Rahul Mohite

Romance Tragedy

4.0  

Rahul Mohite

Romance Tragedy

रोमांचक प्रेम कथा भाग ३

रोमांचक प्रेम कथा भाग ३

3 mins
412


एक मेसेज मुळे तो रात्र भर विचार करून परेशान झाला होता. त्याच्या मन मध्ये भीती ही होती कारण तो मेसेज एका कॉलेजमधील मॅडम चा होता पण दुसरीकडे मॅडम तर आत्ताच कॉलेजपास होऊन जॉब साठी रुजू झालेली मुलगी होती. तसे पाहिले तर सगळे कॉलेजत्या मॅडम वर फिदा होतेच जोते कधी काही चान्स शोधायचा बोलण्याचा. पिल्लुडं काही रात्र भर त्या मेसेजचे उत्तर दिले नाही. तो काळ म्हणजे त्या काही व्हाट्सएप वैगेरे काही न्हवते चॅटिंगसाठी फक्त टेक्स्ट मेसेज उपलब्ध होते.


दुसऱ्या दिवशी पिल्लुडंकॉलेजमध्ये गेला रोजच्या प्रमाणे कॅन्टीनमधून नाष्टा करून क्लास मध्ये जाऊन बसला. त्याचे मन काही केल्या रमेना एकतर रात्रभर झोप झाली न्हवतो आणि डोक्यात तोच विचार कायम सुरू होता.

लंच ब्रेक झाला आणि हा कॅन्टीनकडे निघाला।

शोना: हाय पिल्लुडं, कैसे हो??😋


पिल्लुडं ने तिकडे लक्ष्य न देता एकदम स्पीड मध्ये कॅन्टीन गाठले आणि मित्रानं सोबत गप्पा मारात बसला. तरी ही त्याच्या मनात हेच सुरू होते मेसेज ला काय उत्तर द्यायचे. त्या दिवशी दोघांचे काही बोलणे झाले नाही. कॉलेज संपवून घरी गेला रोजचे काम करून रात्री मित्रानं सोबत गप्पा झाल्या. याचे पूर्ण लक्ष्य त्या मोबाईल कडेच आज काय मसेज येईल का. वाट बघून बघून बिचारा थकला पण मेसेज काही आला नाही.

पुढच्या दिवशी कॉलेजमध्ये गेला आणि अडमीन ऑफिस मध्ये काम नसताना ही उगाच डोकावून बघत होता त्याला मॅडम काही दिसत न्हवती. तसाच निघून गेला क्लास सुरू झाले होते. याचे कोठेच लक्ष्य लागत न्हवते ना त्या मॅडम दिसत होत्या ना मेसेज येत होता. बेचेन होऊन कॉलेज संपवून घरी निघून गेला रात्री परत मेसेजची वाट बघत होता पण काही केल्या मेसेज काही आला नाही. असेच हा रोज कॉलेजमध्ये जायचा ऑफिसमध्ये डोकावून पाहायचा मॅडम काही दिसत नव्हत्या. मग त्याने ठरवले की अत्ता आपण त्या मेसेज ला उत्तर द्याचे.

पिल्लुडं: हॅलो मॅडम, कैसे हो?


असा मेसेज याने सकाळी पाठविला आणि रिप्लाय ची वाट बघत बसला. क्लास मध्ये काही केल्या त्याचे लक्ष्य लागेना कधी मेसेज चा रिप्लाय येतो हेच बघत बसला होता. रिप्लाय काही अला नाही बिचारा आठवडाभर मेसेज आणि मॅडम ची वाट पाहत राहिला.


एक आठवड्या नंतर नेहमी प्रमाणे कॉलेजमध्ये गेला आणि ऑफिसमध्ये डोकावून पहिला तर काय त्याला मॅडम दिसल्या तो जाम खूष झाला जणू असा खूष झाला होता की याला १ करोड रु ची लॉटरी लागली आहे. 😄 अत्ता याचे लक्ष्य त्या कॉलेजमध्ये कमी आणि वारांड्या मधून अडमीन ऑफिसमध्ये जादा. तिकडे बिचारी मॅडम आठवडाभराची राहिलेली कामे करण्यात खूपच व्यस्त होत्या. त्यांना या पिल्लुडं कडे पाहण्यासाठी, बोलण्यासाठी थोडा ही वेळ नव्हता. 


मॅडमना बघूनच त्याचे मन भरले होते. कॉलेज सुटले आणि तो मॅडमची वाट बघत उभा होता पण मॅडम आज काम करून खूप थकल्या होत्या त्यांनी याच्या कडे काही लक्ष्य दिले नाही. बिचारा हताश होऊन घरी निघून गेला.


रात्री झोपण्यापूर्वी परत यांच्या मनात तोच प्रश्न भेडसावत होता तेव्हचं मॅडमच्या मेसेजला उत्तर दिले पाहिजे होते अत्ता आपली वेळ तर निघून गेली नसेल ना. 😢 खूप विचार करू लागला आणि झोपता झोपता त्याने मेसेज केला

पिल्लुडं: हाय मॅडम, होप यु हाड फूड?

अर्धा तास बिचारा मोबाईल मध्ये डोके घालून बसला पण रिप्लाय काही आला नाही.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance