Gangadhar joshi

Others

5.0  

Gangadhar joshi

Others

विकास

विकास

2 mins
671


सोनेरी कोवळ्या किरणांनी त्या रस्त्यावर जाग आली धुक्याची दुलई अजुनी पहुडली होती त्या धुक्यातून वाट काढीत हजारो किरणांनी पहाटेची सनई आळवली पक्ष्यांचा किलबिलाट चालूच होता कुठून तरी दूरवरून मोरांच्या केका ऐकू येत होत्या 

गाव पाणंद वर जरा वर्दळ सुरू झाली त्यातूनच बैलांच्या गळ्यातील घुंगुरु ची नाद ब्रह्म अनुभूती मिसळत होती एकेक करून काही शेतकरी कोण औत धरून कोणी खुरपं दोरी घेऊन कोणी भांगळण करण्यासाठी जात होता काही गावकरी प्रातर्विधीसाठी पाणंद जवळ करीत होता 

   दिवस कासराभर वरच सरकत होता तशी त्या डांबरी रस्त्यावरची काही लोक येऊन गोळा झाली होती मिरज बेळगांव हा रस्ता तसा एकेरीच होता तशी ह्या रस्त्यावर वर्दळ कमीच होती

    हा राजरस्ता खूप देखणा विलोभनीय होता कारण ही तसेच होते ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारी नाना तऱ्हेची पुराण पुरुष वृक्ष त्यांच्या डेरेदार फांद्या नी रस्त्याच्या मधोमध कमान केली होती त्या कमानी मधुन जाणारा एकेरी डांबरी रस्ता हा राजा सारखा डौलदार दिमाखात उभा होता। 

   आम्ही लहान असताना ह्या रस्त्यावरची संध्याकाळ अनुभवणे हेच आमच्यासाठी पराकोटीच वाटत असे तस कधीतरी एखादी बस किंवा मालट्रक एखादया पाटील लोकांची जीप किंवा बुलेट बघण्यास मिळे तेव्हढंच विरंगुळा आम्ही लहानाचे मोठे झालो ते ह्या रस्त्याचे सहा सोहळे पाहुनच प्रत्येक ऋतूत ह्या झाडाचे रस्त्याचे वेगळेपण व सौंदर्य प्रत्येक ऋतूत वेगळेच दिसत असे व मनाला उभारी देत असे त्यांचे रूप त्यांची वाढ हिरवं कच्च रुपडं ते त्या रस्त्याला प्रासादिक करीत असे. 

    रस्ता त्यावरचे मैलाचे दगड बाजुची झाडे जश्याच्या तशी होती गावातील किती तरी डोई होऊन गेल्या पण रस्त्याचे राजसपण ढळले नव्हते त्यांचा अजानबाहू फांद्या व हातात न मावणारे रुंद बुंधे हे वाढतच होते

    पण एक दिवस ह्या सर्वांना दृष्ट लागली ती विकासाची विकासाच्या नावाखाली ह्या रस्त्याचं दुपदरीकरण होणार होत व त्यासाठी ह्या आलिशान पुराण पुरुषांच्या अंगावर कुर्हाड कोसळणार होती ज्या झाडांनी पक्षी पशु मानव याना सावलीचा घराचा आश्रय दिला त्या सर्वांवर पाणी फिरणार होते त्यांच्या उपकाराची परतफेड त्यांच्या कत्तली करून होणार होती 

महामार्गाचे समृद्धीकरण ह्या गोंडस नावावर उभ्या निसर्गावरच घाला येणार होता कारण काय तर विकास व रोजगार हमी 

 या सर्व गोष्टींचा त्या रस्त्याला व झाडाला अजुनी थांगपत्ता नव्हता

   दिवस मावळतीला झुकत होता तशी सोनेरी तिरपी किरण त्या झाडाच्या शेंड्यावर पडत होती पक्ष्यांची किलबिलाट चालूच होता ते विसाव्याला झाडावर येऊन बसली तशातच एक जीप धुरळा उडवत गेली अंधारून आलं होतं त्या क्षणीच अंधाराचा फायदा घेऊन एक सर्प झाडावरून सरपटत खाली उतरला व तो बाजूच्या रानात शिरला...

का कुणास ठाऊक त्यालापण विकासाची कुणकुण लागली असावी...


Rate this content
Log in