Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

संशय...!

संशय...!

1 min
29


तीन जानेवारी 2024...!

संशय...!

विश्वास ही एक अशी भावना आहे की जी जीवनास स्थिरतेची जाणीव करून देते आणि सदैव आनंदी आनंद नांदवते. पण कधी कधी एखाद्या गोष्टीचा संशय येतो,आपला विश्वासघात होतो आणि खाडकन डोळे उघडतात.आपला संशय खरा ठरतो,विश्वासघाताची खात्री पटते आणि त्याच क्षणी मन हलके होते आणि संशयव्याधी कायमची नष्ट होते.अशी आपमतलबी वृत्ती ,स्वार्थ आणि नतद्रष्ट भावनेची प्रचिती जीवनात अनुभवण्यास मिळता संशयरोग मुळासकट नाहीसा होतो.डोळे उघडतात आणि नवजीवन पुन्हा बहरते,फुलते,उल्हासित होते,पुलकित होते,समृद्ध होते आणि सुखमय होते.पुन्हा या विश्वासाच्या विषाची परीक्षा घेण्याचे धाडस होत नाही.कायमचा संशय भुतास राम राम ठोकला जातो.ताक सुद्धा फुंकून पिण्याची सवय जडते .जेंव्हा फक्त आणि फक्त आप्त मानलेल्यांच्या गरम दुधाची ही कठोर शिक्षा तोंड पोळते तेंव्हा जन्माचे कधीही न मिटणारे घाव अंतकरणावर कोरून ठेवते.

म्हणून संशयात गुरफटून ,गुदमरून नित्त्य मरणांत यातना साहण्या पेक्षा खात्री करून घेणे आणि संशय विषरोग समूळ नष्ट करणेच योग्य नाही का ?

संशय...!

संशयाचे भूत 

बसे मानगुटीवर

करे मात चिरंतन

निःसंशय नित्य औषधावर....

न चाले गंडा दोरा

न चाले उपास तपास

सारे प्रयत्न होतात विफल

किती केले जरी प्रयास...

सत्याची प्रचिती घेणे

हे अनुभवाचे बोल

येतो बाहेर संशय

मुळासकट असला जरी किती खोल...

मग तद्नंतर

सत्यची जीवन

नष्टता संशय पुलकित होतात गात्र

पसरता आनंदी आनंद सर्वत्र....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action