Gangadhar joshi

Others

0  

Gangadhar joshi

Others

आत्महत्या

आत्महत्या

2 mins
380


बळीराजा


जन्म घेणे म्हणजे प्रथम श्वास...

मृत्यु म्हणजे शेवटचा श्वास... या दोन्ही श्वासातील जे अंतर आहे, त्यालाच आपण जीवन जगणे म्हणतो...


आपण पहिला व शेवटचा श्वास कुठे / केव्हा / कुणाच्या दारात घ्यायचा हे आमच्या हातात नाही.

नियती ठरवेल त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी घडतात.


कुठल्या जातीत कुठल्या वस्तीत कुठल्या गावात कुठल्या घरात स्त्री की पुरुष या सर्व गोष्टी विचारांच्या पलीकडचे किंबहूना दैवाधीन आहेत. काहीजण यालाच प्रारब्ध म्हणतात.


नियती व प्रारब्ध या दोन्ही वेगळ्या आहेत नियती म्हणजे हे असंच होणार.


प्रारब्ध म्हणजे पूर्व जन्म संचिता नुसार बरे / वाईट होणार, हा झाला अध्यात्म सिद्धांत.


मृत्यु हा नैसर्गिकरित्या / अपघाताने / आजारीपणामुळे / आत्महत्येमुळे / वृद्धत्वाने येणारे मरण हे नैसर्गिकच,

वृद्धत्वात येणारे आजार हे नैसर्गिकच, मग अपघातात मरणे हे जरा विचित्रच...


आत्महत्या करणे हे मग आत्मक्लेशदायक मरण...


आत्महत्या का होतात? याला अनेक गोष्टींची कारणे असतात. त्या सर्व गोष्टींचा विचार केला की असे दिसून येत की, मनुष्याला सर्व काही सहन करता येते पण अब्रु स्वत्वावर घाला येत असेल व मनाने कच दिलं असेल 

किंवा मनाने सेन्सिटिव्ह असेल तर हे प्रमाण जास्त दिसुन येते.


बळीराजा अलीकडे आत्महत्याग्रस्त होत आहे. त्याची आकडेवारी पाहता हात डोक्यावर मारून घ्यावा असे वाटेल. का बरे अस करत असेल?

नियतीने त्याच्यापुढे हेच लिहुन ठेवले आहे का!


सततची नापिकी त्यामुळे कर्ज, लहरी हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशी कारणे, शिवाय घरची परिस्थिती, अल्प भूधारक असणे, अज्ञान, इतर मिळकत नसणे, जोडधंदा नसणे, स्वभाव, सावकारी ऋण, त्याचे किंवा बँकेचे चक्रवाढ व्याज, घरी लग्नाच्या मुली असणे, लग्नात अनावश्यक खर्च करणे क्रमप्राप्त होते, खाणारी तोंडे जास्त, राबणारे हात कमी इत्यादी.


सरकारी मदत ही नेहमीच तुटपुंजी असणे, अशा सर्व कारणांनी तो गांजला जातो व नको ते व्यसन लागते. दारूच्या आहारी जाणे, नशा करणे या गोष्टी परिस्थितीने तयार होत असतात.


ज्ञानशक्ती इच्छाशक्ती कमजोर होते, मनातून तो खचतो. त्याला फक्त दोरखंड व झाड दिसू लागते.

काहीवेळा आप्तस्वकियातून घृणास्पद वागणूक किंवा अपमानपण सहन करावे लागतात. समाज त्याला जवळ घेत नाही. त्याला एकप्रकारे वाळीत टाकतात किंवा मुद्दाम दुर्लक्ष करतात. अशावेळी जिवाभावाची माणसं जवळ असली तर त्याला स्फुर्ती देऊन जगण्याचं बळ वाढवतात.

पण अशी माणसं समाज मन नाही मिळाले तर तो परत न्यूनगंड जास्त वाढतो व आत्महत्या करावी वाटते.


म्हणजेच सामाजिक / कौटुंबिक / आर्थिक / परिस्थिती

ऋणको या व मानसिक खच्चीकरण या सगळ्या गोष्टी जबाबदार ठरतात.

मृत्य हा कसाही आला तरी समाजाचे म्हणणे एकच असते, त्याचं तेवढंच आयुष्य होतं, असे

लुळे-पांगळे उत्तर तयार असतेच.


हा विषय गहन व वैचारिकच आहे. सामाजिक / आर्थिक विषमता ज्यावेळी कमी होईल,

त्यावेळीसच बळीराजा सुखी होईल.


Rate this content
Log in