Rahul Mohite

Romance Tragedy

4.0  

Rahul Mohite

Romance Tragedy

रोमांचक प्रेम कथा - भाग ४

रोमांचक प्रेम कथा - भाग ४

3 mins
416


बिचारा मेसेजला उत्तर येईल म्हणून आस लावून बसला पण उत्तर काही आले नाही निराश होऊन झोपी गेला.😴 तरीही त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती ती म्हणजे आपण पहिल्या मेसेज ला रिप्लाय दिला पाहिजे होता राव.😒

दुसरा दिवस उजाडला पिल्लुडं नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आला जशी त्याची एन्ट्री होते तोच काय समोर बघतो तर मॅडम.

शोना: हॉलो, गुड मॉर्निंग

पिल्लुडं: गुड मॉर्निंग मॅडम🤓

शोना: अरे सॉरी मेने तुम्हरा कल रात का मेसेज सुबह देखा, काम का लोड जादा था तो बहोत थक के सोई जलदी.

पिल्लुडं: .....(काय बोलावे सुचत नव्हते मनमे लाड्डू फुटा) हा किया था मेसेज.

शोना: सॉरी बाबा

पिल्लुडं: इट्स ओके मॅडम


इतके बोलून तो शरमेने मान खाली घालून कॅन्टीन मध्ये निघून गेला. खूप आनंदी झाला होता चेहरा जणू असे फुलले होते जसे कमल फुलते तसे. नाष्टा करून क्लास मध्ये बसतो पण त्याचे लक्ष्य काही क्लास मध्ये नसते हे त्याच्या क्लास मधील मित्रानं लक्ष्यात येते सर्व जण त्याला विचारायला लागतात. काय भावा काय झाले लॉटरी लागली की काय आज एकदम खूप आणि टाकटकीत दिसतोस. पिल्लुडं मनातल्या मनात हसून विषय बदलून जातो.😅

क्लास सुरू होतो तरी ही याच्या मनात दुसरेच काही सुरू असते तेवढ्यात टीचर चे लक्ष्य पिल्लुडं कडे जाते. पिल्लुडं स्टँड उप कॅन यु रिपीट व्हॉट एक्साम्पल आय ह्याव गिवेंन. हा तर फुल्ल खायलोमे असतो आणि काहीच सांगता येत नाही. टीचर ओरडतार आणि क्लास बाहेर काढतात. बिचारा आधीच मनातून खूप खुश असतो मग तसाच उठून बाहेर जातो. क्लास मधून बाहेर पडताच शोना काही तर काम घेऊन त्याच टिचर कडे अली असते. शोना पिल्लुडं कडे बघते आणि पिल्लुडं शोना कडे बघत बसतो पण दोघे बोलू काही शकत न्हवते कारण क्लास मधील सर्व त्याच्या कडेच बघत होते. की नेमका आज हा इतका खूष का बर आहे आणि याच्या मनात नेमका काय सुरू असेल.😊

ते दोघे एकमेकांना काहीच न बोलता निघून गेले. पिल्लुडं कॅन्टीन मध्ये जाऊन बसला आणि शोना तिचे कॉलेज चे काम. कसा बसा दिवस घालवला आणि संध्याकाळी घरी निघून गेला. मेस मधून जेऊन आल्यावर रोज मित्रांसोबत गप्पा मारत बसत असे पण या दिवशी भाऊ चा मोबाईल काही हातून सुटत न्हवता. मित्र बोलवायला आले तरी हा गेला नाही बेडवर हातात मोबाईल घेऊन पडून राहिला. त्यावेळचे मोबाईल म्हणजे नोकिया ११०० ब्लॅक अँड व्हाईट या मध्ये टाइम पास साठी फक्त दोनच पर्याय १ मेसेज २ तो सापाचा गेम. हा तर तो गेम ही खेळत न्हवता ना मेसेज करत होता याचे पूर्ण लक्ष्य फक्त त्या मोबाईल कडेच जणू वेड्या सारखे. 😎

थोडया वेळात त्याला मेसेज आला मोबाइल ट्रिकट्रिक वाजला पिल्लुडं एकदम खूष 😋होऊन मोबाईल हातात घेऊन बघतो तर काय त्याच्या मित्राने मेसेज केला होता त्या मध्ये पिल्लुडं ला शिव्या घातल्या होत्या कारण तो आज मित्रानं सोबत गप्पा मारायला गेला न्हवता म्हणून. 😔बिचारा खूप वेळ वाट बघत बसला होता अत्ता मेसेज येईल मग मेसेज येईल पण तो काही केल्या ११.३० वाजे पर्यंत आला नाही आणि थकून झोपायची तयारी करतो. बेडवर जाऊन पडतो ब्लॅंकेट अंगावर घेतो मोबाईल उश्या कडेला ठेवतो आणि जशी पहिली डुकली लागते तोवर मोबाईल वाजतो. पिल्लुडं खडबडून जागा होतो आणि खूष होऊन मोबाईल कडे बघतो. तो खुप खूष होऊन मोबाईल बघत असतो त्याच्या मनात वाटत असते की शोना चा मेसेज आला असेल. मोबाइल अनलॉक करून बघतो तर काय परत त्याच्या मित्राचा मेसेज.

त्याचे मित्र त्याची फिरकी घेत होते. वैताकून पिल्लुडं झोपून जातो.😴

१२.३० वाजताच्या सुमारास परत मोबाईल वाजतो पिल्लुडं ला शंका येते की आपले मित्रच आपली फिरकी घेत आहेत म्हणून तो त्या वाजलेल्या मोबाईल कडे दुर्लक्ष करतो आणि गाढ झोपी जातो.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance