Rahul Mohite

Thriller Others

3.5  

Rahul Mohite

Thriller Others

सिंहगड सायकलवारी

सिंहगड सायकलवारी

3 mins
3.3K


आपलं कायम ठरल्यासारखं ऑफिस नाइट ड्युटी करायची आणि सकाळी सायकल वारी साठी तयार. तसच सुचले शुक्रवारचा दिवस नाईट शिफ्ट करून घरी आलो फ्रेश होऊन नाष्टा करून प्रवासाला सुरुवात केली. दिघी वरून निघताना सकाळचे १० वाजले होते. हिवाळ्याचे दिवस असल्याने हवेत तसा गारवा जाणवत होताच. बघता बघता शिवाजीनगर ओलांडले, जंगली महाराज रोड वरून सिंहगड रोड वरून निवांत पुढे सायकलेवरी सुरू होती. पुढे खडकवडला गाव ओलांडताच भव्यदिव्य असे खडकवासला धरण. निळेभोर पाण्यानी भरलेले जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी, एकदम शुद्ध हवा, दुपारची वेळ असूनही थंडगार वारे मस्त असे वातावरण निर्माण झाले होते. याचा खूप छान आस्वाद घेऊन फोटोचा मोह न वरल्याने दोन तीन फोटो घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. तसा सायकलचा या मार्गावरील पहिलाच प्रवास होता. धारणावरून पुढे जाताच आर्मी एरिया ओलांडून पुढे डोणजे गावामध्ये पोहचलो. डोणजे गाव म्हणजे खूप महत्त्वाचा इतिहास अनुभवलेले गाव. स्वराज्य स्थापनेमध्ये या गावकऱ्यांचा तसा मोलाचा वाटा. गडाच्या पायथ्याशी वसलेले खूप सुंदर गाव म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. गाव सोडून पुढे जाताना डाव्या बाजूला एक मनमोहक असे वॉटरपार्क आहे. हे पाहताच आमच्या कॉलेजच्या ट्रिप मधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पुढे जाता जाता गड सुरू झाला. किल्ला हा डोणजे गावापासून साधारण १२-१५किमी अंतरावर आहे. रास्ता तसा नागमोडी वळणाचा आणि पूर्ण चढता. 


मी उत्साहाच्या भरात चढ चढण्यास सुरू केला. तास हा माझा पहिला अनुभव होता आणि तो मी दुपारच्या उना मध्ये घेत होतो. काही किलोमीटर अंतर ना थांबता पूर्ण केले. जितके पुढे पाहतो तितका नागमोडी वळणाचा आणि चढाचा रस्ता काही केल्या संपायला तयार नाही. दुपारची वेळ असल्याने अंगातील शक्ती पूर्ण निघून जात होती जितके पाणी पिणार तितके कमीच. तसाच मी ना थांबता माझा प्रवास सुरु ठेवला. गडाच्या मध्या पर्यंत पोहचतो तो पर्यंत माज्या समोर एक संकट उभे राहिले. तसा मी एकटाच प्रवास करीत होतो, रस्ता वर वाहने कमी दुपारची वेळ असल्या कारणाने. बघतो तर काय समोर ३०-४० माकडांचा कळप रस्त्यावर उभा काही केल्या जायला तयार नाही. जसा त्यांनी मला एकट्याला पाहिले तसे ते माज्या बाजूने चालून येऊ लागले करण माज्या पाठी वर माजी बॅग होती. त्यांची अपेक्षा की त्या बॅग मध्ये काही न काही त्यांना मेजवानी भेटेल या दृष्टीने ते माज्या जवळ येण्यास सुरुवात केली. रोडवरून येणारी वाहने काही थांबायला तयार नव्हती. मी आणि माझी सायकल समोर ३०-४० माकडे... काहीच सुचायला तयार नव्हते. चोहीकडे जंगल पक्षी-प्राण्यांचा कर्कश आवाज येत होता. मी तसाच एकटा दारीच कट्ट्यावर उभा. तेवढ्यातून फोटो चा मोह अवरला नाही म्हणून काही फोटो क्लिक केले तरी समोरचे माकडे काही जाईल तयार न्हवती. तेवढयात माज्या लक्ष्यात आले माझा इंजिनीयर मित्र अमित हा तिकडे सिव्हिलचे काँट्रॅक्ट घेऊन काम सुरू केला आहे. फोन करण्याचा प्रयत्न करत होतो पण डोंगर,जंगल असल्याने संपर्क होऊ शकत न्हवता. काही वेळाने आमचा संपर्क झाला त्याला माझे ठिकाण सांगितले त्याने त्याची कार मोजता सोबत चालवली आणि त्या संकटातून बाहेर काढले. 


बघता बघता समोर गड दिसू लागला दुपारची वेळ असल्याने कडक ऊन त्यात सायकल चालउन, चढ चढून खूप दमलो होतो. तेवढ्यात आमचा एक छोटी चहाची टपरी दिसली. कटिंग चहा आणि गरमागरम कांदा भजीची चव ही खूपच न्यारी. पुढचा प्रवास सुरु केला मित्राच्या मदतीने गड गाठला. तेव्हा मला वाटले की त्या काळी या नरवीर तानाजी मालुसरे आणि त्याच्या मावळ्यांनी कसे काय लढाई केली असेल त्या काळी काही वाहने न्हवती येजा करण्या साठी पाई किंवा घोड्या ची मदत घ्यावी लागत असे. हा अनुभव पाहून माझा सलाम या छत्रपती शिवरायांना आणि त्याच्या शूरवीर मावळ्यांना आणि त्यांच्या कार्याला.


परतीचा प्रवास सुरु केला मित्रा च्या सांगण्यानुसार कोंढानपूर मार्गे निवडला. कोंढानपूर गावा जवळ एका हॉटेल मध्ये मस्त जेवण करून खेडशिवापुर वरून पुणे-बेंगलोर हायवे ला लागलो. कात्रज नवीन बोगघ्या मधून पहिलाच सायकल प्रवास. जसा मध्यभागी पोहचताच भरधाव वाहनांचा आवाज बोगद्य मध्ये घुमत होता. तसाच पुढे निघालो दारीपुल ओलांडून परतीचा प्रवास सिंहगड रोडने परत दिघी मध्ये संपवला. बघता बघता १००किमी प्रवास झाला आणि घरी त्यातच टीव्ही बघताना समजले की त्याच दिवशी "तानाजी" नामक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवणारवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

अशी ही मजेशीर न विसारणारी सिंहगड सायकलवारी. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller