Deepa Vankudre

Abstract

2  

Deepa Vankudre

Abstract

सन्मान कोणाचा?

सन्मान कोणाचा?

2 mins
95


 टी.वी., वर्तमानपत्र, नियतकालिक, जिथे म्हणून वाचनीय किंवा दृश्यमान स्त्रोत आहे, तिथे त्रितियांश बातमीत, कार्यक्रमात सन्मान होत असतो. असंख्य समिती, समूह, वर्ग, त्यांत कुणाचा बहुमान, पारितोषक वितरण... चालूच असतं. मला आठवतं मी शाळेत असताना आजच्या इतक्या संख्येने चॅनल सुरू नव्हते झाले. हाॅलिवूडचा ऑस्कर, बाॅलीवूडचा फिल्मफेअर आणि खूपच मोठा पुरस्कार म्हणजे नोबेल पारितोषिक. स्वदेशी सव्वीस जानेवारी रोजी देण्यात येणारे प्रमाणपत्र, ई.ई. माझं सन्मानाचं ज्ञान इथेच संपायचं. 

पण आता सन्मान घेण्या-यांची संख्या वाढते आहे, कारण देणा-यांची वाढते आहे. कदाचित, असा निष्कर्ष (दुर्दैवाने) निघतो. पैसे देऊन पुरस्कार घेतात, हे ही बोकाळल्याचं ऐकिवात आहे. 


बस ड्रायव्हर, कंडक्टर, मोटरमन, रेल्वे रुळावरचे कामगार, वेठबिगार, नर्स, वाॅर्डबाॅय, प्रत्येक कार्यक्षेत्रात असे हि-यांचे कण आहेत. पण पैलू पाडताना पडलेल्या हि-याच्या कणांना मुल्य नसते म्हणतात!


सन्मानाचे मोजमाप कसे होते? मुळातच ही मिमांसा का? 'आम्ही करतो ना सन्मान, कर्तबगार गृहिणींचा, सेवेकरींचा! वा! असं कसं?' बरोबर.मग, एखादा अश्राप बळी गेला की तिच्या किंवा त्याच्या नावाने मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वहायची आणि सन्मान करायचा... विषय संपला!


पण, 'सन्मान कुणाचा, का व कसा करायचा?' हा प्रश्न उरतोच! हार तूरे देऊन? मेडल देऊन? दोन शब्द गोड बोलून? सन्मान मनातून, हृदयातून यायला हवा आणि तो हृदयापर्यंत भिडायला हवा!


माझ्या गत ऑफिसमध्ये कंपनीच्या प्रेसिडेंट चे दर्शन वर्षातून एकदा होई. सारे ऑफिस त्यांना मान देण्यासाठी आदराने उभे राही. चिडीचूप शांतता राखली जाई. ते ही फेरी मारताना मध्येच थांबून एखाद्याशी चौकशी करत. कधीच कोणाला ते पोकळ वाटले नाही. त्या उलट सद्य कंपनीचे मालक आले की शांतता असते पण आदरापेक्षा भीतीने! असा जबरदस्तीचा सन्मान द्यायचा कसा आणि घेणा-यालाही काय हाशील? 


कोमल फुलाला एखाद्याच्या पुष्पगुच्छात त्याच्या सन्मानासाठी ओवून, तो गुच्छ दोन मिनिट ही त्याच्या हाती न टिकता कुठेतरी कोप-यात पडणार, त्याऐवजी त्या फुलाला परमेश्वरच्या हारात गोवण्याने, पायाशी वाहण्याने त्याचा सन्मान नाही का होणार?

एखाद्या कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र काम करवून पैसे देताना शंभर कारणं देण्याऐवजी त्याच्या कष्टाचं चीज होईल असं केलं तर त्याच्या मेहनतीचा सन्मान नाही का होणार? शीलावर घाव घालण्या आधीच ते शील जपण्यासाठी वाकड्या दृष्टीने न पहाणं हा त्या शीलाचा सन्मान नाही का होणार?


शेवटी "सन्माचा कोणाचा?" या प्रश्नाचे उत्तर त्याच्या "मान( दे)ण्यावर आधारित, असतं का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract