Prashant Shinde

Action Inspirational

2  

Prashant Shinde

Action Inspirational

अमीन सयानी...!

अमीन सयानी...!

1 min
20


वीस फेब्रुवारी 2024...!

अमीन सयानी यांचे निधन झाल्याची बातमी समजली आणि एक गोड,सुमधुर,नेटका,प्रेमळ,लाघवी आणि तितकाच मनमोहक असा "बेहनो और भाईयो" या वाक्याची सुमधुर तान हृदयस्थ गाभऱ्यातून कानावाटे मनास सुखावून हळूच लीलया निघून पंचत्वात विलीन झाली.कौतुक करावे किती असा आवाज,सुरेख सुंदर शब्द फेक सार कस विलक्षणीय आणि अद्भुत.अजूनही बिनका गितमाला आपल्या स्मरणातील गाण्यांसह यांच्या आवाजाच्या जादुई विणीतून कधीच उसवता येणे शक्य नाही.गाण्यांमुळे निवेदनास म्हणण्या ऐवजी निवेदनामुळे प्रत्येक गण्यास एक उंची लाभायची आणि गाणी सदैव मनात ठाण मांडून रहायची.खरे सांगायचे तर एक मनस्वी व्यक्तिमत्व हरपले इतके मात्र नक्की.ज्या ज्या कानांनी त्यांचा आवाज ऐकला तो तो त्यांचाच होऊन गेला.आपल्याच घरातील व्यक्ती जाणे म्हणजे काय हे प्रकर्षाने जाणवले.त्यांना ईश्वर चरणी चिरशांती लाभो हीच प्रार्थना...!

अमीन सयानी...!

बुधवारची ती बिनका गितमाला

जशीच्या तशी स्मरणात आहे

त्या सुमधुर गोड आवाजाची जादू

आजही तशीच शाबूत आहे...

बेहनो और भाईओ,पहिली पायदानपर ऐकताच

मागून फर्माईश ,सुरतसे रामलाल नाहीतर

चाचा चाची और मामा के साथ

आजमगडसे शामलाल यायचे वरचेवर...

अगली पायदान म्हणत म्हणत

हा हा म्हणता बिनका गितमाला संपायची

आणि त्या काळातील कंदिलाच्या प्रकाशात

रेडिओ बंद करून स्वप्नांकीत दुनियेची झोप यायची...

आज तो आवाज साऱ्या आसमंतात वीरला

आवाजाच्या शेहूनशहाचा जणू काळ सरला

जाता जाता त्याने अंतर्मनास चटका लावला

तसा प्रेमापोटी एक दुःखद आवंढा गिळला...

अमीन सयानी यांचे चरणी भावपूर्ण श्रद्धांजली...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action