सृजन
सृजन
आपण कुठे आहात ?
मी कुठं बर असेन
जळी स्थळी काष्टी पाषाणी जीथे
सृजनतेचा उसत्व आहे त्या त्या ठिकाणी म्हणजेच हिरव्या गार पानात रंगी बेरंगी फुलात विविध वृक्ष्यात विविध पानात विविध फुलात फुलातील मधुकोशात भ्रमराच्या गुंजारवात विविध पक्ष्यांच्या मधुर सुरात त्यांच्या पंखात विविध रंगी पक्ष्यांच्या चोचीत पिकलेल्या मधुर आंबट रसात सृष्टीने पांघरलेल्या विविध शालूत उंच अश्या सह्याद्री गिरी रांगेत तिथुन पाझरणाऱ्या स्वछ्य निर्मळ शीतल झऱ्यात वाहणाऱ्या उगमस्थान असलेल्या नदीतून कधी नागमोडी कधी षोडश अवखळ कधी जलप्रपात तर कधी धीर गम्भीर संथ प्रवाहात सृजनतेच आरास घेऊन शेवटी महा जलसा समर्पित होतो त्या पयोनिधीं स जेथे सुरवात होते तिथेच परत मिलन अव्याहत चक्र हे श्रीकृष्णाने दिलेल्या सुदर्शन चक्रा सारखेच तर आहे एकदा सोडलेले चक्र काम तमाम करून शेवटी परत बोटात च तर विसावते.
मी कुठे नाही बाल तारुण्य वार्धक्य यात निरागसता अवखळ पणा नन्तर वैराग्य घेऊन च श्रुष्टी चक्राच्या नियमात असतो
बाल्या वस्था ची निरागस वेल यौवनात अधीरता आतुरता अपुऱ्या गोष्टींचा शेवट लावण्यात आततायी पण जलप्रपातासारखे वरून खाली येण्याची धडपड
धुंद करणारी मस्ती फुंद करणार वय एखाद्या अभिसरीके ला दिलेला शब्द वचन
आकर्षित करणारे निसर्ग सौंदर्य
हवा वाटणारा प्रेम स्पर्श आकर्षित करणारा अमूल्य ठेवा
दिव्या वर घातलेले पतंगाची झडप.. अंत काय होईल याची पर्वा न करणारी अवस्था
मी कुठे नाही सगळीकडे तर आहे
बाळाच्या रांगण्यात त्याच्या बोबड्या बोलात यौवनात पदार्पण केलेल्या षोडश कन्येत तिच्या लाजण्यात मुरडण्यात आरसा बघुन मनोमनी हसण्यात
अभिसरीका ते नवं दाम्पत्यात तिच्या गोल गोबर्या गालावर पडणाऱ्या खळी त सुखद नेत्र स्पर्श होताच, गालावर चढणाऱ्या ललिमेत आतुरतेनं वाट पाहणाऱ्या तिच्या नजरेत एक प्राणांतिक ओढ असणाऱ्या तिच्या अतुरतेत साज शृंगार केलेल्या नवोढ येत साखरपुडा ठरलेल्या नवं कल्याणीत
कुठे नाही मी!
दक्खनच्या गिरी रांगेत तिथे असणाऱ्या बेलाग किल्ल्यावर किल्ल्याच्या तट बंदीत बुरुजावर असलेल्या तोफेत दारू गोळेत चमचमणार्या तलवारीच्या पातीत
डौलाने फडकणार्या केशरी भगव्या जरिपटक्यात फुरफुरणारे हात मर्दमुकी गाजवु पाहणारे मन
शिवरायांच्या पाय खालच्या मातीत खलबत खान्यात होणारी
खलबत रांगड्या मराठ मोळी भाषेत स्वराज्याच्या गुर्मीत कुठे नाही मी
म्हातारा झालो म्हणून काय झाले
खल बत्यात कुटल्या जाणारे नागवेली च पान सुपारी... त्यातून येणारा दरवळ रंगलेला पान कुठंतरी पिंपळ कट्या वर बसून केलेल्या गप्पा पान तम्बाकुची देवाण घेवाण गावातील हाल हवाल चर्चा
अश्या कित्येक गोष्टी न सांगितलेल्या त्यामध्ये माझं अस्तित्व आहेच की
मग तुम्ही कुठे असता / आहात
हे मी कसा सांगणार तुम्हीच मोठं मन करून जाणून घ्यावे त्यात मी काय नवीन सांगणार
सृजनात्मक श्रुष्टी नियमांना धरूनच मी कुठेतरी असणारच हे त्रिवार सत्य
तुर्त मी अपली रजा घेतो परत भेटूच