Rahul Mohite

Romance Others

4.0  

Rahul Mohite

Romance Others

अनुभवी प्रेम कथा भाग १

अनुभवी प्रेम कथा भाग १

2 mins
492


एक पाहिलेली प्रेम कथा।

माझा मित्र पिल्लुडं आणि त्याची प्रेयसी शोना (ही त्यांची टोपणनावे) यांचीप्रेमकथा लिहण्याचा एक प्रयत्न करीत आहे.

पिल्लुडं हा तसा छोट्याश्या गावातुन शहरा मध्ये नोकरीच्या शोधात आलेला मुलगा. पहिला नोकरीच्या शोधात मुंबईगाठली पण त्याला तिकडे काही जमेना म्हणून थोडा विचार करून पुणे मध्ये अला. थोडे दिवस इकडे तिकडे किरकोळ काम करत कॉम्पुटर क्लास करायचा सोबतच गावाकडे कॉलेज मधून डिग्री सुरूच होती. परिक्षा अली की गावी जाऊन पेपर दयाचे आणि पुणे मध्ये नोकरी सुरूच. असे करत करत त्याची डिग्री पूर्ण झाली मग त्याला प्रश्न पडला आत्ता पुढे काय? तो प्रयन्त तो काही दिवस नातेवाईक आणि मित्रानं सोबत राहायचा. पुढे काय हा प्रश्न त्याला नेहमी भेडसावत होताच. त्याने विचार केला त्यांच्या कंपनी मध्ये पाहिले की पुढे जायचे असेल तर अजून शिकले पाहिजे. खूप दिवस विचार करीत राहिला मग त्याला सुचले की आपण मॅनेजमेंट मधून पुढचे शिक्षण घेऊ शकतो पण प्रश्न होता तो फी कोठून भरायची.

  या वर विचार करून करून बिचारा थकला घरची परिस्थिती पहिलाच बेताची मग कसा होणार. त्याने विचार केला आणि शैक्षणिक कर्ज काढून शिक्षणपूर्ण कराचे विचार केला. घरी सांगितले घरून थोडा अडथळा आला तरी त्याने हट्ट धरला आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला.

काही दिवसातच कॉलेज सुरू झाले हा खेड्यातून आलेला मुलगा त्यातच तो मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केले होते आणि हे मॅनेजमेंटवाले बोल थोडे हाय ब्रो, डुड हाव आर यु।।। वैगेरे वैगेरे. याला पहिले काही दिवस काहीच समजेना नेमका चालले तरी काय. तसाच कॉलेजमध्ये यायचा इंग्लिश शिकवलेले काही समजत न्हवते सगळे बाउन्सर. थोड्याच दिवसात काही लोकांशी ओळख झाली मित्रांचा एक ग्रुप तयार झाला तेही सगळे गावाकडून आले होते त्यांना ही काही समजत न्हवते.

कॉलेजमध्ये काही दिवसातच गॅदरिंग ठेवले त्या मध्ये विवीध संस्कृती, कला सादर करण्यास सांगितले. कॉलेजवाल्यानि थोडी शाळा केली आणि सर्वानी या कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडले. मग काय जसे येईल जसे जमेल तसे नाट्य, कला मुलांनी सादर केल्या त्यातच या पिल्लुडं ला वेळगली कला अवगत होती त्याने ही त्या पद्धतीने ती सर्वां समोर सादर केली. तशी ती कला गावाकडील होती पण या शहरी लोकांना खूप आवडली आणि तिथून पुढे पिल्लुडं सगळ्यांना मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला पूर्ण कॉलेज नावाने ओळखू लागले तसा तो कॉलेजचा हिरोच बनला जणू.

आत्ता ही शोना म्हणजे नेमकी कोण??

कॉलेजमध्ये अडमीन इंचार्जे या पदावर कार्यरत असलेली आणि नुकतीच कॉलेज पास होऊन नोकरीस रुजू झालेली हुशार, सूंदर, कामात पटाईत मुलगी. तसे अजून तिचे लग्न वैगरे काही झाले न्हवतेच. जिला कॉलेजमध्ये सर्वजण आदराने मॅडम आणि पाठीमागे टिंगल करणारे चुलबुल म्हणून ओळखले जात. मराठी कमी बोलता येणारी कारण एका दाक्षिणात्य कुटुंबातील मुलगी. कॉलेज मधील सर्व महत्वाची कामे मुख्यध्यपक तिच्याकडे सोपवत असत मग ते लेक्चर अरेंज करणे असो किंवा गॅदरिंग सगळ्याचे पुढे तीच आणि सगळ्याची आवडती पण तीच. तिककेच काय तर कॉलेजची मुले ही तिच्यावर फिदा आणि लाईन मारायची. अशी ही शोना. याच शोनाने गॅदरिंग चे सगळे समालोचन केले.

क्रमशः

पुढील भाग थोड्याच दिवसात आपल्या समोर सादर केला जाईल.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance