा वर रुजु झाले होते.कार्यालयात आणी आजु-बाजुला सर्वच हिंदी भाषी परिवार राहत होते. त्या अधिका-याला एक मुलगी आणी दुसरा मुलगा होता. दोघेही केंद्रिय विद्यालत शिक्षण घेण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांना भाषेची विशेष अडचन नव्हती. ते आजु-बाजुच्या मुला-मुली सोबत मिळुन-मिसळुन गेले होते. त्यांची वाहन-चालकाच्या परिवारा सोबत चांगलीच दोस्ती जमली होती कारण त्यांच्या आईचा लळा त्या मराठी कुटुंबा सोबत जास्त होता. समभाषिय आणी सम-संस्कृति मुळे तीला त्यांची ओढ होती. संबंध घनिष्ठ झालामुळे त्यांच्या मुलीने अधिका-याचा निजि टेलेफोन नंबर तीच्या सर्व नातेवाईकांना व इष्ट मित्रांना दिला होता. त्यांच्या घरी येणारे त्यांच्या कुटुंबियांचे फोन कमी आणी त्यांचेच जास्त असायचे. आजु-बाजुला सिमित फोन होते. तेव्हा मोबाईल नव्हते.

        अधिकारी ज्या वर्षि गेले होते. नेमके त्याच वर्षि त्यांच्या जेष्ठ मुलीने दाहावीं बोर्डाची परिक्षा दिली होती. जेव्हा बोर्डाच्या परिक्षचा निकाल आल होता त्यात ती जवळ-जवळ सगळ्याच विषयात नापास झाली होती. तीच्या अन्य सोबत्यांचा निकाल काही उत्साहवर्धक नव्हता. त्या सर्वांनी मिळुन एक ग्रुप बनवला होता.त्यांचा प्रमुख ज्याला सर्वात जास्त गुण मिळाले होते, त्याला बनवण्यात आले होते.आता पुढची वाटचाल त्याच्या वर अवलंबुन होती. ते सामूहिक निर्णय घेण्याचे पक्षधर होते. 

        अशाच एका सामूहिक निर्णयामुळे त्यांनी पुढच्या संधीचा उपयोग करुन परिक्षेला बसण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी एक सामूहिक मोहिम उभी केली होती. प्रत्येकाला काम वाटुन दिले होते, लागनारे प्रमाण -पत्र,परिक्षा अर्ज, फोटो,अन्य सामग्री इत्यादि. परिक्षेचा अर्ज भरण्यासाठी त्यांच्या मधे कमालीचा उत्साह दिसत होता. त्यांच्या सर्व गतिविधी पाहुनच,त्या मोहल्यात राहणारे लोक जीवंत आहे याची जाणिव होत होती.शेवटी अनेक खटा-पटी नंतर ते परिक्षा फार्म भरण्यात यशस्वी झाले होते. उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग. त्यांचा तो उतावीळ पणा आणी उत्साह पाहुन अशे वाटत होते की ते सर्व पुढ्याच्या वेळेस नक्कीच किल्ला फते करणारच !.

        अचानक मोहल्यातल्या हाल-चाली मंदावल्या होत्या. असे वाटत होते की पूर्ण ग्रुप अभ्यासात मग्न झाला होता. परिक्षेच्या वेळेस पुन्हा ग्रुपची धाव-पळ जोमाने सुरु दिसत होती. त्यांना पाहुन असे वाटत होते कि हे सर्व मेधावी विद्यार्थी आहे.एकदाची परिक्षा संपली की पुन्हा त्यांच्या धाव-पळीला कसुन लगम लागत होती.जणु अशे वाटायचे की ते अभ्यास करुन-करुन पार थकुन गेले आणी लंबा विसावा घेत होते.

     जेव्हा पुन्हा बोर्डाचा निकल आला होता, परिणाम जुनाच होता. फ्क्त फरक इतका होता कि काही ग्रुपच्या सदस्यांचे जेम-तेम अंकानी विषय सुटले होते. नंतर त्यांची एक आम बैठक झाली होती. त्यात संसदे पेक्षाही तर्क-वितर्काने चर्चा होवुन आम सहमती झाली होती. त्या परिक्षेत ज्याला सर्वात अधिक गुन मिळाले होते तो त्या विषयाचा ज्ञाता.तो मग इतरांना त्या विषयाचे सखोल मार्गदर्शन करुन त्यांना पास करण्याची जवाबदारी त्याला देण्यात आली होती. दुसरा ठराव असा मांडण्यात आला होता की हा ग्रुप जो पर्यंत सर्व सदस्य उत्तीर्ण होत नाही तो पर्यंत कायम राहणार !.

          अधिकारी काकांच्या पत्निने काकांना निवेदन केले की त्यांच्या मुला-मुली सोबतच त्या कुटुंबातील मुलीला ज्यात ती नापस होत होती. त्या विषयात तिलापण मार्गदर्शन करावे. तीच्या आई-वडिलांनी पण काकांची मदत घेन्यासाठी तीला प्रेतित केले होते.काकांनी पण प्रत्येक्ष तीला तसा ऑफर दिला होता.पण ती काका कडे कधी त्यासाठी आली नव्हती. तिला कदाचित आपल्याच ग्रुप वर पूर्ण विश्वास असावा. 

       अधिकारी काका मागच्या तीन-चार वर्षा पासुन त्या ग्रुपचे सारखे निरिक्षण करत होते.काकांना पण त्यांचा नेहमी परिक्षेचा पार्म भारण्याचा उताविळ पना आनी परिक्षेला जाण्यासाठी त्यांच्या चेह-या वरिल आत्मविश्वासाचे फॅन झाले होते.जो पर्यंत अधिकारी काका तिथेच होते.तो पर्यंत त्यांचा परिक्षा अभियान अखंड चालु होता. त्याच उताविळ पणाने ते सर्व परिक्षा अभियान चालवत होते. समूहातील प्रत्येकाची कृति ही सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशीच त्यांचीची थोरवी होती.त्या नंतर ते आपल्या प्रांतात पुन्हा परत आले होते. नंतरचा इतिहास त्यांना माहित होवु शकला नाही. हे त्यांचे खरचं दुरदैवच म्हणावे !


Rate this content
Log in

Similar marathi story from Action