Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others


3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others


तमाशा कलावंताना मृत्यूविळखा

तमाशा कलावंताना मृत्यूविळखा

2 mins 68 2 mins 68

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कलावंतावर आज उपासीपोटी अंत:काळजातून रडण्याची वेळ यावी.महाराष्ट्रभूषण कलावंत,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलावंत आज उपासीपोटी तळमळत आहेत.उपासीपोटी जीवन जगत आहेत.कोरोनासारख्या काळात आज त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे.तमाशाचे फड बंद झाले आहेत.जे रसिक मायबाप आहे ते कोरोनाच्या भीतीमुळे घराबाहेर पडत नाहीत.आज महाराष्ट्रात अनेक तमाशा मंडळे आहेत;पण त्यांच्या मालक वर्गावर उपाशी रहाण्याची आज वेळ आली आहेत तेव्हा कलाकार कसा जगत असेल हे विचार करणे म्हणजे डोळयात अश्रूंची पाण्याची धारा ऐवजी अश्रूंचे रक्तधारांत रुपांतर होण्यासारखे आहे


      असे भयानक दु;ख पाहणे म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या लोकांच्या जीवंत कलेचा खून करणेच होय.महाराष्ट्रातील तमाशा कलाकार व त्यांचे मालक यांच्यावर ही वेळ येणे म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक कलेला कलंक आहे.जगण्याचे साधन असलेली तमाशा कलावंताना फार मोठी श्रीमंतीची हाव नाही.त्यांना फक्त तमाशे जगवायचे आहे.कलावंत जगवायचे आहे.अनेक लोकांना तमाशातून रोजगार मिळ्तो.शासनाला बेरोजगारी निर्मूलन करण्यासाठी खूप मोठी मदत तमाशा माध्यमातून होते.कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते.फक्त कला जीवंत राहिली पाहिजे.हाच तमाशा कलावंताचा मुख्य ऊद्देश आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात तमाशा मंडळ जीवंत राहावी हीच अपेक्षा असते.


     आज माणूस माणसाला विचारीना.कोरोना काळात भीक मागून कोणी भीक वाढेना.कलावंत आहे हे सांगून सुद्धा दोन वेळची मिर्ची भाकर देईना.अशा संकटकाळात अक्षरशः तमाशा कलावंत उपासीपोटी आपल्या पोराबांळा सह जीव जात नाही म्हणून जगत आहे.अनेक तमाशा मालकांना कर्ज काढून कलावंत सांभाळण्याची वेळ आली आहे.आतातर कोरोना काळात त्यांना कर्जही कोणी देईना.सगळीकडून त्यांच्यासाठी दरवाजे बंद झाले आहेत.आता फक्त त्यांच्यासाठी आत्महत्या हाच एक पर्याय आहे;पण त्यांचा सरकार दरबारी विचार व्हावा.त्यांच्या तमाशा मंडळास जीवदान द्यावे.त्यांना आर्थिक मदत मिळावी.प्रत्येक कलाकारास असी महामारी आल्यास दरमहा मानधन मिळावे.वृद्धपकाळात पेन्शन मिळावी.नाहीतर महाराष्ट्रातून तमाशा ही जीवंत कला नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.


       तमाशा मालक आज ढसढसा रडत आहेत.तमाशावर कोरोनाचे सावट आहे.शासनाचे नियम तमाशा मंडळ पाळत आहेत.त्यामुळे त्यांची तमाशा मंडळे आर्थिक संकटाच्या खाईत सापडली आहेत.शासनाने त्यांना आर्थिक संकटातूंन बाहेर काढण्याची नितांत गरज आहे.डोळ्या देखत कलावंत उपासीपोटी झोपतो याचा अर्थ काय?कलेला व कलाकाराला एव्ह्ढी वाईट वेळ यावी?याच्यासारखे दुर्भाग्य अजून महाराष्ट्राला काय हवे आहेत? 


       आज त्यांच्या मदतीला कोणीच येऊ नये ही महाराष्टाची संस्कृती व संस्कार आहे का?आज लाखो रुपये धनदांडगे, श्रीमंत लोकांकडे आहे त्यांनी मदत करणे काळाची गरज आहे.vote bank न बघता महाराष्ट्राचे वैभव असलेले तमाशे बंद होणे म्हणजे आज महाराष्ट्राचा पराभव मानावा लागेल.स्पष्ट व सडेतोड बोललेले कधीही चांगले असते.माणूस म्हणून माणसाने माणूसकी जपली पाहिजे.मदतीचे हात समोर उपासी माणसासाठी पुढे आले पाहिजेत.संघर्षमय जीवन जगत असताना तमाशा कलावंताना,मालकांना खूप त्रास सहन करावा लागतो.दु;खमय जीवनात सामान्यांचे दु:ख मनोरंजनातून दूर करण्याचे मह्त्त्वाचे काम अनेक तमाशा कलावंताकडून होते.आज त्यांच्याच आयुष्याचा तमाशा व्हावा! ही गोष्ट महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे.


रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे ही दिग्ग्ज कलाकार मंडळी व मालक ढसढसा रडल्यानंतर माझ्या डोळयात देखील अश्रू आले.म्हणून हा लेख वाचून त्यावर तमाशा कलावंताना त्यांच्या थेट बँक खात्यात 10रू पासून ते 1000रूपर्यंत मदत व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो.


Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Raghunath Sonawane

Similar marathi story from Abstract