प्रश्न
प्रश्न
प्रश्न म्हणजे काय त्याची व्याख्या कोण केली आहे का ?
सरधोपट मार्गाने जेव्हा आपल्याला अडचण येते त्याला प्रश्न म्हणता येईल अडचणी वर मात करणे म्हणजे त्याचे उत्तर होय. बालपणापासून ते शिक्षण होई पर्यंत जे प्रश्न सोडवत आलोय मग ते विद्यपीठाचे असोत वा शालान्त केंद्रीय बोर्डाचे असोत हे प्रश्न व त्याचे उत्तर ठराविक क्रमिक पुस्तकात असतात पण ती परिक्षा असते होय
प्रश्नच नसते तर काय झाले असते ? हीच तर जीवनाची गम्मत आहे हा अडीच अक्षरी शब्द भलताच मेटाकुटीला आणतो पहिला प्रश्न कोणता होता असं जर विचारलं गेलं असेल तर नक्कीच तो अन्न वस्त्र निवारा ह्या सम्बधी असणार नंतर जस आपण प्रगत होत गेलो त्यांनतर इतर प्रश्न निर्माण झाली असतील
प्रश्न आहेत म्हणूनच जीवन आहे नाहीतर जीवनाला काही अर्थ उरला नसता माणूस आळशी झाला असता पूर्वीच्या तुलनेने अलीकडे मानवाला अनेक संकटे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे आणि ही संकटे किंवा प्रश्न मानव निर्मित आहेत नैसर्गिकरित्या येणारी संकटे प्रश्न सुद्धा मानव निर्मित आहेत
म्हणूनच रात्रंदिन आम्हा युध्दा चा प्रसंग अस म्हणावे लागते करणे अनेक आहेत प्रश्न हे वयक्तिक सामाजिक अशी कितीतरी असले तरी हल्ली ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे काही वेळा मिळतात काहीवेळा मिळवण्यासाठी खस्ता खाव्या लागतात मग त्यात आंदोलन मोर्चे
उपोषण हे सामाजिक प्रश्नाबाबत म्हणता येतील तर खासगी व वयक्तिक प्रश्ने ही ज्याची त्यालाच अथवा काही जणांच्या मध्यस्थीने वा मदतीने सोडवावी लागतात
काही प्रश्नांची उत्तरे च नसतात त्यावेळीं त्या व्यक्तीचे शारीरिक नन्तर मानसिक परिणाम दिसू लागतात उत्तर असूनही तिथपर्यंत जर पोहचता आले नाही तर काही व्यक्ती व्यसनाचा आधार घेतात काहीवेळा टोकाचे पाऊल म्हणून आत्महत्या सुद्धा करून घेतात मग आम्ही त्याला मानसिक / व्यसनिक म्हणुन दुर्लक्ष करतो त्याचे मन सतत न्यूनगंड बाळगत फिरत असतो त्यातून मानसिक रोग बळावत जात असतात
जीवनाचे प्रश्न काही वेळा नानाविधप्रकारे छळत असतात त्याचे उत्तर कोणत्याही विद्यापीठात वा सुप्रीम कोर्टातसुद्धा मिळत नसतात अश्या वेळी माणूस हतबल होतो
ठेविले आंनते तैशेची राहावे
चित्ती असु द्यावे समाधान
अशी उक्ती काहीवेळा सार्थ ठरते
काहीवेळा काही प्रश्नांची उत्तरे ही काळा कडेच सोपवावी लागतात
खरंच त्याची उत्तरे उशिरा मिळतात
जीवन हे बऱ्याच विविध रंगानी भरलेला आहे त्या त्या रंगाचे सुख प्रत्येक वेळी मिळेल असे नाही जे मिळेल त्यातच समाधान रहा व जीवन जगा. जीवन कसे असावे तर ते प्रश्न युक्त च असावे त्याशिवाय जगण्याची मजा नाही मित्रानो
प्रश्न हे मानवाच्या पाचवली च पुजले आहेत त्यांची उत्तरे शोधा
व मानव जीवनाचे सार्थक करून घ्या