स्वतःचे स्थान ओळखा...
स्वतःचे स्थान ओळखा...
या जगात आपल्यासाठी कुठे जागा असते?आपला वेडगळ, अवतार आणि गरीबीच प्रदर्शन कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी डोकावतोच कुठल्याशा कोपरयातन,शरमलयासारख, होऊन अति प्रयासान आनलेला आत्मविश्वास क्षणात गळून पडतो चिंध्या होतात विचारांच्या भावनांच्या. लकतर होऊन पडतात जमीनीवर त्यावर आपली च डबडबणारी नजर.भीती,शरम आणि तो काय म्हणेल,प्रश्न?दुसर्याच्या नजरेनं स्वःताकडे पाहण्याची फालतू ऊठाठेव. कारण कावकावणारया कावळ्यांच्या,नजरांना अपेक्षित वेगळच काही असतं ,भारी,ऊंची उच्च, उच्चभ्रू वगैरे वगैरे जे आपलयाला परवडणार नसतं एसी,रूमफ्रेशनरच्या ऊंची केबीन असणार्या ऑफिसातल्या संगमरवरी फरशीवर आपण किती सावरून कृत्रिमपणे चालून का? प्रयत्न करायचाय, त्याच्याप्रमाण मलाही जमतंय, सार म्हणून आपलो सरावलेली बेधडक चाल बेडी घातलयासारखी मंद करायची. आणि मग ऊसनच हसू गालातल्या गालात खोटेच!का तर शिष्टाचार. मग आपल्या खळाळ त्या, मोकळ्या हास्याला दाबून ठेवायचे का?तर आपलयाला इतरासारखे फोरवर्ड बनायचय ना!बरोबरीने चालवायचय पुढे जायचंय,मग खर,नैसर्गिक सार, तुमच्या घरातल्या खोलीच्या चार भिंतीत कोंडायच, कृत्रीम बेगडी सार जमा करत वावरायच बैलपोळयाला ऐक दिवस सजविलेलया बैलासारख,मान हलवत झुलत रहायचं, मिसळून जायचं या गर्दीतला एक चेहेरा व्हायच.वाटत कधीतरी आपण आपापलयाच, समजावावे,आपले विचार फार भारी वगैरे आहेत मांडून पाहू जगासमोर ,कधी कधी ऐकिवात असतेच ना शरीरापेक्षा मन चांगले हवे,बाहयरूपापेक्षा अंतर रूप सुंदर हवे आणि काही बाही...... हे खरही असेल पण ईथ वेळ कोणाला आहे तुमचे भलेमोठे व्याख्यान ऐकायला, वाचायला जो तो धावतोय कोणी पैशामाग,कोणि प्रसिद्धी साठी,ध्येयासाठी, प्रेमासाठी ,नात्यासाठी, कोणाकोणासाठी, कोणी तर दुसरा पळतोय म्हणूनही धावतोय उगाच!आपण आपल ठरवावं गर्दीतला ऐक व्हायचय की आपल्यांसाठी गर्दीला जमायला मजबूर करायचं.जो तो दुसऱ्याचे पाय खेचून आपल अस्तित्व साभाळतोय मग आपणही तेच करायचंय की आपल्यांसाठी कायमचं आढळपद दयावच लागेल या सुसाट सूटलेल्या धाव त्या श्वासांना काही क्षण आपल्याकडे पाहून रोकायला मजबूर करण्याची कला साधेल काय मल.ते ठरवायचं शेवटी काय जागा हिसकावून, बळकावून,भांडून ,भीक,किवा दयेने मागयची की?कर्तृत्वाने स्वतःचा स्पेस निर्माण करायचा असा की जिथे मुखवटयाची,खोट्या प्रतिष्ठेची, मोठेपणा,आपण जे खरेखुरे आहोत ते लपविण्याची श्रीमंतीचा,फुकाचा बडेजाव करून कुरघोडी करण्याचा, अट्टाहास आणि गरीबीची लाज मुळीच नाही. वाटणार कारण नजरानां आपण जसे आहोत तसेच स्वीकारण्याची,आपल्यासाठी विचारांना बदलण्याची कुवत आपल्या हातात असल्यास पत्ते कोणी कसेही पिसू देत चित आणि पट आपलीच असते, कायम...पहा जमतंय का?
