Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

चिंतन...(१४१)

चिंतन...(१४१)

2 mins
7


सव्वीस एप्रिल 2024...!

चिंतन...(१४१)

If you don't fight for what you want,Then don't cry for what you lost...!

बघा काय म्हणतात..वा वा वा...यांना अक्कलचे तारे तोडायला

काय जाते..?ज्यांनी ज्यांनी अपयश पचवले, ज्यांनी ज्यांनी अपयशाची पराकाष्ठा अनुभवली त्यांनाच खरी कल काय ते कळते हे नक्की.अरे बाबांनो मी म्हणतो,ज्यांच्य राशीला, पाचवीला जर गुरुबळाची बोंबाबोंब असेल,ज्यांच्या राशीत जर सर्व पापग्रह ठाण मांडून बसले असतील तर तो एकटा काय डोंबल प्रयत्न करणार...?राहू केतू नित्य पहाऱ्यावर,शनी जन्म तनु स्थानी,मंगळ ,बुध,नेपच्यून सारे सारे वक्री, शुक्र तर कोसो दूर आणि गुरुच काही विचारायलाच नको..तो तर प्रत्येक कर्मात शत्रू स्थानी म्हणजे अख्खी कुंडलीत कुंडली मारून उरावर बसलेली. त्यात भरीस भर म्हणजे पितृ मातृ स्थान भ्रमित अगदी सहज शत्रू पक्षात युती करून डाव धरून असल्या सारखे.सांगायचा मुद्दा हा की तोंड दाबून मुक्क्याचा मार ज्याच्या भाळी नियतीने मद्दाम प्राक्तन म्हणून खूप खूप खोल खोल गोंदवला असेल ती निष्प्रभ तर असतोच आणि हतबल तर होतोच..!यातून सुटण्याचा एकच मार्ग ठेविले अनंते तैसेचि रहावे..चित्ती असु द्यावे समाधान.."हळू हळू एक एक पाप ग्रह क्षीण होतो आणि गाडी रुळावर येते... तोवर सर्व स्वप्न वृथा असतात याची खात्री पटते, जन्म सार्थकी लागतो.जे होत होते ते चांगलेच होत होते हे पटते.. आणि आपण किती नशीबवान आहोत याची खात्री पटते. बावन्न कशी सोन्याला झळाळी येते, सारे शत्रू पक्ष, मित्र पक्षात सामील होतात आणि उर्वरित दिवस सुखाचे जातात...!यालाच तर जीवन म्हणतात.त्रास देणारे कर्म फळ भोगतात आणि सॉरी सॉरी म्हणून हात जोडतात.आणि हेच सत्य आहे याची खात्री पटते. म्हणून म्हणावे वाटते अनुभवाअंती.....

नको करू तू तमा अपयशाची

हीच खात्री देते उज्वल यशाची

जे जे होते, ते ते सारे चांगलेच असते

त्यातच उद्याचे स्वप्न साकारत असते....

दिसते तसे नसते

हे काही खोटे नाही

अपयशा नंतर बाबा

यश आल्यावाचून रहात नाही...

यशाची नको इतकी काळजी करू

उगाच उराशी भय नको धरू

अपयशाच्या डोक्यावर कष्टाची लाठी मारी

यशास आपल्या मग मुठीत घट्ट धरू....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action