गुलाब डे
गुलाब डे


कोणे एकेकाळी संत व्हॅलेंटाईन होऊन गेले व त्यांनी प्रेमाचा संदेश दिला प्रेम करा असा संदेश त्यांनी दिला त्याचे प्रतीक म्हणुन आपण 14 फेब्रुवारीला हा सण साजरा करू लागलो तो वेगळ्याच अर्थाने प्रेयसीला पटवण्यासाठी व मनवण्यासाठी असा वाम मार्गी अर्थ कडून प्रत्येक जण हा प्रयोग करू लागले लागली तर गोळी नाहीतर नाही ह्या उद्देश ठरवून आपल्यावर प्रेम न करणाऱ्या मुलीस पण गुलाब फुल देऊन प्रेम व्यक्त करु लागले. हरकत नाही प्रेम जरूर करा पण ते एकतर्फी असता काम नये प्रेम करण्यापूर्वी प्रेम म्हणजे काय हे आधी ओळखा शिका जर खरेच एकमेकांवर तुमचे प्रेम असेल तर जरूर हा सण साजरा करा कोणाचा विरोध नाही. प्रेम हे फक्त प्रेयसीचीच असतं का. इतर प्रेम असू नये का प्रेम हे भावा / बहिणीबरोबर इतर आई वडील नातेसम्बधी प्रेम नसतं का. कबूल प्रेयसीचं प्रेम व इतर नातेसम्बधी प्रेम वेगळं असतं संत व्हॅलेंटाइन नि तसं कुठं सांगून ठेवलं आहे का. फक्त प्रेम हे प्रेयसी बरोबरच फक्त आणि फक्त 14 फेब्रुवारी लाच करावे इतरवेळी नको.
प्रेम म्हणजे काय ह्याची व्याख्या तर करता येते का? ठीक आहे चला व्याख्या करता येत नाही म्हणुन सवंग तेच प्रदर्शन तरी का खरा जो प्रेम करतो ते अस प्रदर्शन करीत बसत नाही एक गुलाबाचे फुल दिले लगेच प्रेम होतं का? रोज डे
चॉकलेट दिलं म्हणून चॉकलेट डे असं जर होत असेल तर मग एक भाकरी द्या बघू भाकरी डे साजरा करण्यात तुम्ही मागे का? कैक अनाथ गोरगरीब अन्नासाठी उपाशीपोटी मरत आहेत त्यांच्यासाठी कुठलाही डे असू नये? 125 कोटींच्या देशात जिथं संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर इत्यादी कैक प्रभृती होऊन गेल्या त्यांच्या देशात भाकरी डे असू नये याची खंत तर आहेच भुतां परस्परे जडो मैत्र जीवाचे अस संत सांगतात. अरे मित्रांनो जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं ब्रह्म आहे हे सांगणारे शंकराचार्य. पशु पक्षी चर अचर वृक्ष हे सुध्दा सजीव आहेत रे कधी केलंय तुम्ही ह्या गोष्टी वर प्रेम
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे दिनचरे कधी प्रेमाने झाड लावलेत कधी प्रेमानं त्याला पाणी पाजलेत पशु पक्षी झाड ह्यांना प्रेम दिलंय डॉग डे कॅटस डे नेचर डे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून ह्या भारत वर्षात आपला जन्म झाला भारत ही हजारो ऋषी मुनींची संतांची अवलीयांची तपोभूमी कर्मभूमी... प्रत्येकानी प्रेमाचाच संदेश दिला आहे. एव्हढंच नाहीतर शेजारी पाजारी जात धर्म या पलीकडे जाऊन सदैव प्रेमाचाच संदेश दिला आहे प्रेमाने सलोख्याने रहा. दान धर्म करा. असे असताना व्हॅलेंटाईन बाबाचं एवढं स्तोम का वाढवताय त्यांनी पण सर्वांवर प्रेम करा असा संदेश दिला असताना फक्त गुलाब डे चीच का आवर्जुन आठवण येते तो एकच दिवस का? इतर दिवशी का नाही.
ह्यातून एकच स्पष्ट दिसतंय की खर प्रेम त्याना कळलंच नाही. प्रेम ही काय बाजारातील भाजीपाला नाही तुम्हाला आयुष्यभर ते करायचंच असतं मग गुलाब डे का? तुम्ही जे करत आहात ते वासनांध प्रेम असलं बेगडी प्रेम काय कामाचं काहीवेळा ह्यातूनच एकतर्फी प्रेम ज्यास्त असण्याची शक्यता व त्यातूनच निर्भया / किंवा हिंगणघाट अशी प्रकरणे तयार होतात.
प्रेम करा जीवनात आवश्यक गोष्टच आहे ते फक्त तकलादू वा एकतर्फी असता कामा नये गुलाब द्या चॉकलेट द्या गिफ्ट द्या आमचे काही म्हणणे नाही पण जे कराल ते मरेपर्यंत करा. कोण्या मुलीचे जीवन मातीमोल करू नका.
तिला शेवटपर्यंत साथ द्या तरच तो गुलाब डे चा खरा सन्मान होईल व व्हॅलेंटाईन गुरुजींचा पण !