पुस्तक
पुस्तक


'वाचाल तर वाचाल' हे अजिबात माहित नसल्यापासून, म्हणजे मी पहिलीत असल्यापासून वाचायला आवडतं. मातामह, पितामह दोघांचा साहित्याशी संबंध, आणि त्यांच्या कडून आलेला वारसा... कदाचित त्यामुळे असेल!
'चंपक' हे मासिक आईने मला पहिलीत आणून दिलेलं. माझं इंग्रजी माध्यम. मराठी भाषा विषय पहिलीत नव्हता. आईने वर्ण माला शिकवली. चंपक उघडून चित्राखाली ओळखीचे अक्षर दिसले की मोठ्याने ओरडून मी 'वा-च-त' असे. काना, मात्रा काही नाही. हा एकलव्याचा उद्योग पाहून आईने ते ही शिकवले.
वाचनातून लिहायची आवड उगवली. मी पाचवीत सहज 'उंदरांची सभा' कविता लिहिली. आईने ती चंपक ला पाठवली. गंमत म्हणजे ती छापून आली. ही प्रेरणा घेऊन लिहियचा छंद जोपासला.
पण वाचनासारखं दुसरं सुख नाही. लाईट गेले, डेटा संपला की मोबाईल, कंप्युटर ऑफ होतो, पण पुस्तक ऑफ होत नाही.
शाळेत असताना काॅमिक्स, काॅलेज मध्ये पु.ल., द.मा., शन्ना, पुढे आजोबांचा जुना संग्रह- गाय द मोपासा, ऑस्कर वाईल्ड, लियो टाॅल्सटाॅय, शेक्सपिअर, आजोबांनी लिहिलेली नाटके....नामावळ मोठी आहे...
अजून बरंच वाचायचंय...