वैराग्य
वैराग्य


समाधान
म्हणजे काय हो माणूस कधी समाधानी असतो काय? रोजच्या रोज त्याच्या काही ना काही उचापती चालूच असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक भानगडीमध्ये त्याचे शरीर, मन थकत असते. म्हणूनच तर रात्र देवांनी निर्माण केली असावी. त्यात सुख-दुःख हे अमावस्या-पोर्णिमेसारखेच असावं, असं वाटतं. कधी चांदणं तर कधी काळी कुट्ट रात्र...
रात्र काळीकुट्ट कशी असेल बरं, नक्षत्राच्या माळा या अंधारातच दिसतात. त्यात आकाशगंगेचा नजारा काही औरच असतो. निसर्गाला हे सांगायचे असते की, कितीही दुःखात असलास तरी त्यातूनही काहीतरी नक्षत्रासारखे सुखपण शोध. गरज ही शोधाची जननी आहे.
माणूस समाधानी केव्हा होतो तर त्याला पूर्ण विरक्ती आल्यावरच. म्हणजेच अंतर्बाह्य वैराग्य प्राप्त झालेले असते. तो काम, क्रोध, मद इत्यादी षड्रिपुपासुन विभक्त झालेला असतो. याचाच अर्थ तो उच्च कोटीला पोहचलेला अवलिया किंवा अवधूत म्हणजेच तो संत किंवा महात्मा!
माणूस सर्व कर्तव्यातून मुक्त झाला, त्याची इतिकर्तव्यता संपली की तो क्वचितच या पदाला जातो. काही महाभाग जीवनात जीवंत असेपर्यंत तो येनकेन प्रकारेण तो उपभोग घेत असतो. सहाजिकच आहे जीवन हे सप्तरंगी आहे ज्यावेळी फक्त पांढरा रंग खुणावतो त्यावेळी त्याला वैराग्य प्राप्त होते.
सुख-दुःख हे उजेड-अंधार अमावास्या-पौर्णिमेसारखेच असतात. काळ्या रात्री जो आकाशातील नजाकत हेरतो, तोच
दुःखातून सुख प्राप्त करतो. मानवी जीवनात हर तऱ्हेने प्रसंग येत असतात. धीराने जो सामोरा जातो तो खचितच यश प्राप्त करतो. माणसाने असमाधानी असावे असा मत प्रवाह आहे कारण तो काही ना काही उपद्व्याप करून त्याच्या ध्येयाप्रत पोहोचतो. काहींना अनेक जिज्ञासा असतात त्या न समपणाऱ्याच असतात. कोणी धन लालसा कोणी ज्ञान लालसा अशा अनेक प्रकारे तो झगडत असतो.
समाधान मानण्यात आहे -
अशानं मे वंशनम मे
जाया म मे बंधु वर्गो मे इति
मेमे कुर्वाणा म
काल वृकोपाय हांती
पुरुषायजम
हेच खरे तुर्त मी इथेच थांबतो
आपली रजा घेतो.