चिंतन.. अवलोकन..!
चिंतन.. अवलोकन..!
अठरा जुलै 2024....!
चिंतन...(१८६)
अवलोकन...!
अवलोकन किती सुंदर शब्द.या शब्दात सर्व सामावते आणि याची व्याप्ती वाढवावी तितकी वाढते.ही व्याप्ती आपापल्या कुवती नुसार सीमित होत असते असे माझे तरी मत आहे.असो.काल आषाढी एकादशी पार पडली.आणि त्याचा परिपोष कोठेतरी मनात साचला.दिवस उपवास आणि भक्ती युक्त वातावरणाने भारून जायला हवा होता व तसे झाले नाही.कदाचित थोड्या थोडक्या का असेना पण बऱ्याच जणांना असा अनुभव किंव्हा जाणीव झाली असेल. कदाचित गच्च गच्च वाटणे,कसेसेच होणे किंव्हा शून्यता भासणे वगैरे वगैरे किंव्हा अलिप्त अलिप्त वाटणे असेही वाटले असेल.हा कदाचित वातावरणाचा परिणाम असेल किंव्हा मानसिकतेचाही असेल.अशावेळी मग प्रसन्नता गेली कुठे ?हा प्रश्न उत्तर रात्री डोकावला आणि क्षणात मन भुर्रकन उडून मागोवा घेण्यास उंच ऊंच अवकाशात झेपावले. आणि मी जे पाहिले अनुभवले ते शब्दात कसे मांडावे असा प्रश्न पुन्हा अंतरात निर्माण झाला.तेंव्हा मात्र माय माऊली पांडुरंगाची आठवण झाली आणि म्हंटले....
अवलोकन..!
अरे पांडुरंगा।का अवलोकन।
गेलो मी थकून।जन्म घेता।।
तुझ्या लीला माप।कसा मी साठवू।
केंव्हा मी आठवू।सांग मला।।
भक्त तुझ्या दारी।असंख्यात आले।
चित्त माझे गेले।वैखुंठास।।
वाटे असशील ।गेला तू पळून।
गर्दी ही पाहून।वैतागून।।
कोणा कोणा पाहू।प्रश्न अनुत्तरित।
तुझ्या अंतरात।योवोनिया।।
मूर्ती स्तब्ध उभी।करून मंदिरी।
पळाला तू घरी।असशील।।
शंका या मनाची।नाही फोल देवा।
करुदेत हेवा।भक्तगण।।
जाणले मी पण।तू रे निर्विकार।
तूला ना आधार।कोणताही।।
तूच एक देव।सर्वांचा आधार।
नाही रे माघार।पांडुरंगा।
सांग खरे आता।येतो ना भेटाया।
छोट्या घरी माझ्या।आपसूक।।
हीच तुझी प्रीती।भावते मनास।
अंकुर मनास।फुटता रे।।
पाहुनी तुजला।झाले समाधान।
हे अवलोकन।अलौकिक।।
धन्य धन्य विठू।बोले मिठू मिठू।
म्हणे म्हण विठू।पुन्हा पुन्हा।।
