रोमांचक प्रेम कथा भाग ९
रोमांचक प्रेम कथा भाग ९


क्रमशः
तसाच निराश होऊन तो आपल्या होस्टेल कडे चालत चालत निघून जात असतो तेवढ्यात त्याचा एक मित्र
मित्र: त्याला बोलतो काय रे आज एकदम नाराज दिसतो आहेस.
पिल्लुडं : हां मी कसला नाराज काहीच नाही मी एकदम निवांत आहे.
मित्र: नाही रे तु रोजच्या पेक्ष्या काही तर वेगळा वागतो आहेस, तुज्या दुनियेत आहेस.
पिल्लुडं: नाही नाही असे काही नाही बस घरी जाऊन आल्यामुळे कॉलेजमध्ये मनलागत नाही.
मित्र: खरच का ?? की अजून काही कारण आहे?
पिल्लुडं: गालातल्या गालात हसून , नाही रे भावा असे काहीच नाही.
विषय बदलून तो तिथून निघून सरळ हॉस्टेल वर जातो. जसा बॅग काढून टाकतो आणि लगेच मेसेज करतो.
पिल्लुडं : हॅलो मॅडम, आज बहोत राय देखी आपकी आप कॉलेज मे नाही दिखे. कुछ दिक्कत तो नाही?? मेसेज नाही कुछ नाही??
असा मेसेज करून मोबाईल हातात घेऊन खूप वेळ वाट बघत बसतो. पण तरीही काहीच उत्तर येत नाही. याच खराब मूड मध्ये मेस मधून पिल्लुडं जेऊन येतो आणि रात्री परत.
पिल्लुडं: मॅडम क्या हुआ कुछ उत्तर नाही आया?? नाराज हो क्या?? मेने कुछ गलत बोला क्या? मेरी कुछ गलती तो नाही हुई?? कुछ तो बोलो मॅडम..
रोजच्या सारखा उत्तराची वाट बघत बसला पण उत्तर काही आले नाही. तसाच मोबाइल हातात पडकून कधी झोपी गेला त्याला ही समजले नाही. त्याच्या मित्रांनी मोबाईल काढून बाजूला ठेवला.
सकाळी उठल्यानंतर पहिला त्याचे लक्ष्य त्या मोबाइलकडे उत्तर आले का? पण काहीच आले न्हवते. नेहमी प्रमाणे आवरून धावत पळत कॉलेजमध्ये जातो आणि पहिला शोना मॅडम च्या केबिन मध्ये जाऊन बघयो तरीही हाती निराशाच मॅडम काय तिथे दिसल्या नाहीत. तसाच नाराज होऊन पिल्लुडं क्लास रूम मध्ये निघून जातो. त्याचे मन काही कॉलेजमध्ये लागत नसते सारखा त्या खिडकीतून बाहेर डोकावून बघत असतो आत्ता दिसले मग दिसेल पण प्रत्येक वेळी निराशाच.
क्लास सुरू असताना बाहेर बघताना सरांचे लक्ष्य पिल्लुडं कडे गेले आणि सर जोरानी ओरडले
सर: काय आहे तिकडे?? सारखा सारखा काय बघतो आहेस ?? इथे शिकवतेले सोडून तिकडे काय बघतो आहेस? सांग बघू आपण कोणत्या गोष्टीवर बोलत होतो अत्ता??
पिल्लुडं: बोलती बंद।।। याला काहीच समजत नसते सर ते हे की...... काहीच सांगता येत नाही.
सगळा क्लास हसायला लागला जोर जोरात..
सर: इथे शिकण्या साठी आला आहेस ना मग नीट लक्ष देऊन शिक नाही तर बाहेर निघून जा.
पिल्लुडं: स्वारी सर
शिक्षक परत आपल्या मूळ विषयावरचर्चा सुरू करतात पण याची काही खैर नसते काहीच लक्ष नसते. दुपारची सुट्टी मध्ये नेहमीप्रमाणे मित्रानं सोबत जेवायला कॅन्टीनमध्ये जातो पण काय याचे मन मॅडम कधी दिसते याकडेच. इथे ही मन नाराज होते मॅडम काही दिसत नाहीत. अत्ता ही गोष्ट अशी होती की जी तो कोणा सोबत बोलू आणि सांगू पण शकत न्हवता नाही तर याचे आणि मॅडम चे सगळे कॉलेजभर समजले असते.
तसाच घरी निघून जातो कॉलेज सुटल्यानंतर. घरी जाऊन मेसेज करतो.
पिल्लुडं: हॅलो।।।
तरीही काहीच उत्तर येत नाही बिचारा खूप वाट बघत असतो रोजची सवय लागली असते त्याला खूपच बेचेन होत असते.