Rahul Mohite

Others

1.8  

Rahul Mohite

Others

वटपौर्णिमा आणि नवीन प्रथा

वटपौर्णिमा आणि नवीन प्रथा

2 mins
213


#थोडे कडवट पण सत्य

|| वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे|

   पक्षी ही सुस्वरे आळविती ||

काही दिवसांवर येणारा सामाजिक आणि पारंपरिक सण वटपौर्णिमा. या सणाला सर्व महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि सात जन्मी हाच असाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. पण सद्ययाच्या मॉडर्न जमान्यांमध्ये या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी वडाचे झाड शोधण्याची वेळ आली आहे. कारण तर आपल्या सर्वानाच माहीत आहे झाडांची झालेली तोड. या मॉडर्न जमान्यांमध्ये महिला वडाचे झाड भेटत नसल्या कारणा मुळे किंवा जवळपास उपलब्ध, हयात नसल्या मुळे बाजारातून वडाच्या झाडाची काठी, फांदी विकत आणून त्याची पूजा करताना दिसतात. याच झाडाच्या काठीची पूजा करून हाच पती सात जन्मी मागीताला जातो. *किती मजेशीर गोष्ट आहे।*

खरंच या वृक्षांची तोडून त्यांची पूजा करून काही होणार आहे का हो?? हेच जर आपण या वाटपौर्णिमेच्या निमित्ताने जेथे जागा मिळेल तिथे एकादे वडाचे किंवा कोणतेही झाड लावले तर त्याचा सर्वाना फायदा होईल. आपल्या सर्वांना माहीत आहेच सध्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचे किती मोठ्या प्रमाणात होत चाललेले नुकसान. एका वृक्षा पासून आपल्याला खूप काही फायदे मिळू शकतात. जसे वाटपौर्णिमेला झाडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मागतात तर मग याच पतींची शारिरीक मानसिक संतुलन जपण्याची गरज पण आहे. जर आपण झाडे लावून याच झाडांचे संवर्धन केले तर सात जन्मी काय हजारो जन्मी निरोगी पती मिळू शकेल.

एक माणसाचे सरासरी आयुष्य हे किमान ६०-८० वर्ष आहे पण हेच तुमि झाडांचे पाहीले तर शेकडो वर्ष आहे. यातून आपल्या सर्वांचे तसेच आपल्या पुढच्या पिढीचे सुद्धा जतन केल्या सारखे आहे.


तात्पर्य- झाडे लावा झाडे जगवा झाडांची निगा राखा यामध्येच सर्वांचे हित आहे.

(सामाजिक, पारंपरिक सणाला विरोध नाही पण झाडांच्या होणाऱ्या नुकसानीला आणि याच सामाजिक सणाला काही तर वेगळे रूप धारण करण्याची गरज निसर्ग जपण्या साठी वाटते. एक विचार मांडण्यात आला आहे. लिहिण्यात काही चुकल्यास किंवा भावना दुखवल्यास क्षमस्व)


Rate this content
Log in