Gangadhar joshi

Others

1  

Gangadhar joshi

Others

बिग बँग (देव )

बिग बँग (देव )

3 mins
808


जगात आहे का हो देव ?

कुठं असेल बर जळी स्थळी काष्टी पाषाणी की हिरण्यकश्यपू ने फोडलेल्या खांबात खांबातून नरसिंह प्रगटला व त्याने हिरण्यकश्यपू ला अंतराळ धरून फाडले वध केला तोच का देव ?

    देव दानव यांचे युद्ध प्रसंग अनेक हिंदु धर्म ग्रँथात दिसुन येतात दैत्या सुरांचा वध अनेक वेळा देवी चण्डिका ने केला ह्या सर्व झाल्या दन्तकथा ह्यापुढे ही जाऊन सध्य स्थितीत कली युगात देब आहे का ?

    अनेक तीर्थक्षेत्र आज गजबजलेल्या अवस्थेत दिसतात राहण्यास जागा मिळत नाही एवढंच काय दर्शनाला ऑनलाइन नंबर लावावा लागतो मला कोणत्याही तीर्थ क्षेत्रा बद्दल टीका कर्यायची नाही आहे मग ते तिरुपती असो काशी रामेशवर असो वा मक्का मदिना असो वा अमृतसर असो प्रत्येक धर्माच् काही विशिष्ट स्थाने आहेत त्या ठिकाणी हमखास गर्दी ही 12 महिने 24 तास असतेच. 

    आजच्या विज्ञान युगात सुध्दा देव कश्या स्वरूपात आहे ते मला / तुम्हाला व्यक्त करून सांगायचे आहे देव हा सगुण साकार रुपात / निर्गुण निराकार रुपात आहे असे मानले तरी मला 

देव सगुण रूपातच भेटत आला मला दिसला मी पाहिलं  

     तो निसर्गाच्या सानिध्यात विविध रुपात च तर आहे फक्त आपली दृष्टी हवी डोळे उघडुन पाहिले तर त्याचे स्वरूप अथांग सागरा प्रमाणे विस्तिर्ण आहे 

सागराच्या पोटात असणारे अमुल्य ठेवा मग ते सर्व प्रकारचे प्राणी / जलचर आले शंख शिंपल्यातील मोती / कवड्या / प्रवाळ इत्यादी चा ठेवा हा रत्नाकर च देतो 

    विविध पक्षी विविध प्राणी मात्र विविध वनस्पती जँगली श्वापदे ही निसर्गाची ठेव नसुन ती पर्यावरण पूर्वक निसर्ग साखळी आहे विविध रंगाचे पक्षी त्यांचा मंजुळ आवाज त्यांचे अस्तित्व मनाला भारावुन टाकते विविध रंगाची मनमोहक फुले त्यांचा वास हाच देवता चा भास निर्माण करतात विविध कृमी कीटक नाना जातीचे फुल पाखरू त्यांचे रंग कोकिळेचा मधुर स्वर मोराच्या केकावली नृत्य हे सर्व मला देवासारखे च वाटतात 

   विज्ञान किती ही पुढे गेले तरी ह्या सर्व नैसर्गिक गोष्टी बदलत नाहीत. त्या यावततचन्द्र दिवाकर तश्याच असतात किंबहुना मध्ये इक वैज्ञानिक प्रयोग केला गेला बिग बँग नावाने त्याची परिणीती म्हणून त्यांना गॉड पार्टीकल मिळाले, असो. 

   चन्द्र सूर्य ग्रह तारे अवकाश हे जिवंत देव च वाटतात 

चन्द्र म्हणजे हळद सूर्य म्हणजे कुंकु.. हळद कुंकू हेच देव म्हणजेच नर व नारी हेच देवाचे खरे रूप!! म्हणजेच तुम्ही आम्ही सर्वजण देवाचे अंश आत्मा हाच देव.  

   ब्रह्म हेच श्रेष्ठ तोच देव  

म्हणूनच शंकराचार्य म्हणतात

ब्रह्म म सत्यम जगन मिथ्या

जिवो ब्रह्माई नापर ।।

   प्रत्येक प्राणीमात्रां त च देव आहे मग तो चर असो वा अचर

अचर म्हणजे 

 वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी 

सक्ष्यात सूर्य नारायण हाच देव 

आजच्या विज्ञान युगात सूर्य प्रकाश आहे सूर्य आहे म्हणूनच ही श्रुष्टी आहे ज्याच्या पोटात हायड्रोजन बॉम्ब च्या रुपात ठासून ऊर्जा भरली आहे तो सूर्य 

म्हणजेच प्रत्येक्षात नारायण....

   विचार करून बघा जर सूर्य निस्तेज झाला तर काय होईल ???

काय होईल ❓ अहो ग्रह ताऱ्या मध्ये असणारी चुंबकीय शक्ती च नष्ट होईल अवघ्या 5 मिनिटात च 

पृथ्वीवर जल प्रलय माजेल हा असणारा निसर्ग नाहीसा होईल 

श्वास घेण्यास प्राणवायूचा तुटवडा होईल जीवन शक्ती च नाहीशी होईल. चुंबकीय कक्ष बदलतील गुरुत्वाकर्षण नष्ट होईल सर्व चराचर अवकश्यात अंतराळात भरकटत जातील.

कित्येक गोष्टी क्षणात नाहीश्या होतील 

    सूर्य चन्द्र ग्रह तारे नक्षत्रे ह्या एकमेकांना पूरक आहेत सूर्य हा तारा च निसर्ग जीवन बांधुन ठेवतो आजच्या काळात चक्षुर्वाई सत्यम हा देव दिसतो म्हणून च प्राचीन काळा पासुन सूर्य स्तुती सूर्य आराधना करणारे ऋषी मुनी  हे द्रष्टे होते असच म्हणावे लागेल.


Rate this content
Log in