तेरवीं
तेरवीं
सनातन धर्मानुसार आपल्या समाजात ब-याच रुढी,परंपरा रुजला आहेत. त्या जरी शिकलेल्या, वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा व्यक्तिला पटत नसल्या तरी पटवुन घ्याव्या लागातात. काराण समाजात प्रत्येकाला मान-सन्माने जगण्याची इच्छा असते. त्यामुळे त्याची आर्थीक परिस्थिती असो की नसो. समाजात स्वाभिमाने जगण्यासाठी समाजात खोल वर रुजलेला सामाजिक रुढी पार पाडाव्याच लागतात. या परंपरा टिकवण्या मागे काही लोकांचा निहित स्वार्थ पण असतो. महात्मा जोतिबा फुले यांनी अशा मृत रिती-रिवाजा विरुध्द बंड पण फुकारले होते. त्यांनी सामान्य गरिब माणसाचा आर्थीक छ्ळ होवु नये म्हणुन सत्यशोधक समाजाची स्थापना पण केली होती. समाजाला जागृत करण्यासाठी अनेक पुस्तके जशी शेतक-याचा असुड, गुलागिरि वैगरे पुस्तके लिहिली आहे. ते जीवंत असे पर्यंत, त्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. त्यांच्या निधना नंतर तो विचारच निर्धन झाला असे म्हणायलां काहीच हरक नाही. तरी तो विचार काही वैज्ञानिक विचारधारा ठेवणा-या युवकांना आजही प्रेरित करतो. लोकांना सांगे ब्रम्ह्ज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण. जेव्हा महात्मा फुले यांचे वडिल मरण पावले होते. तेव्हा त्यांनी काही धार्मिक विधी न करता. समाजातील गरिब मुलांना भोजन आर्थीक मदत करुन आपल्या वडिलांची तेरवीं केली होती. समाजा समोर एक आदर्श ठेवला होता. प्रथम करावे मग जगी सांगावे. त्याचे त्यांनी अनुकरण केले होते. माहात्मा जोतिबा जरी आज आपल्यात नाही, तरी त्यांचे विचार आज ही प्रासंगिक, वैज्ञानिक आणी जीवित आहे.यात कोणाचे दुमत नसायला पाहिजे. त्याच्यां या विचारांचा प्रभाव एक तरुणा वर झाला होता. व त्याने तशी कृति करण्याचे ठरविले होते.
बहुजन समाजातील एका साधारण कुटुंबातील मुलगा शिक्षणा नंतर शिक्षित झाला होता. त्याला एक चांगली सरकारी नौकरी मिळाली होती. आपले गांव सोडुन तो शहरात आपल्या कुटुंबा सोबत राहत असे. त्याचा आनंदाने संसार सुरु होता. आपल्या आई-वडिलांना सुखी ठेवण्याचा तो काटे-कोर पने प्रयत्न करित होता. मातृ-पितृ सेवा हीच खरी ईश्र्वर सेवा यात त्याचा दृढ विश्वास होता. आई-वडिलान साठी आपल्या नविन घरात त्याने त्यांचा एक वेगळा कमरा पण बनवला होता. त्याचे मुल आणी पत्नि पण आजी-आजोबांची फार काळजी घेत होते. मुलगा पण आई-वडिलांची सारखी चौकशी करत होता. कुटुंबातील सर्वांची सेवाभाव प्रव्रुति बघुन ते धन्य झाले होते. आडात असेल तर पोह-यात दिसते. असे पुत्र-रत्न आपल्याला मिळाले हे पाहुन त्यांच्या डोळ्यातुन नेहमी आनंदाचे अश्रु आपल्या सगे-सबंध्या समोर निघत होते. तो एक आदर्श मुलगा होता. पण प्रकृति समोर कुणाचे काही चालत नसते. शरिर हे क्षणभंगुर असते. प्रत्येकाचा मृतु हा अटळ असतो. वडिलांचे अल्प आजारने निधन झाले होते. धार्मिक प्रथेनुसार वडिलांचा अंतिम संस्कार केला आणी आईला विश्वासात घेवुन वडिलांची तेरवीं व अन्य संस्कार न करता, आपण कोण्यातरी अनाथ आश्रमाला देणगी देवु असे सांगितले. व तशी चांगली देनग़ी वडिलांच्या नावाने त्याने अनाथ आश्रमाला दान केली होती. आईला पण आपल्या मुलाच्या क्रांतिकारी कृतिचे कौतुक वाटले होते.
आता वडिल मरन पावल्याची सुचना हळु-हळु परिचित व नाते-वाईकां मध्ये पसरु लागली होती. आपल्याला तेरवींला बोलावले नाही म्हणुन आपली व्यक्तिगत दुःख व्यक्त करण्यासाठी , प्रत्येक परिचित व नातेवाई आपल्या सोईनुसार जिल्हा मध्ये काम असतांना येवुन टपकत होता. तो आला की त्याची सर्व जवाबदारी जशि, रात्रीचे जेवन, झोपनाची व्यवस्था, सकाळचा चहा-पानी व दुपारचे जेवन, व नंतर त्याला जीथे काम आहे तीथे सोडुन देने. पोट भरे अन खोटे चाले. या पेक्षा अवघड कार्य म्हणजे वडिलांचा म्रुत्यु कसा झाला.त्यांना वेळेवर वैदेकिय उपचार झाला कि नाही ?.त्याच्यां कडे कशे दुर्लक्ष झाले असे अकेक प्रश्नांचे उत्तरे, पूर्ण कुटुंबाला जवळ -जवळ वर्ष भर देत होते. यात घर प्रमुखाची फार तारंबळ नौकरी मुळे सारखी उडत होती. नेमेचि येतो मग पावसाळा. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी वडिलांच्या मृत्युची कहाणी सारखी सांगावी लागत होती.
शेवटी कुंटुंबाने पत्रिका छापुन वडिलांचे वर्षश्राद्ध इच्छा नसतांना ,पटत नव्हते तरी करावे लागले. व ते कुटुंब मगचा या संकटातुन बाहेर पडू शकले होते. या घटने वरुन एक गोष्ट लक्षात येते कि काही स्वार्थी लोकांच्या हिताला जर कोणी डिवचण्या प्रयत्न केला तर समाजातील लोक त्याचा कसा दुर-उपयोग करतात !. हे आपल्या लक्षात येईल यात काही शंका नाही.
