Prashant Shinde

Classics Others

3  

Prashant Shinde

Classics Others

पुसट..!

पुसट..!

1 min
13


आठ फेब्रुवारी 2024...!

चिंतन...(१30)


कलत्या सूर्यनारायणाला पाहिले,डोळे दिपले पण संध्याकाळ समीप आलेली म्हणून छबी टिपली.पाहिले तर देवाने तर पुसट अशी पोज दिलेली.तसे मनावर घेतले नाही आणि घर गाठले.पण पुसट हा शब्द काही पाठ सोडेना.म्हणून हा शब्द प्रपंच.पुसटशी कल्पना नव्हती,पुसटशी कल्पना द्यायला हवी होती,पुसटशीही कल्पना आली नाही, पुसटसा अंदाज आला होता,पुसटसा अंदाज होता वगैरे अनेक तर्क वीतर्क मनात येऊन गेले.म्हंटले इतके काय त्यात hint म्हणायचे. पण खरं सांगू आपली मराठीच ग्रेट.आगदी थेट अर्थासह काळजाला भिडते.

अर्थपूर्ण समर्पकता हे आपल्या मराठी शब्दांचे सामर्थ्य आणि ही आपल्या मराठीची अस्मिता आणि ताकत. असो

आज पुसटसा तो अवतरला

आन मनाचा अंतरंग घेरला

षटकार जणू त्याने मारला

हृदयात वेगळाच अवतार कोरला...

नसेल म्हंटले तुला द्यायचे

प्रसन्न लोभस दर्शन

तरीही मी करतोच ना रे

अखंड तुला पाहण्याचे वर्तन...

कधी नजरेआड तू

कधी सामोरा लालबुंद तू

कधी क्षितीजात विलीन तू

कधी कधी पुसट तू...

सारे कसे अतर्क्य अन अगम्य

कधी कधी तर अति सौम्य

पण त्यातही लीला नित्य सुरेख

आवडते मज एकन एक....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics