विकास की भकास
विकास की भकास


खरच विकास हा शब्द च मुळात लोभस आहे विकास म्हणजे काय अनेक प्रकारचे विकास आहेत व्यक्तिमत्व विकास / स्वतःचा विकास / घरचा / गावचा / राज्याचा / देशाचा असे कितीतरी विकास प्रश्न आहेत, पण महत्वाचे म्हणजे आर्थीक विकास हा महत्त्वाचा.. सर्व नाटक करता येतात पण पैशाचे नाही त्याच बरोबर राहणीमान याचा विकास आज कैक पट वाढला आहे.
प्रत्येकाला आज सर्वगोष्टी ची सुविधा हवी आहे. त्यासाठी तो धडपड करत आहे. खरच आपण कितीतरी प्रगती केली आहे खेडयांनी सुध्दा कात टाकली आहे. प्रत्येकाची घरे बदलली आहेत 2 bhk ही संकल्पना रूजू लागली आहे, घरोघरी TV फ्रीज संडास बाथरूम पाण्याचे ड्रेनेज गटारी / प्लम्बर घरापुढे गाडी बैलगाडी गेली व धुर सोडणाऱ्या गाड्या दिमतीला मिरवत आहेत.. गाड्या वाढल्या म्हणून दळणवळण सुचित्र होण्यासाठी रस्ते / डांबरीकरण ही आले काही शहरे तर इतकी वाढली की गायरान च काय जंगले सुध्दा नष्ट करून सिमेंट ची जंगले वाढली.
माणसे वाढली तश्या गरज वाढली असे जरी असले तरी पर्यावरणाचा प्रश्न मोठा आ वासुन उभा राहिला. मानव निर्मित कचरा सांडपाणी ह्याची विल्हेवाट लावणे मुश्किल झाले. याचा विसर्ग सरळ थेट ओढा नाले नदीत केला गेला परिणामी जल प्रदूषण वाढले, हे एवढे कमी म्हणून काय इंडस्ट्री तील रासायनिक सांडपाणी पण थेट नदीला च सोडले.
वायु प्रदूषणामुळे तर निसर्गाची वाताहत च झाली प्रत्येकाला गाडी प्रत्येक घरी फ्रीज / एअर कंडिशन त्यातुन निर्माण होणारा कारबन टेट्रा floride गाड्यांच्या धुरातून निर्माण होणार कारबनमोनो ऑक्सिडं भरीस भर म्हणून प्रगतीच्या वाटेवरील कारखाने त्यातूनच निर्माण होणारा विषारी घातक धूर हवामानाचा निस्टलेला तोल त्याचा परिणाम म्हणून ओझोन चे थर फाटणे अल्ट्रा violet चे किरण प्रखरता वाढणे, त्याचा सागरी परिणाम हिमनद्या चे विलयन कारबन हा उष्णता शोषक म्हणुन पृथ्वी चे वाढते. तपमान अश्या कितीतरी गोष्टी ह्या मानव निर्मित प्रगती चे कारण आहेत प्लास्टिक कचरा तर डोकेदुखी चा विषय त्याबद्दल न सांगितलं तर बरं!
महत्वाचे घटक म्हणजे कृषीविषयक कमी होणारी जमीन ही आज नापिकीमुळे पडीत आहे ज्याला त्याला कमी खर्चात ज्यास्त उत्पादन पाहिजे आहे. प्रत्येक पिकावर भरमसाठ मारण्यात येणारी औषधे परिणामी हीच औषधे आज आपल्या पोटात आहेत जनावरांच्या पण पोटात आहेत.
जल / वायु / भुमी ह्या तिन्ही प्रदूषणांनी इतकी व्याप्ती वाढवली आहे की त्यापासुन निर्माण होणारे आजार सुद्धा कष्ट साध्य आहेत काही अ
साध्य ही आहेत.
मानव निर्मित प्रगती ही किती आरोग्य घातक आहे याची उत्तरे रोज बघण्यास मिळतात.
नवीन विषाणू निर्मिती स पोषकता आपण निर्माण करीत आहोत याची जाणीव युनो ला सुध्दा माहीत असून त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे
पूर्वी कुठे होत हो डेंग्यू / चिकन गुनिया / निपाह / कोरोना इत्यादी virus अश्याच प्रकारचे कितीतरी virus रोग भूतलावर आहेत च !!
फक्त पूर्वीच्या लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती ज्यास्त व उपजत होतीच.. पण आज साध्या सर्दी पडसे अलेतरी सहन करण्याची किंबहुना त्याला प्रतिकार करण्याची ताकद ही मनुष्य प्राण्यां कडे राहिली नाही..याचाच अर्थ येणारी पिढी ही कमकुवत निपजत आहे याचाच अर्थ त्याच्या जनुकीय पेशीमध्ये बदल होत आहे.
भरमसाट वापरात येणारी प्रति जैविके ( अँटीबीओटीक ) ही आता निष्काम ठरू लागले आहेत.
कारण बॅक्टेरिया व व्हायरस च्या सुद्धा जनुकीय संरचनेत बदल झाले आहेत कित्येक डॉक्टर हतबल झाले आहेत निदान न करता येणारे रोग बळावत चालले आहे.
कधी शिकणार आहेत मानव हे जरी मानव निर्मित असले तरी पृथ्वी चा ऱ्हास थांबवा असं सांगावे लागत आहे.
विविध प्रकारची धूर सोडणारी अस्त्रे त्यांची निर्मिती ही शांतता सुबत्ता निर्माण करतीलच असे नाही अजुनी वेळ गेली नाही माणसा उठ जागा हो परत एकदा होते तसे गाव वाड्या वस्ती बनव निसर्गाच्या सानिध्यात रहा .
निसर्गाचा घटक बना पूर्वीसारखी च जीवन शैली वापरा आपल्या येणाऱ्या पिढीचा उद्धार करा.
पाणी तर विकत घ्यावे लागत आहे तसेच काही दिवसांनी शुद्ध ऑक्सिजन सुद्धा विकत घेण्याची वेळ येऊ देऊ नकोस.
सुंदर विश्व तुझे रे देवा
तुच चराचर सृष्टि
सर्व काही तुझ्याच हाती
कर सुखाची वृष्टी
विविध रंग अन विविध पक्षी
नदी नाल्यांची सुंदर नक्षी
नरनारी पण होता साक्षी
तुझ्याच हाती असे कुंचला
कर रंगाची वृष्टी
तुच माय तुच बाप
तूच निर्मिला मानव साप
नवनिर्मिती चा आणून आव
तुझ्या सृष्टि वर पडता घाव
उष्मांक वाढीची वक्र दृष्टी
तुझ्याच हाती अमृतधारा
कर पुष्पची वृष्टी
निलकीरण हे अति वाढले
ओझोनचे ही थर फाटले
रत्नाकरचे अतिक्रमण वाढले
स्वार्थाच्या ह्या भोगासाठी
मानवाची तुष्टी
सर्व काही तुझ्याच हाती
कर मेघाची वृष्टी