STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

2  

Prashant Shinde

Action Inspirational

जय श्री राम

जय श्री राम

1 min
9

बावीस जानेवारी 2024...!

चिंतन...(१२८)

आज आयोध्या नगरीत राम मंदिरात रामाच्या भव्य एक्कावन्न इंच उंचीच्या राम मूर्तीचा प्राणप्रतिष्टा सोहळा पार पडला आणि मंदिर सर्व समान्यांसाठी दर्शनासाठी मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.दिवस खूप उर्जावान असा पार पडला.

सर्वत्र राम राम ,तन मन भारावून गेले.संध्याकाळी जेंव्हा

सूर्य नारायणाचे अस्तचलास जाताना दर्शन घेतले तेंव्हा नकळत अगदी प्रफुल्लित मनाने नजरेस नजर मिळवून म्हणाला

"आता भारतात राम आहे...!"चटकन माझे डोळे चमकले आणि त्याच्या छोट्याशा वाक्यांनी छाती फुलून आली..सर्व सर्व आठवणींना क्षणात उजाळा मिळाला.शालेय जीवनात बऱ्याच वेळेला गुरुजी वरचेवर म्हणायचे,तुझ्यात काही राम नाही.

तुझ्यात काही राम आहे की नाही.?आज मात्र राम असणे म्हणजे काय हे अनुभूतीने जाणवले. सदैव राम तना ,मनात, अंतरात,जळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र भरून राहो हीच प्रभु चरणी विनम्र प्रार्थना...!

अरे सूर्य नारायणा

राम आमच्यात आहे

हे तुही याची देही ,याची डोळा

आज राम मंदिरी पाहिले आहे...

नसा नसात राम आमच्या

सर्वांगात आता भिनला आहे

रामच्याच वास्तव्याने देवा आमचा

जन्म सार्थकी लागून कृथार्थ झाला आहे...

राम चरणी नतमस्तक होऊन

धन्य धन्य वाटते आहे

अस्तास जाताना वंदन करता तुला

जीव माझा खरोखरच सुखावतो आहे...!

जय श्री राम,जय जय श्री राम...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action