Gangadhar joshi

Others

1.0  

Gangadhar joshi

Others

मृत्यू

मृत्यू

2 mins
586


पहिला श्वास व शेवटचा श्वास या दोही मधील अंतर म्हणजे आयुष्य किंवा जीवन . पहिला श्वास कुठे केव्हा कसा घ्यावा हे जसे आपल्या हातात नाही तसेच शेवटचा श्वास कुठे केव्हा कसा घ्यावा हे पण आपल्या हातात नाही 

याचाच अर्थ जन्म व मृत्यू हे दैवधीन आहेत असेच म्हणावे लागेल दैवधीन हा शब्द फक्त अस्तिकासाठी वापरला आहे इतरांसाठी नैसर्गिक म्हणावे लागेल 

    ज्यादिवशी आपण जन्म घेतला असतो त्याच दिवशी आपला मृत्यू हा पण ठरलेला असतोच death is cock sure कोणीही इथे अमरत्वा चा पट्टा घेऊन आला नाही जो आला तो गेला . एक दिवस प्रत्येकाला च जायचे आहे असं जरी असले तरी काहीजण अल्प आयुषी असतात तर काहीजण दीर्घायुष्य पण घेऊन आले असतात . मृत्य हा वय झाल्यावर म्हातारपणी सर्व अवयव क्षीण झाल्यावर जो मृत्यू येतो तो नैसर्गिकरित्या असतो तर काहीजण आकालीच ह्या जगातुन नाहीसे होतात 

तर काही आपत्कालीन स्थितीत exit घेतात उदा अपघातात / भूकम्प / सुनामी / अशी उदाहरणे देता येतील

   वैज्ञानिक भाषेत मृत्यू हा अनेक प्रकारचे रोग घेऊन येतो उदा ह्रदयापघात / वृक्क ( किडनी ) निकामी होणे / ब्रेन डेड / respiretory failure इत्यादी ही यादी खूप मोठी आहे कारण काही का असेना त्याने बोलवले की जावेच लागते त्याने म्हणजे यमाच्या दरबारी

   दीर्घायुषी ची सूत्रे अनेक असली तरी दीर्घायुष्य हे मागुन यावे लागते म्हणजेच Health is Wealth आरोग्य उत्तम असेल तरच तो जीव इतर गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो अन्यथा नाही मधुमेही आहे दीर्घायुष्य काय कामाचे त्याच्या वागण्यात खाण्यात पिण्यात बंधने येतातच 

याचाच अर्थ असा की तुम्ही निरोगी असाल तरच धर्म अर्थ काम मोक्ष या चतुःरविध तुम्हाला उपभोगण्यास मिळतील 

    काहीवेळा लोक तडकाफडकी च नाहीसे होतात काल तर चांगला होता अन एकदम कसा काय गेला 

मृत्यु कसा ही असला तरी तो घरी दरी कौटुंबिक लोकांना मनास चटका लावून जाणारा असतो मृत व्यक्तीची उणीव सतत जवळच्या नातलगांना भासत असते व त्याची आठवण पण सतत येत असते अकाली मृत व्यक्तीच्या घरी तर हे अनुभव हमखास दिसतात च तो जर कमावता असेल तर पूर्ण कुटुंबाची वाताहत लागते त्याच्या असण्याने जो आधार असतो तो आधार पूर्ण गमावले जाते व मानसिक आघात ही काहीवेळा होत असतो मृत्य हा अटळ असला तरी तो लगेचच कोणाला नको असतो कारण प्रत्येकाला आपला जीव हा प्याराच असतो 

     अस असलेतरी exit ही घ्यावीच लागते त्याला उत्तर नाही अप्रिय अशी जीवनातील अटळ गोष्ट म्हणजेच मृत्यु पंचभौतिक शरीर मधून आत्मा गेला जीव गेला की मग राहते ते कलेवर / शव शिव गेला की शव राहते मृत्यूनंतर जी कळा त्या घरावर येते त्याला सुतक हा खुप योग्य शब्द आहे सगळ्यांचे चेहरे हे सुतकी च झालेले असतात 

    म्हणून च त्या घरातील लोकांना मानसिक आधार देण्यासाठी नातेवाईक / शेजारी / गावातले / भावकीतले लोक भेटी देतात व सांत्वन करतात 

मृत्यू हा निसर्ग नियम आहे तो कोण्ही मोडू शकत नाहीत काही बहाद्दर मृत्यू कधी येणार हे जाणत असतात व त्याला आनंदाने सामोरे जाणारे ही लोक आहेत 


तुर्थ मी इथेच थांबतो व आपली रजा घेतो 


Rate this content
Log in