STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

लहानग्यांचे खेळ

लहानग्यांचे खेळ

1 min
321

पुन्हा समोरासमोर गॅलरीत बसून लहानग्यांचे खेळ सुरू झाले आहेत. त्या दोघी 'घर-घर' खेळत होत्या. वय वर्ष सहा, आई बनली होती व वय वर्ष सात तिची मुलगी. सहा वर्षांची छोटी आई मुलीला म्हणाली, "बेटी, ये पैसे भी लेके जाना और मंदिर में दान करके आना!", दुसरीने लगेच, "अच्छा, माँ, आती हूँ!" असे उत्तर दिले. इतक्या छोट्या मुलांच्या तोंडून दान करणे वगैरे ऐकून मला खूप कौतुक वाटले!

 

मुलांना लहान वयापासून प्रणालीत करणे गरजेचे आहे असे नेहमीच म्हटले जाते आणि होते ही. पण वय वाढत जातं तसं, बरेच वेळा हे चित्र बदललेलं दिसतं..?


Rate this content
Log in