प्रजासत्ताक
प्रजासत्ताक
1 min
183
शाळा, काॅलेज मध्ये असताना टी.व्ही. वर सकाळी प्रजासत्ताक दिनाची परेड बघण्यासाठी तयार होऊन बसत असू, अगदी काल ही. कडाक्याची थंडी तरी लाखो लोक उत्साहाने गर्दी करून जमलेले पहाताना, तिथे प्रत्यक्षात नसताना तो जोश अनुभवला जायचा. कालची परेड बघताना त्या रिकाम्या जागा पाहून मनात ही रिकाम्या जागा जाणवल्या.
तरी अशा प्रसंगांत ही ती अनोख्या वातावरणातील परेड पाहून हृदयात व डोळ्यात वंदनीय भाव तरळत होते!
