सुप्त रंग
सुप्त रंग


होय! एकदम अंगात येत अंगात संचार होतो झपटल्या सारख होत झाड मुळा पासून हालत गदा गदा हलायला लागत पाने थर थर कापतात वेळ काळ याच भान रहात नाही मग चालू होतात प्रसव वेदना डोक गरगरत मेंदू झोपेत ही तल्लख होतो कोण तरी उठावत त्यातून फक्त ब्रह्मस्वरूप उजेड बाहेर पडतो अगदी झोपेत सुद्धा चालु होतात नियतीशी खेळ धी धृति स्मृति जागृत होतात थैमान घालत वादळ घोंगवणार समुद्र मन्थनाच काम चालु होत धि धृति शी सांगड घालते धृति म्हणजे सन्कल्प जो सिद्ध होणार असतो
धी धृति स्मृति शी सलग्न होते मग फेर धरून नाचु लागतात अनेक स्मृती
स्मृति। चाळ वल्या जातात त्या धृति शी गप्पा मारू लागतात नंतर
कार्य सिद्धीला। माँ सरस्वतील पाचारण करतात
मग काय तप्त तव्यावर राजगिरा टकावा तश्या शब्दांच्या लाह्या तड़ तडू लागतात शब्द फेर धरतात शब्द मन्थना तुन अनेक शब्द जे आहत अनाहत नाद घेवून येतात त्याला सरस्वतीचा वरद हस्त लाभला की अलंकार असावे असे मोत्याचे दाणे लगडून बरस्तात जसा पत्थरला पाझर फुटाव। तसे शब्द शब्दाला
मिठीत घेवून नाचु लागतात
खरी प्रसव वेदना एथेच चालू होते
स्मृतितल्या घटात घटित अघटित काल्पनिक जगात वावर चालू होतो मग सुगरण कशी घरटे विणते तसे अक्षरांचे जाळे विणले जाते त्यातूनच कवितेला जन्म घ्यावे लगते
ती उस्फुर्त ता आर्त किंकाळी ने बाहेर पड़ते निर्गुण निराकार सगुण साकार अश्या दोन्ही स्वरुपात मूर्त रूप आकर घेते आकार घेत असता त्याला अलंकार। धारण करण्याची उपजत बुद्धी येते अश्या सलंकार सरस्वतीचे दर्शन घेत असता साग्र संगीत षोडशोपचार अभिषेक करीत आहोत असे परेला भासते
(परा पश्यंती मद्धमा वैखरी )
परा ही अंतर देवता त्यापासून तयार होणारा प्राण पश्यंती मध्यमा व्यान वायुचे कार्य करत धृति जागृत करतात त्यातून अभ्यन्तर वैखरी मस्तिष्क मधे येवून बसते नंतर अपान वायु रुपात हस्त लिखीत स्वरुपात प्रगट होते तीचे स्वरूप कसेही सगुण साकार निर्गुण निराकार
त्यालच आपण प्रतिभा मानतो का ?
जरी तसे मानले तरी त्यामधे ओज असणे ओजस्विता येणे हे जरी प्रतिभाधीन असले। तरी त्याला नियती शी सामोरे जावे लागते ती जशी व्यक्त होईल तसे त्यातून ब्रह्मस्वरूप आनन्द मिळतो मी माझेपण गळून पड़ते
अहंकार सुख दुःख षड् रिपु ह्यांच्याशि देणे घेणे लागत नाही. आत्मा सछिदानन्द स्वरूप पञ्चरूपशि एकरूप होऊन पाँच भौतिक सुखासाठी लागणा रे
विषय शब्द स्पर्श रूप रस गन्ध
पाझरु लागतात अतिउच्च तन्मात्रा ह्या प्रकृतिशि एकरूप झाल्या की शब्दांचे फुलोरे मनोरे कांगोरे दिसाव्यास लागतात
हे सर्व अचानक असत् म्हणूनच त्याला प्रतिभा म्हणतं असावेत,
उस्फुर्तता कोणत्याही स्वरुपात प्रगट होते मग ते साहित्य असो वां संगीत वा नाट्य कला क्रीड़ा इत्यादि... ती सदैव जागृत च रहाते ती उपजत असते.
प्रदन्या वन्त अभ्यासक लेखक पत्रकार मग तो कोणीही असो त्याची सरस्वतशि
नाळ जोडली जाते किंबहुना ते सरस्वतीच्या दरबरातील ते भाट ठरतात त्यामधे एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पञ्च भूते त्याचे विषय शब्द स्पर्श रूप रस गन्ध हयाविषयांचे अनुभव प्रगल्भ् असले पाहिजेत
त्यानुसार धी धृती स्मृति यांची सांगड घालता आली पाहिजे
महत्वाचे म्हणजे मन व् आत्मा जागृत ठेवला पाहिजे तो त्या कला आकृती त दिसला पाहीजे
मनाचे अधिष्ठान मस्तिष्क तर आत्मा ह्रदया स्तिथ दोन्ही गोष्टी अस्थिर त्यात मनाचे चलन वलन
मारुत तुल्यम् वेगम त्याला वष करून कार्य सिद्धीस गेले पाहिजे
विचारवन्ताला हे विवेचन योग्य आहे पण सामान्य माणसा चे काय तो प्रतिभावन्त नाही ?माझ्या मते श्रुष्टीतील चराचर जीव् प्रतिभावान आहे पशु पक्षी क्षुद्र कीटक फुले पाने पखरापासून काजव्या पर्यन्त त्याना उपजत ईश्वरी देणगी आहे मोर मोर पिसारा त्याचे नाचणे त्याच्या पंखावरचे नैसर्गिक रंग फूल पाखरे त्यांचे रंग त्यातील कला कुसर हे काय आहे ?
साधा अडाणी शेतात राबणारा शेतकरी ही सर्व सृजनात्मक रचनाकार आहेत जेथे जेथे सृजन आहे तेथे तेथे पञ्च भुता चा पाझर आहे पञ्च विषयांचा कारक आहे तो निमित्य कारण का होईना प्रतिभावान आहे मग ते
कुम्भराचे मडके असो वा सुतराचे लाकड़ी कोरीव काम असो
पाथर वटाचे दगडा वरील लेणी नक्षी वा गवण्ड्याचे स्था पत्य कला शास्त्र असो ह्या 12 बलुतेदारांची सृजनात्मक कल्पना निर्मिती ही त्या त्या कलेस पूरक ठरते
अंजिठा वेरूळ ची लेणी असो दक्षिणेतिल गोपुर पद्धतीची मन्दिरे असोत पट्ट द कल्ल येथे तर मन्दिर प्र शिक्षण संस्थाच होती बेलूर हळे बीड येथे तर दगडातील जीवन्त प्रतिमा व् प्रतिभा ओतप्रोत ठासून भरलेली दिसून येते रामायण महा भारत वात्सायन यांचे महा काव्य दिसून येते असाच अचर ठेवा विविध वनस्पति वेली वॄक्ष ह्यांच्या ठेवणी ह्यांचे शास्त्र सांगणे कठीण होते.
त्यांचे विविध आकर फुले त्यांचे रंग त्यांची रचना जीवनक्रम ह्या निसर्गदत्त नियमाने ओसांडून वहात असते, काहीना सुंगध काहीना उग्र वास उदाहरणे भरपूर आहेत विवधता ही आहे.
मानव जीवनाशी ह्या सर्व गोष्टींची नितांत गरज आहे किंबहुना जीवन हे एक प्रकारचे प्रतिभावान आहे ते कोणाला टाळता येणार नाही.
त्याचा अस्वाद कोणी कसा घ्यावा हे ज्याचे त्यांनीच ठरवायचे असते..
म्हटल तर प्रतिभा निसर्ग सृजन ह्या गोष्टी एक असावेत असे वाटते.