" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Action Inspirational

3.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Action Inspirational

संकल्प नववर्षाचा..

संकल्प नववर्षाचा..

2 mins
224


नवीन वर्षाच्या निमित्ताने,मित्र या नात्याने शुभेच्छा देण्यासाठी एका मित्राच्या घरी गेलो... कळलं की तो घरी नाही..शोध घेतल्यावर समजलं की तो दारुच्या दुकानात आहे.. विचार करत दुकानासमोरुन जात होतो तर तो माझ्या समोरच उभा होता.. तोंडाचा वास तर येतच होता पण ताठ उभे राहता येत नव्हते..

  म्हटलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुझ्या घराकडे जावून आलो तर म्हणाला, बरं झालं कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत..तू भेटलास छान आहे.

तर म्हणाला शुभेच्छा दे की जन्मभर प्यायला कमी पडू नये.. मला राग आला नी मी म्हटलं की तुला जन्मभर प्यायला मिळू नये.. त्याने ते ऐकलं नी पाय धरले म्हणाला मिळालीच नाही तर पिणार कोठून...? म्हणाला जेव्हा प्यायला खिशात पैसा नसतो तेव्हा कोणीतरी पाजतो.. पैसा नाही म्हणून कधीच फरक पडला नाही.. कुणाचे तरी पाय धरले की कोणी ना कोणी देतोच थोडेफार...भेटतेच मग प्यायला..भेटलेच नसतं तर कोण पिल्लंअसतं..?

खरंच सोडायचं आहे मला पण ही काही सुटत नाही.. कारण ही भेटल्या शिवाय राहतंच नाही.. नाही भेटली की मग नक्की सुटणार..

    मला ही ते नक्की पटलं.. म्हणालो सगळ्या पिणाऱ्या ची हिच समस्या आहे...भेटते म्हणून पितात.. भेटायलाच नको..

   आणि मग संकल्प केला, ह्या सर्वांचे संसार निट व्हायचे असतील तर दारुबंदी केलीच पाहिजे.. आणि एक चांगला संकल्प केला की हे दारुचे दुकान बंद केले पाहिजे.. संकल्प म्हणून कामाला लागलो... नवीन वर्षाच्या निमित्ताने गावात सभा घ्यायची म्हणून दवंडी दिली नी सारा गाव जमा झाला.. सर्वांना चहा, नाष्टा, पाणी दिलं..नी चांगले परीवर्तनाचे डोस दिले.. शेवटी सांगितलं गावातील दारुचे दुकान बंद करायचं.. लोकांना ते पटले.. दुकानदार पहिल्यांदा नाराज झाला पण पुढे त्यालाही पटलं.. शेवटी त्यांचे दारुचे दुकान बंद करून त्यानं वाचनालय नी व्यायाम शाळा सुरू करावे हे ठरले नी त्यासाठी त्याला साऱ्या गावाने मदत केली..

    माझ्या त्या मित्राने दारु तर सोडलीच पण पुढे तो गावचा सरपंच झाला... गावाला विकासाचे वेध लागले.. चांगले वाईट लोकांना समजू लागले.. सर्व गाव एकजुटीने नांदू लागला..नी गावात परीवर्तन घडून आले...आज गावाचं नाव झाले ते केवळ नी केवळ सर्वांनी चांगला संकल्प केला म्हणून...

सर्वांना विनंती आहे की आपण चांगले संकल्प करुया.. विकास साधूया, गावाला पुढे नेवू या..


Rate this content
Log in

Similar marathi story from Action