चांगली वेळ...!
चांगली वेळ...!
चांगली वेळ...!
चांगली वेळ ,वाईट वेळ खरे पाहता असे काही जीवनात असत नाही असे बरेच जण ज्यांची खरोखरच चांगली वेळ असते ते म्हणत असतात.पण ज्यांची वाईट वेळ असते ते मात्र चांगल्या वाईट वेळेचा विचार करताना निश्चित पणे दिसतात.होत काय की एखादा दगड लागला की वीट सुद्धा दगड वाटते आणि आत्मविश्वास जरा डगमगतो आणि आपण चांगल्या वाईटाचा विचार करू लागतो.आणि हा निव्वळ मनाचा खेळ असतो इतके मात्र नक्की.कित्येक वेळेला प्रयत्न भरपूर म्हणजे अगदी अतोनात होतात पण त्याचा परिणाम मात्र हवा तसा लाभत नाही तेंव्हा थोडे खटकते आणि वाटते वेळ खराब.पण प्रयत्नच खराब असतील तर वेळेला दोष देण्यात काय अर्थ असेही होऊ शकते किंव्हा बऱ्याचदा असेच होते .असो पण इतके मात्र नक्की वेळ ही चांगलीच असते म्हणून मनासी गाठ पक्की बांधली की सगळे प्रश्न सुटतात आणि चांगली वेळ सदैव जीवनात गुण्यागोविंदाने नांदते.म्हणून आत्ता ,या क्षणा पासून चांगली वेळ सदैव आपल्या
जीवनात नित्य,निरंतन,चिरंतन प्रत्येक क्षणी आहे याची खात्री संकल्पित आपल्या मनात,हृदयात,अंतरात घट्ट करून पाऊल पुढे टाकावे हे चांगले. म्हणतात ना,हीच ती वेळ,हाच तो क्षण म्हणावे आणि सर्वच्या सर्व कार्याची मुहूर्त मेढ अंतरात घट्ट रोवून जीवनाची सुरुवात श्री गणेशा मोठ्या उत्साहात ,आनंदात म्हणून करावी...!
श्री गणेशा...!
चांगल्या वाईट वेळेचे विचार सारे
दूर दूर निघून गेले
स्थिर बुद्धीचे बीजारोपण पुन्हा एकदा
अंतरी माझ्या झाले....!
हीच वेळ,हाच क्षण म्हणता
अवसान भरते उरी मण मण
सज्ज झाले पुन्हा एकदा
कार्यालागीं माझे तन...!
उत्साह चैतन्य शिगोशिग
भरले आहे हृदयी अमाप
बसेल सहजी आता
वाईट वेळेस माझ्या चांगल्या वेळेचा चाप...!
आज पासुनी, आत्ता पासुनी
चांगली वेळ झाली सुरू
संकटांनाही वाटते आता
चांगलेच पुरून उरु....!
